Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: Question Bank_BA I_Marathi Optional_Semester II

Thursday, 9 June 2022

Question Bank_BA I_Marathi Optional_Semester II

 Question Bank B.A.-l

Marathi (opt)DSC-A -13

पाठ्यपुस्तक : अक्षरबंध (बाकी सर्व ठीक आहे ) 

      -लोकनाथ   यशवंत

विभाग : २ व ३

प्रश्न :  १ 'शेतमजूर' या कवितेत शेतमजूराचे जीवन कसे व्यक्त केले आहे ?

उत्तर :  प्रस्तावना : या सर्व कवितातून १९८० नंतरची भारतीय जीवनात झालेली पडझड वेगाने होणारे शहरीकरण आणि जागतिकीकरणाचे झालेले परिणाम याचा कवी शोध घेतात.

      शेतमजूराचे साधेसोपे जीवन 'शेतमजूर 'कवितेत मांडले आहे. या शेतमजूराला फक्त एक झोपडी हवी आहे. जीवन जगण्यासाठी मोजक्यच वस्तु हव्या आहेत शिक्षणाची आस असलेली मूले आणि कष्ट करणारी बायको ...... एवढ्याच त्याच्या गरजा आहेत.

      हा शेतमजूर सकाळी शेतावर मजूरीसाठी जातो . दिवसभर काम करतो आणि संध्याकाळी थकून आपल्या घरी परत येतो, बायकोने केलेली चुलीवरची भाकरी खाऊन बिनधास्त झोपतो. आणि झोपेत तो जगाची सुंदर स्वप्ने बघतो,

     हे जीवन आपल्याला एकदाच मिळणार आहे याची त्याला जाणीव आहे. म्हणून तो जीवनावर खूप-खूप प्रेम करतो. त्याचं जीवन' कलंदर' चं जीवन आहे तो शेतकर्‍यासारखी आत्महत्या करत नाही.

प्रश्न : २ बातमी म्हणजे काय ? बातमीचे वार्तामूल्य कसे वाढते ?

उत्तर : आजच्या आधुनिक काळात वृत्तपञ, रेडिओ, आणि दूरदर्शन ही तीन सर्वाधिक प्रभावी माध्यमे आहेत. यातही वृत्तपञ हे सर्वात जुने माध्यम आहे.

      अनेक गोष्टी वृत्तपञात छापलेल्या असतात तरीही वृत्तपञात बातमी केंद्रस्थानी असते .बातमीलाच अधिक महत्व दिलेले असते.

   'बातमी' या शब्दाला वार्ता, खबर, घटना, वृत्तांत ,समाचार, असे कितीतरी पर्यायी शब्द वापरले जातात इंग्रजीत यालाच 'NEWS' म्हटले जाते. NEW या शब्दावरुन NEWS हा शब्द आला असावा असे मानले जाते.

NEW हा शब्द लॅटिनमधील Nowa या शब्दाचे रुप आहे.

   न्यु म्हणजे नवीन. बातमी नवीनच असायला हवी. जी घटन नेहमीची घडते त्यात बातमी नसते.

     थोडक्यात सांगायचे तर बातमी वाचकांचे लक्ष वेधून घेते. उदा. 'पत्नीच्या चारिञ्यावरुन संशय घेऊन पतीने पत्नी व तीन मुलांचा खून केला' ही बातमी वाचकांचे लक्ष निश्चितच वेधून घेईल. ही घटना केवळ एका वाक्यात सांगून उपयोग नाही तर ही घटना वर्णन करुन सांगायला हवी. तसेच ही घटना आठ दिवसांनी सांगून उपयोग नाही तर ती लगेच समजायला हवी, ताजी हवी.

     वृत्तपञात छापून आलेल्या प्रत्येक बातमीला तर वार्तामूल्य असेल तरच ती सार्थ ठरते.

   अशा प्रकारे या ठिकाणी बातमी म्हणजे काय ते पाहिले व बातमीचे वार्तामूल्य कसे वाढते हेही पाहिले.

..............................

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Transformation and Transposition

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) Transformation and Transposition These are the important terms from film studies. They a...