Skip to main content

Three Questions

 (e-content is developed by Dr N A Jarandikar)

Three Questions

Q. 1. What three questions did the King ask to the people of his Kingdom?

‘Three Questions’ is a story written by the famous Russian writer Leo Tolstoy. The King in this story had a desire to update his knowledge. In that connection, he wanted to know the answers to the following three questions:

i) What is the right time to begin everything?

ii) Whose advice one should take?

iii) What is the right action one should take?

The King sought answers from the learned men of his Kingdom. But he was not satisfied with their answers.



Q.2. write a short note on: The Hermit.

The King was not happy with the answers that he got from the learned men. So, he went to one hermit. The hermit (साधू) was busy in digging the ground. The King asked him, his three questions. But the hermit ignored him. The King decided to help him in the digging. Then there came one wounded man (जखमी व्यक्ती). The King felt pity for him. He bandaged the wound and gave him water. The next morning, the wounded man asked his forgiveness (क्षमायाचना). He was actually there to kill the King. But the King's bodyguards had wounded him. The King forgave him, and allowed to go. After this, the hermit explained the answers to the King's questions.

According to him, 'now' is the right time to begin everything. Thus, the moment when the King decided to help the wounded man is the right time. One should seek his/her own advice So, the King relied on his own advice to help the wounded man is the right advice. And the right action is to do be good. So, the King helped the wounded man is his right action.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सदरची गोष्ट ही लिओ टॉलस्टॉय या रशियन लेखकाने लिहिलेली आहे. या गोष्टीतील राजाला तीन प्रश्न पडलेले आहेत:

१.       सत्कर्म आचरणात आणण्यासाठीची योग्य वेळ कोणती ?

२.       सत्कर्म आचरण्यासाठी नेमका कुणाचा सल्ला घ्यावा ?

३.       सत्कर्म आचरणात आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची कृती काय करावी?

या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी त्याने दवंडी पिटवलेली आहे. या अनुषंगाने त्याला निरनिराळी उत्तरे मिळालेली आहेत. पण एकाही उत्तराने त्याचे समाधान झालेले नाही. त्यामुळे तो जंगलातील एका साधूला भेटण्यासाठी येतो.

साधू आपल्या आश्रमासमोरील बागेमध्ये काम करत आहे. राजा त्याला आपले प्रश्न विचारतो, पण साधू त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. राजा त्याच्या हातातील फावडे घेतो आणि त्याला मदत करू लागतो. राजा संध्याकाळपर्यंत काम करत राहतो. संध्याकाळी त्या दोघांना एक जखमी माणूस पळत येताना दिसतो. दोघेजण त्याला आश्रमात नेतात. राजा त्याच्या जखमेवर मलमपट्टी करतो. त्याला प्यायला पाणी देतो. दुसऱ्या दिवशी तो माणूस राजाची माफी मागतो. राजाने त्याच्या भावाची हत्या करून त्याची संपत्ती बळकावलेली असते. त्यामुळे तो राजाला ठार मारण्यासाठी आलेला असतो. पण राजाच्या सैनिकांनी त्याच्यावर हल्ला केलेले असतो. राजा मोठ्या मनाने त्याला माफ करतो आणि भावाची घेतलेली सर्व संपत्ती त्याला देऊन टाकतो.

यावेळी साधु त्याला त्याच्या तीन प्रश्नांची आठवण करुन देतो व तुला योग्य उत्तरे मिळाल्याचेही सांगतो. गोंधळलेला राजा याचे स्पष्टीकरण विचारतो, तेव्हा साधू पुढीलप्रमाणे उत्तरे देत्तो:

१)      सत्कर्म आचरणात आणण्यासाठीची योग्य वेळ म्हणजे प्रत्येक क्षण होय.

२)      सत्कर्म आचरणात आणताना अन्य कोणाचावर सल्ला घेण्यापेक्षा स्वतःच्या सदसदविवेकबुद्धीने निर्णय घेणे होय.

३)      सत्कर्म आचरणात आणण्यासाठीची सर्वात महत्त्वाची कृती म्हणजे नेहमी चांगुलपणाने वागणे होय.

