(B K Patil)
राधानगरी महाविद्यालय, राधानगरी.
सञ : २
सराव प्रश्न संच
मार्च २०२३
विषय : मराठी (ऐच्छिक)
DSC A 13
अभ्यासक्रमपञिका : २
विषय कोड :७१२१६
विषय प्राध्यापक : प्रा. बी. के. पाटील.
प्रश्न :योग्य पर्याय निवडा
1) लोकनाथ यशवंत यांचा पहिला कविता संग्रह किती साली प्रसिद्ध झाला ?
A) १९८७. B) १९८९ . C) १९९१. D) १९९३.
2) लोकनाथ यशवंत यांचा जन्म किती साली झाला ?
A) १९७४ . B) १९७६ . C) १९७८ . D) १९८०.
3) 'एका वृक्षाची गोष्ट' या कवितेत कवीला त्याच्या मिञाणे कोणत्या वृक्षाचे बोन्साय भेट दिले होते ?
A) वडाचे. B) पिंपळाचे . C) कडूलिंबाचे. D) तुळशीचे.
4) लग्नाच्या धामधुमीत कोणी प्राण सोडला ?
A) वासंती आजीने. B) वासंती आत्याने . C) तात्या काकाने. D) चुलत्याने.
5) 'तडजोड' या कवितेत गाव सोडून शहरात आल्यावर त्याच्या मनाला कोणाचा विचार शिवत नाही असे कवी म्हणतात ?
A) कमजोरांचा . B) शक्तीशाली लोकांचा . C) दोस्तांचा. D) मायचा.
6) 'जिवाचा आटापिटा' या कवितेतील कवीच्या मुलांची नावे काय आहेत?
A) मुक्तछंद व समुद्र. B) अभंग व ओवी . C) समीक्षा व कला. D) कादंबरी व पोवाडा.
7) सरकारला कोणत्या बाबीकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे कवी 'राग' या कवितेत म्हणतात ?
A) दुष्काळाकडे . B) वाढत्या लोकसंख्येकडे. C) सुशिक्षित बेकाराकडे . D) कुपोषणाने मरणार्या मुलांकडे.
8) 'एका वृक्षाची गोष्ट' या कवितेत भेट म्हणून मिळालेले बोन्साय किती वर्षांचे होते ?
A) दहा. B) बारा. C) पंधरा. D) सतरा.
9) अनेक हलिउतार लोक कुञ्याला काय खाउ घालतात ?
A) चपाती. B) दुध . C) बकर्याची मुंडी. D) मांस व मासे.
10) 'मूख्यप्रवाह' या कवितेत शहरात राहून माणसाशी कसे वागायचे असते, असे कवी म्हणतात?
A) एकदम तोडून टाकायचे . B) हळूहळू दूर सारायचे . C) त्याचा खुन करायचा. D) गोडगोड वागायचे.
11) कवी लोकनाथ यशवंत यांना पुढीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही ?
A) महाराष्ट्र राज्य वाड:मय पुरस्कार . B) भैरु रतन दमाणी पुरस्कार . C) अस्मितादर्श वाड:मय पुरस्कार. D) महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार.
12) दिवस मावळल्यावर घरी आल्यावर शेतमजुर काय खातो, असे कवी'शेतमजूर' या कवितेत म्हणतात ?
A) मटण . B) तंगडी. C) भाकरी . D) चपाती.
13) शहरात मैञी कशातून जन्मते असे 'तडजोड' या कवितेत कवी म्हणतात ?
A) प्रेमातून . B) पैशातून. C) गरजेतून . D) शिक्षकी पेशातून.
14) पर्सनल मुलाखतीच्या वेळी दगडी किल्याचे एका लाटेत काय झाले असे कवी' पर्सनल मुलाखत ' या कवितेत म्हणतात ?
A) वाळू . B) तट . C) निषेश . D) करंट.
15) आपले व्यक्तितत्व जातिधर्मात बंदिस्त आहे' असे त्याना केव्हा वाटते, असे कवी 'पर्यावरण' या कवितेत म्हणतात ?
A) कवी एकटा असताना . B) कवी समुहात असतांना . C ) कवी जेवत असताना . D) कवी नमन करताना.
16) एडिसनच्या आईने हजार वेळा जन्म घेऊन हे जग कसे करावे' असे कवी'जन्म आईचा' या कवितेत म्हणतात ?
A) धर्ममय. B) परमेश्वरमय . C) आणखी सुंदर. D) संहारमय.
17) खेड्यात काय असते असे 'तडजोड' या कवितेत म्हटले आहे ?
