Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: Cup of Tea

Saturday 28 September 2024

Cup of Tea

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar)

A Cup of Tea

                                                                —Katherine Mansfield

कथेतील पात्रे :

·         रोझमेरी फेल (Roesemary Fell) : कथेची नायिका

·         फिलीप (Philip) : रोझरीचा नवरा

·         मिस स्मिथ (Miss Smith) : रोझमेरीला रस्त्यावर भेटलेली एक गरीब मुलगी

*     *     *

कॅथरीन मॅन्सफिल्ड (Katherine Mansfield) या न्युझीलंडमधील लेखिका आहे. ‘अ कप ऑफ टी ही त्यांची एक गाजलेली कथा आहे. समाजातील गरीब-श्रीमंत वर्गातील दरी, श्रीमंत वर्गाचा खोटेपणा आणि स्त्रीसुलभ मत्सर (jealousy) याबद्दल या कथेतून भाष्य करण्यात आले आहे.

      रोझमेरी फेल ही या कथेची नायिका आहे. ती तरुण आहे. ती दिसायला फारशी सुंदर नसली तरी, ती अतिशय हुशार आणि कमालीची आधुनिक आहे. तिला वाचनाची आवड आहे. दोन वर्षापूर्वी तिचे लग्न झाले आहे. तिच्या नवऱ्याचे नाव फिलीप (Philip) असे आहे. तो अतिशय देखणा आणि रुबाबदार आहे. लेखिकेने त्याचे वर्णन “a duck of boy” असे केलेले आहे. हे दाम्पत्य अतिशय श्रीमंत आहे. हे इतके श्रीमंत आहेत की रोझमेरीने जर मनात आणले तर ती नुसती खरेदी करण्यासाठी पॅरीसला जाऊ शकते.

      एका हिवाळ्यात दुपारच्या वेळी रोझमेरी शॉपिंगसाठी बाहेर पडते. ती तिच्या कर्झन स्ट्रीटवरील (Curzon Street) नेहमीच्या जुन्या वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानात (antique shop) येते. यावेळी दुकानदार तिला एक छोटीशी डबी (a little box) दाखवतो. दुकानदाराने आत्तापर्यंत ही डबी अनमोल असल्याने कोणालाच दाखवलेली नाही. त्या छोट्या डबीवर एक सुंदर चित्र कोरलेले आहे. त्यावर एक तरुण आणि तरुणी आहे. तो तरुण एका बहर आलेल्या झाडाखाली उभा आहे आणि तरुणीने आपले हात त्याच्या गळ्यात टाकलेले आहेत. तरुणीने एक टोपी घातलेली आहे. तिच्या ड्रेसवर फुले आहेत. टोपीला हिरव्या रंगाच्या रिबन्स (ribbons) आहेत. आणि त्या दोघांच्या डोक्यावर गुलाबी रंगातील एक पंख असलेला देवदूत (pink cherub) उभा आहे. हे एवढे सगळे कोरीवकाम त्या डबीच्या टोपणावर केलेले आहे. या डबीची किंमत दुकानदार २८ गिनीज (28 guineas) असल्याचे सांगतो. रोझमेरीला डबी आवडते, परंतु एका छोट्या डबीची तिला किंमत जास्त वाटते. ती दुकानदाराला डबी तिच्यासाठी बाजूला ठेवायला सांगते आणि दुकानातून बाहेर पडते.

      बाहेर पाऊस पडत असतो. कडाक्याची थंडी पडलेली असते. आपल्या गाडीची वाट पहात असताना रोझमेरीला एक तिच्याच वयाची मुलगी भेटते. ती सडपातळ आणि सावळ्या रंगाची (thin, dark young girl) असून अतिशय गरीब आहे. ती रोझमेरीकडे चहासाठी पैशाची मागणी करते. रोझमेरी क्षणभर विचार करते आणि तिला आपल्याबरोबर घरी चहा घेण्यासाठी बोलावते. यामागे रोझमेरीला तिची कणव आलेली नसून तिला हा अनुभव म्हणजे एक साहसी कृत्य (adventure) वाटते, एखाद्या कादंबरीतील प्रसंगासारखे वाटते. शिवाय तिला हा अनुभव तिच्या पार्ट्यांमध्ये रंगवून रंगवून सांगायचा आहे. त्या मुलीला प्रथम असे वाटते की रोझमेरी आपल्याला पोलिसांच्या ताब्यात देईल. पण रोझमेरी तिला आपला तसला काही उद्देश नसल्याचे सांगते. मुलीचा तिच्यावर विश्वास बसतो आणि ती रोझमेरीच्या गाडीत बसून तिच्या प्रशस्त बंगल्यामध्ये कपभर चहा पिण्यासाठी येते. तिचा बंगला पाहून ती मुलगी भांबावून जाते. हे पाहून रोझमेरी आतून खूप खुश होते. आता हिला जेवायला पण थांबवायचे असा आता ती विचार करू लागते.