अशाप्रकारे ज्यावेळी जखमी माणूस मतीसाठी आलेला आहे, ती सत्कर्म आचरणात आणण्यासाठीची योग्य वेळ आहे. अशा व्यक्तीला मदत करावी, असा राजाच्या मनाने जो सल्ला दिलेला आहे तोच योग्य आहे. आणि अशा व्यक्तीची केलेली शुश्रुषा व त्याला केलेली क्षमा ही सत्कर्म आचरणातील सर्वात महत्त्वाची कृती आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आता खाली दिलेल्या लिंकवर जाऊन क्विझ सोडवण्याचा प्रयत्न करा. सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत ही क्विझ पुनःपुन्हा सोडवत रहा. सर्व उत्तरे बरोबर आल्यावर संपूर्ण क्विझ आणि वरील प्रश्नोत्तरे आपल्या वहीमध्ये लिहून काढा.

https://forms.gle/FfuPz9KWkHdYss7U8

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 

Comments

Popular posts from this blog

Internal Evaluation_Winter Semester_2024-25

  Winter Semester Internal Evaluation 2024-25 Dept. of English सूचना : १.         सर्व विद्यार्थ्यांनी आपले अंतर्गत मूल्यमापनाचे काम दि. ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२४ यादरम्यान पूर्ण करायचे आहे. यानंतर कोणाचेही होम असाइनमेंट/सेमिनार/ग्रुप अॅक्टिव्हिटी स्वीकारली/घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. २.         होम असाइनमेंट/सेमिनार यासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या वह्यांचाच वापर करावा. सदर वह्या महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. ३.           बीए/बीकॉम भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप अॅक्टिव्हिटीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. बीए भाग दोन :  English (Compulsory): 9975669140 बीए भाग दोन :  English (Optional): 9890355376 बी कॉम भाग दोन :  English: 9766188306 Class: BA I                            1.   Subject: English (AEC)    ...

Serpent Lover

  (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) The Serpent Lover                                               -     A. K. Ramanujan ए. के. रामानुजन हे इंग्रजीतून लेखन करणारे एक महत्त्वाचे भारतीय लेखक आहेत. त्यांची ओळख ही मुख्यत्वे एक कवी म्हणून आहे. भारतीय लोककथांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी भारतीय , विशेषतः कन्नड लोककथा गोळा करण्यामध्ये व्यतीत केली आहेत. प्रस्तुतची कथा ‘ The Serpent Lover ’ ही अशीच एक कन्नड लोककथा आहे. ही कथा त्यांच्या ‘ A Flowering Tree’ या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. कामाक्षी नावाची एक तरुण स्त्री या कथेची नायिका आहे. कामाक्षीचे एका तरूणाबरोबर लग्न झाले आहे. पण हा तरुण बाहेरख्याली असून त्याचे अन्य एका स्त्रीसोबत (concubine— विवाहबाह्य संबंध असणारी स्त्री) ) संबंध आहेत. कामाक्षीला याची कल्पना आहे. एक दिवस आपला नवरा आपल्याकडे परत येईल , या आशेवर ती जगत आहे. अशीच २-३ वर्षे गेल्यानंतर , ...

Model Millionaire

  (e-content developed by Prof (Dr) N A Jarandikar) ‘ The Model Millionaire’ ‘द मॉडेल मिलियनेअर’ (‘ The Model Millionaire’ /आदर्श लखपती) ही कथा ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) या लेखकाने लिहिलेली आहे. कोणताही हेतू न बाळगता चांगल्या मनाने केलेली मदत ही अनमोल कशी असते, याविषयीची ही गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये पुढील पात्रे आहेत : १.        ह्युई अर्सकाईन ( Hughie Erskine): हा या कथेचा नायक आहे. २.        अॅलन ट्रेव्हर ( Alan Trevor ) : हा एक चित्रकार आणि ह्युईचा मित्र आहे. ३.        बॅरन हाऊजबर्ग ( Baron Hausberg ) : हा अॅलन ट्रेव्हरसाठी मॉडेल म्हणून काम करतो आहे. ४.        लॉरा मेर्टन ( Laura Merton ): ही ह्युईची प्रेयसी आहे. ही कथा लंडन शहरामध्ये घडते. ह्युई अर्सकाईन हा एक तरुण आणि रुबाबदार युवक आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे : 1. wonderfully good looking; 2. crisp brown hair; 3. clear-cut profile; 4. grey eyes. त्याच्या वडलांनी त्यांच्या पश्चात आ...