Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: Question Bank_BA I_Marathi (Optional)_Semester II

Thursday, 9 June 2022

Question Bank_BA I_Marathi (Optional)_Semester II

 Question Bank B.A.I

Marathi(opt)DSC-A-13

पाठ्यपुस्तक : अक्षरबंध(लोकनाथ यशवंत निवडक कविता) Paper l   Sub Code : 71262

 Prof B.K.Patil.

प्रश्न :५ पुढीलपैकी  फक्त दोन प्रश्नांची उत्तरे लिहा                  (१०)

१.आकलन म्हणजे काय? आकलनाच्या कोणकोणत्या पातळ्या आहेत?                 उत्तर :

      आकलन म्हणजे समजण्याची शक्ती किंवा समजण्याची क्षमता.आकलन म्हणजे इंग्रजीत Compreshension  होय. हा शब्द लॅटिन शब्द काॅम्प्रीहेन्सनेम या शब्दावरुन आला आहे, ज्ञान ,समज, बोध, धारणा, ग्रहण म्हणजेच आकलन होय, एखादी गोष्ट समजावून घेत असताना आपल्याला काय समजले आहे याची जाणीव ज्या क्रियेत होते ती आकलन शक्ती होय. 'समजणे ' याच्या पुढची क्रिया म्हणजे आकलन होय.

    ब्लूम या भाषा शास्ञज्ञाने आकलनाचे तीन प्रकार मांडले आहेत

१ समजलेल्या मूळ विचाराचे दुसर्‍या शब्दात रुपांतर किंवा भाषांतर

२ जो मूळ विचार आहे तोच दुसर्‍या शब्दात सांगणे.

३ मूळ विचारात दडलेला अर्थ सांगणे किंवा त्या विचाराशी जूळणारा उपसिद्धांत सांगून मूळ विचारात भर घालणे.

   ब्लूम यांच्या मते ' आकलन ' ही बुद्धिमापनाची महत्वाची कसोटी आहे.

   आकलनाच्या पाच पातळ्या :

१ बोधन : बोधन म्हणजे बोध होणे .जे ऐकले वा वाचले त्याचा अर्थ समजणे म्हणजे बोधन होय

२ तर्क : शब्दांना तीन शक्ती असतात अभिधा, लक्षणा, आणि व्यंजना. या शक्तींच्या आधारे लेखकाने नेमके काय म्हटले आहे हे शोधवे.

३  मूल्यामापन : वाचलेल्या मजकूराचे गुण आणि मर्यादा यांचा विचार आपल्याला मांडता येणे म्हणजे मूल्यमापन यातून चांगले वाईट याचा निवाडा करुन  समीक्षा करता यायला हवी.

४ रसग्रहण :  लेखकाच्या भूमिकेत शिरुन त्याच्या भावनांचा अनुभव घेता येणे म्हणजे रसग्रहण होय

५  उपयोजन :  आकलनामध्ये वरील चार पातळ्या असल्या तरी महत्व उपयोजनाला आहे. समजलेल्या गोष्टीचा इतर ठिकानी वापर करणे हा आकलनाचा हेतू आहे उदा . शाळेत अंकगणित शिकल्यावर वीस रुपये किमतीच्या चार वस्तू घेतल्यावर वीस गुणीले चार म्हणजे ऐंशी असा हिशोब करता येणे म्हणजे उपयोजन होय .

      आपल्याला जे आकलन झाले आहे त्याचा वापर करुन व्यावहारीक प्रश्न सोडविणे , नवी कौशल्या मिळविणे ही आकलनाची अखेरची पायरी आहे.

२ पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

उतारा :

          हरीभाऊ जोशी यांच्या म्हणण्याला मान देऊन बादशहा गफारखान माझ्या घरी आले, एवढा मोठा माणूस माझ्या घरी आला.

     खादीचा पांढराशुभ्र, धुवट कुडता-पायजमा! गोल उंच टोपी, सव्वासहा फूट उंची! गोरापान रंग! एखाद्या अतिशय देखण्या माणसाचे कुणा सिध्दहस्त कार्टुनिस्टने चिञ काढावा तसा चेहरा म्हणजे भले मोठे नाक,जाडजाड विस्कटलेल्या भुवयाखालचे मायाळु डोळे. ब्रिटीशांच्या डोक्याला तापदायक झालेले, बॅ. जिनांनी ज्यांना शञू मानले होते ते , एकेकाळचे हिंदुस्थानचे राजकारण गाजवलेले असे हे ९० वर्षांचे बादशहा खान माझ्या घरी आल्यावर मला म्हणाले "घर छान आहे हं तुमचं ! जगातल्या कुठल्याही ग्रहिणीला जिंकून घेणारं वाक्यं !

      मी त्यांना म्हटलं ' आपल्यासारखा एवढा मोठा माणूस माझ्या घरी आला केवढं माझं भाग्य ! जन्मभर आठवणीत राहील ही आपली भेट !

         मी कुणी मोठा माणूस नाही मी खुदाई खिदमतगार(परमेश्वराचा सेवक) आहे आम्हाला पश्तुनिस्तान स्वतंञ हवं आहे. ते परमेश्वराचं काम आहे असं समजून मी ते करतो आहे. तुमच्या सारख्या लोकांनी मदत केली तर हे काम होईल नाहीतर होणार नाही. पण पश्तुनिस्तानसारख्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही, इच्छा नाही पण हे काम झालं पाहिजे एवढच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. ते म्हणाले.(लेखिका:प्रतिभा रानडे 'अकोशांचे अवकाश' दिवाळी अंक २०१८अंतर्नादमधील अंश)

प्रश्न :१ हरीभाऊ जोशी यांच्या म्हणण्याला मान देऊन लेखिकेच्या घरी कोण आले ?

उत्तर : हरीभाउ जोशी यांच्या म्हणण्याला मान देउन लेखिकेच्या घरी ' बादशहा गफारखान' आले.

प्रश्न  २  बादशहा गफारखान यांच्या पोशाखाचे वर्णन लेखिकेने कसे केले आहे ?

उत्तर : खादीचा पिंढराशुभ्र धुवट कुडता- पायजमा, गोल उंच टोपी, सव्वासहा फूट उंची, गोरापान रंग, जाडजाड विस्कटलेल्या भुवयाखालचे मायाळू डोळे असे बादशहा गफारखान यांच्या पोशाखाचे वर्णन केले आहे,

प्रश्न :३ बादशहा गफारखान यांचा चेहरा कोणी चिञ काढावे असा होता असे लेखिका म्हणते ?

 उत्तर : एखाद्या सिद्धहस्त कार्टुनिस्टने चिञ काढावे असा.

प्रश्न :  ४ बादशहा गफारखान यांचे वय किती होते असे लेखिका  म्हणते?

उत्तर : बादशहा गफारखान यांचे वय ९० वर्षांचे होते .

प्रश्न : ५ आपण कोण आहोत असे बादशहा गफारखान म्हणाले ?

उत्तर :  मी खुदाई खिदमतगार (परमेश्वराचा सेवक) आहे असे बादशहा गफारखान म्हणाले.

प्रश्न ३ एखाद्या उतार्‍यावरच्या किंवा कवितेवरच्या प्रश्नांची उत्तरे लिहितांना कोणकोणत्या घटकांचा विचार करावा

  (वरील उत्तराची विद्यार्थ्थांनी तयारी करावी.)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...