      ती मुलगी चहा पित असतानाच रोझमेरीचा नवरा (फिलीप) येतो. अनोळख्या मुलीकडे पाहून तो गोंधळून जातो. तो तिचे नाव विचारतो. ती आपले नाव मिस स्मिथ (Miss Smith) असल्याचे सांगते. फिलीप रोझमेरीला आपल्यासोबत त्यांच्या घरातील लायब्ररीमध्ये चलण्याची विनंती करतो. तिथे तो रोझमेरीला हा काय प्रकार असल्याचे विचारतो. त्यावर रोझमेरी सगळी हकीकत त्याला सांगते. कथा-कादंबऱ्यामध्येदेखील असंच घडते, असे ती फिलीपला सांगते.

      याठिकाणी आता गोष्टीला कलाटणी (twist) मिळते. इथे फिलीप रोझमेरीला सांगतो की तू वेडी (mad) आहेस, आणि तू म्हणतेस तसे काही काही घडणे शक्य नाही. रोझमेरी म्हणते मला ठाऊक होतं की तू असेच काहीसं बोलणार. तर फिलीप पटकन म्हणतो की अगं पण ती किती सुंदर आहे (“astonishingly pretty!...absolutely lovely!”). तिला बघून मी अगदी चकित झालो (“bowled over”).  आता ही गोष्ट रोझमेरीच्या काही ध्यानातच आली नव्हती. आपला नवरा एका दुसऱ्या मुलीचे कौतुक करतोय म्हटल्याबरोबर रोझमेरीचा मत्सर जागा होता. फिलीप तिला विचारतो की मिस स्मिथ जेवायलापण थांबेल का? खरेतर रोझमेरी तिला जेवायलाच थांबवणार होती. पण फिलीपकडून असे कौतुक झाल्याने, रोझमेरीचा अगदी जळफळाट होतो. पटकन ती आपल्या खोलीमध्ये जाते. पहिल्यांदा चेकबुक (cheque book) हातात घेते. मग विचार करते चेक कशाला द्यायला हवा? मग ती पाच पाऊंडच्या (5 pounds) नोटा काढते. पण पुन्हा मग त्यातल्या दोन ठेवून देते आणि मिस स्मिथकडे जाते.

      एक अर्ध्या तासाने रोझमेरी पुन्हा लायब्ररीमध्ये जाते. फिलीप तिथेच बसलेला असतो. रोझमेरीने आता थोडा मेकअपदेखील केलेला आहे, गळ्यात मोत्याची माळ घातलेली आहे. मिस स्मिथ जेवायला थांबायला तयार नसल्याचे ती फिलिपला सांगते. जाण्याचा हट्ट केल्याने मिस स्मिथला थोडे पैसे देऊन जाऊ दिल्याचेही ती सांगते. एवढे बोलून ती फिलिपला पटकन मी तुला आवडते का म्हणून विचारते. फिलीप तिला भयानक आवडत असल्याचे सांगतो “I like you awfully”). मग ती हळूच दुकानात पाहिलेल्या डबीबद्दल सांगते. डबीची किंमत सांगून ती मी विकत घेऊ का असे विचारते. यालाही फिलीप पटकन होकार देतो. आणि मग इतका वेळ मनात खदखदणारा प्रश्न ती फिलिपला विचारते, “मी सुंदर आहे ना?” (“am I pretty?”) आणि इथेच गोष्ट संपते.   

*     *     *

आता खाली दिलेल्या लिंकच्या आधारे प्रश्नमंजुषा सोडवा. जोपर्यंत सर्व उत्तरे बरोबर येत नाहीत, तोपर्यंत प्रश्नमंजुषा पुनःपुन्हा सोडवत रहा. सर्व उत्तरे बरोबर आल्यानंतर प्रश्नमंजुषा आपल्या वहीमध्ये लिहून काढा.

https://forms.gle/94Toh8fkwLkMJFFS6

*     *     *

Q. 1. Discuss the character of Rosemary Fell.

          Rosemary Fell is a main character in ‘A Cup of Tea’. The story is written by Katherine Mansfield. Rosemary is a young woman. She is not beautiful. But she is brilliant and modern. She is a well-read person. She is married to Philip two years ago. She is very rich. She could go to Paris to buy a thing.

Rosemary Fell meets a young lady in the street. Her name is Miss Smith. She is very poor. She asks Rosemary for money so that she can have a cup of tea. It is very cold outside. Rosemary considers it as an adventure. She wants to tell the story in her party. She impresses Smith with her car, bungalow. But when Mr.  Philip looks at Miss Smith, he is impressed by her beauty. He tells Rosemary that she is astonishingly pretty. So, Rosemary feels jealous of Miss Smith. She wanted to ask Miss Smith about dinner. But now she has changed her mind. She gives some money to Miss Smith and says goodbye.

In this way, through the character of Rosemary, the writer has commented on the rich-poor class divide, the hypocrisy of the rich class and the instinct of jealousy.

Q. 2 Write a short note on a little box seen by Rosemary.

Once Rosemary visits a shop. Antique things are sold in this shop. Rosemary is a regular customer of this shop. This time the shopkeeper shows her one little box. It is a shiny metal box. There is beautiful carving on the lid of the box. There are two young people on it. The young man is standing under a tree. The young lady is standing behind him. The lady had put her arms around the neck of the young man. The lady is wearing a hat. The hat has green ribbons. There are flowers on her dress. Rosemary loves this little box. The price of the box is 28 guineas.

      *     *     *

 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Comedy of Errors_Short Notes

  (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) Egeon Egeon is an important character from the play ‘The Comedy of Errors’. He is a m...