Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: Question Bank_BA I_Marathi Optional_Semester II

Thursday, 9 June 2022

Question Bank_BA I_Marathi Optional_Semester II

 Question Bank B.A.-l

Marathi (opt)DSC-A -13

पाठ्यपुस्तक : अक्षरबंध (बाकी सर्व ठीक  निवडक कविता ) -लोकनाथ यशवंत

विषय प्राध्यापक: प्रा. बी. के. पाटील.

विभाग १ व २

प्रश्न : १ खेड्यातून शहरात आलेल्या मानसाची कोणती मजबुरी कवीने 'तडजोड' या कवितेत मांडली आहे ?

उत्तर : प्रस्तावना :  आंबेडकरवादी विचारांच्या दूसर्‍या पिढीतील एक दमदार कवी म्हणून लोकनाथ यशवंत यांचा उल्लेख केला जातो. २०१४ साली प्रकाशित झालेल्या बाकी सर्व ठीक आहे या कवितासंग्राहातील कांही निवडक कविता अभ्यासाला आहेत.

 तडजोड कवितेत खेड्यातून शहरात आलेल्या माणसाची मजबूरी कवीने या कवितेत अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडली आहे. 

      नोकरीच्या निमित्ताने किंवा व्यवसायाच्या निमित्ताने शहरात आलेल्या माणसांना शहरी प्रवाहाशी एकरुप होताना सतत तडजोड करावी लागते. मन मारावे लागते. अशी तडजोड केली , मन मारले की आपण बिनधास्तपणे शहरी जगू शकतो असे कवी सांगतात.

      खेड्यातून शहरात आलेला आणि शहरी झालेला माणूस' हो' ला 'हो'म्हणतो आणि नाहीला नाही म्हणतो, असं बोललं की पोटातील पाणीही हलत नाही. 

     कवी जे धनदांडगे/ शक्तीशाली आहेत आहेत अशांची तळी उचलतात  ,जे गरीब, कमजोर आहेत त्यांचा विचार करत नाहीत.

       खेड्यात गैरसोयी असतात ,सतत धूळ उडते. इथे दोस्ती, मैञी, कळवळा आपलेपना असतो तर शहरात फक्त गरजेतून मैञी जन्मते गरज संपताच मोबाईलमधील नंबर डिलीट केला जातो

    शहरात कुणाचाच कुणावर विश्वास नाही प्रत्येक हालचालीवर सी, सी. टी. व्ही. कॅमेरे लक्ष ठेवतात.

   शहरात मुख्य प्रवाहाशी एकरुप होताना सतत जडजोड करावी लागते तरच शहरात राहता येते हे वास्तव या कवितेत मांडले आहे.

प्रश्न : २  'यारी शेवटचे आचके देते व्हेन्टीलेटरवर' असे कवी 'पर्यावरण' या कवितेत का म्हणतात? तुमच्या शब्दांत लिहा,

  उत्तर :  प्रस्तावना :  कवी लोकनाथ यशवंत  आंबेडकरवादी कवी आहेत त्यांची कविता वेदना, विद्रोह आणि नकार यांना विवेकाचे आवरण देते.

      जातीयता नसावी , आपण सर्व समान आहोत हे जरी मान्य केले असले तरी प्रत्यक्षात मनातली, मेंदूतली जात जात नाही याचे चिञण या कवितेत आले आहे.

      कवी जेंव्हा मिञांच्या घोळक्यात असतात तेव्हा ते मिञांना प्रिय असतात

      पण जेव्हा कवी नात्यागोत्यातील समूहात असतात तेव्हा त्यांचे अस्तित्व बदलते. मग तो मिञ राहत नाही तो एक विशिष्ट जातीचा बनतो, मग हे मिञ त्याला परकेपणाची वागणूक देतात एकाकी पाडतात तो एका विशिष्ट धर्माचा आहे असे त्यांच्या वागणूकीतून व्यक्त होते या ठीकांनी दोस्ती- यारी संपते .मिञत्वाचे पर्यावरण जातीयतेनं बरबटते अशा परिस्थितीत काय करावे कवीला कळेनासं होत.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

On His Blindness

  Introduction "On His Blindness" is a well-known sonnet written by John Milton.  John Milton is  a famous English poet. The poem...