A) धूळ . B) शीतल वारा. C) सुर्यदेवाचा प्रकाश . D) निलांबर.
18) ' भविष्य' या कवितेत कवीने त्याच्या अर्धांगिनीचा हात पाहून काय सांगितले?
A) तुमच्या अंगणात नवी चारचाकी येणार . B) तुमच्या मुलीचा घटस्फोट होणार . C) तुम्ही अखंड सौभ्याग्यवती आहात . D) तुमच्या मुलाचे गर्भश्रीमंत मुलीशी लग्न होणार.
19) जिवाचा आटापिटा' या कवितेतील कवीने आपल्याला नोकरी कोणत्या कोट्यातून मिळाली असे सांगितले?
A) ओबीसी . B) ओपन . C) कलावंताच्या . D) लेखकाच्या.
20) 'गौडबंगाल' या कवितेत विद्यार्थ्थाने सरांना कोणता प्रश्न विचारला आहे ?
A) तुम्ही स्वत:चे विचार का सांगत नाही . B) तुम्ही डाॅ. आंबेडकरांचे विचार का सांगत.
नाही C) तुम्ही कार्ल मार्क्सचे विचार का सांगत नाही . D) तुम्ही माओचे विचार का सांगत नाही.
21) पुढीलपैकी कोणता कवितासंग्रह कवी लोकनाथ यशवंत यांचा नाही ?
A) किडे जगताता घाणीत.
B) आता होउन जाऊ द्या.
C) आणि शेवटी काय झाले ?
D) बाकी सर्व ठीक आहे.
22) 'मुख्य प्रवाह' या कवितेत शहरात गेल्यावर कसे प्रेम दाखवावे' असे कवी म्हणतात ?
A) मनाच्या तळापासून.
B) भडभड बोलून.
C) सामनेवाल्याला तोलत.
D) मनात काहीही असलं तरी.
23) ' एका वृक्षाची गोष्ट' या कवितेत कवीवर प्रेम होते म्हणून त्याने कवीला कोणती भेट दिली ?
A) निळा शर्ट.
B) बोन्सायचे झाड.
C) गोतम बुद्धांचा पुतळा .
D) तुळशीचे रोप.
24) कुपोषित बालकांच्या प्रश्नाबाबत डाॅक्टरसाहेबांशी बोलत असताना ते काय म्हणाले ?
A) त्यांनी शहराच्या मुख्य धारेत यावे.
B) त्यांनी कुटुंबनियोजन करावे.
C) कुपोषित ही सरकारची जबाबदारी नाही.
D) कुपोषितांनी आपले उत्पन्न वाढवावे.
25) कोणती गोष्ट सोपी असते असे कवी 'भविष्य' या कवितेत म्हणतात ?
A) दारात चारचाकी गाडी येणं.
B) प्रेत अडगळीच्या खोलीत झाकून ठेवणं.
C) इन्टलेक्चुअल भामट्यांना मूर्ख बनवणं.
D) झाडाची मुळं कापण.
26) शहरात गरजेतूम जन्मलेल्या मैञीचे काय होते असे ' तडजोड' या कवितेत कवी म्हणतात ?
A) सीसीटीव्हीत दिसते.
B) अकाली मरते.
C) पक्की मैञी होते.
D) आसमंतात धूळ होते.
27) लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी काय पणाला लावलं असे कवी ' पर्सनल मुलाखत' या कवितेत म्हणतात ?
A) जात .
B) धर्म.
C) कॅलिबर.
D) पैसा.
28) ' सोन्याचा दात' या कवितेत कवीने पुढीलपैकी कोणती समस्या मांडली आहे ?
A) कुपोषित बालके मरणाच्या दारात उभी आहेत.
B) शेतकरी आत्महत्या करत आहेत.
C) लोकसंख्या फार वाढली आहे.
D) शेतकर्यांच्या मुलांना नोकरी मिळत नाही.
29) अनाथ मुले कवीची वाट कशी बघतात असे कवी ' स्पर्श ' या कवितेत म्हणतात?
A) प्रेयसीने प्रियकराची बघावी तशी.
B) बाळाने आईची बघावी तशी.
C) चातकाने पावसाची बघावी तशी.
D) चकोरिने चंद्राची बघावी तशी.
30) कोणाच्या आईने हजार वेळा जन्म घ्यावा, असे कवी ' जन्म आईचा ' या कवितेत म्हणतात ?
A) बंदुकीचा शोध लावणार्या.
B) अणुबाॅंम्ब बनवणार्याच्या.
C) राजकारण करणार्याच्या.
D) विमान बनवणार्याच्या.
#####################
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.