Skip to main content

Phonology (3)

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar)

Primary Stress

·         stress म्हणजे आघात. इंग्रजीमध्ये प्रत्येक शब्दातील विशिष्ट भाग हा अधिक जोर देऊन उच्चारला जातो.

·         उदा. examiNATION या शब्दामध्ये NATION हा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक जोर देऊन उच्चारला जातो. यालाच stress असे म्हटले जाते.

·         Stress एकपेक्षा अधिक असू शकतात. पण सध्या आपण एकाच stress वर भर देणार आहोत. यालाच primary stress असे म्हटले जाते.

·         शब्दातील पहिला/दुसरा भाग याला syllable असे म्हटले जाते.

·         कोणत्याही शब्दामध्ये phoneme हा सर्वात लहान घटक असतो. Phonemes एकत्र येऊन एक syllable तयार होते. आणि syllables एकत्र येऊन एक शब्द (morpheme) तयार होतो.

·         Syllable मध्ये किमान एक vowel असणे गरजेचे असते.

·         ज्या शब्दामध्ये एकच syllable असते, अशा शब्दांना monosyllabic words म्हटले जाते.

·         Primary stress दाखवण्यासाठी त्या शब्दातील जे syllable आघात देऊन उच्चारायचे आहे, त्यावरती एक उभी रेष मारली जाते. उदा. exami ׀nation

·         त्यामुळे या शब्दाचे transcription आणि primary stress हा पुढीलप्रमाणे लिहिला जातो : / ɪɡzæmɪˈneɪʃn / परीक्षेमध्ये आपल्याला या पद्धतीने लिहायचे आहे.

·         Primary stress देण्याबाबतचे काही नियम ठरलेले आहेत. यातील काही महत्वाचे नियम पाहूया.

१.      दोन syllable असणाऱ्या बहुतांश noun आणि adjective मध्ये Primary stress हा पहिल्या syllable वर असतो.

उदा. ׀sample; ׀purple; ׀rainy

२.        दोन syllable असणाऱ्या बहुतांश verb आणि preposition मध्ये Primary stress हा दुसऱ्या syllable वर असतो.

उदा. re׀lax; re׀ceive; de ׀ cide

३.      एकच शब्द हा noun आणि verb म्हणून काम करत असेल तर noun साठी primary stress हा पहिल्या syllable वर येतो आणि verb साठी primary stress हा दुसऱ्या syllableवर येतो.

उदा. ׀object (N); ob׀ject (V)

४.      Suffix rules: खालील suffixes साठी त्या suffix पूर्वीच्या syllable वर primary stress येतो.

उदा. ial:  ׀social; fina׀ncial

    cian: mu׀sician; phy׀sician

—ian: co׀median; tech׀nician

—ible: im׀possible; ׀terrible

—ion: classifi׀cation; compe׀tition

—ia: bac׀teria; Vic׀toria  

५.      monosyllabic words मध्ये stress mark दिला जात नाही.

 

Sl. No.

Spelling

Transcription

Sl. No.

Spelling

Transcription

1.

college

/׀kɒlɪʤ

2.

knowledge

/׀nɒlɪʤ/

3.

village

/׀vɪlɪʤ:/

4.

nation

/׀neɪʃn/

5.

election

/ɪ ׀lekʃn/

6.

pension

/׀penʃn/

7.

development

/dɪ ׀veləpmənt/

8.

compartment

/kəm ׀pɑːtmənt/

9.

entertainment

/entə ׀teɪnmənt/

10.

pillow

/׀pɪləʊ/

11.

glow

/ɡləʊ/

12.

throw

/θrəʊ/

13.

tight

/taɪt/

14.

flight

/flaɪt/

15.

slight

/slaɪt/

16.

sample

/׀sæmpl/

17.

purple

/׀pəːpl/

18.

rainy

/׀reɪnI/

19.

relax

/rɪ׀læks/

20.

decide

/ ׀ saɪd/

21.

social

/ˈsəʊʃl/

22.

financial

/ faɪˈnænʃl/

23.

musician

/ mjuːˈzɪʃn/

24.

comedian

/kəˈmiːdiən/

25.

technician

/tekˈnɪʃn/

26.

impossible

/ɪmˈpɒsəbᵊl/

27.

terrible

/ˈterəbᵊl/

28.

classification

/klæsɪfɪˈkeɪʃᵊn/

29.

bacteria

/bækˈtɪəriə/

30.

Object (N)

/ˈɒbʤɪkt/

 

Object (V)

/əbˈʤɛkt/

 

·        परीक्षेमध्ये या अनुषंगाने पुढील दोन प्रश्न असतील :

Q. 1 b) Transcription of words with primary stress             (03 marks)

(यामध्ये वरीलप्रमाणे शब्दांचे transcription आणि primary stress देणेचा आहे.)

Q. 1 c) Conversion of the given transcriptions into conventional spellings.

(02 marks)

(यामध्ये दिलेल्या transcription च्या आधारे स्पेलिंग लिहायचे आहे.)

EXERCISE:

Q. Transcribe the given words. Give primary stress mark.

1. Sunday;            2. Tuesday            3. Wednesday                 4. Today

5. January            6. May                  7. November                   8. Month

9. music               10. Guitar             11. Instrument               12. Drum

13. computer        14. Mobile            15. Printer                      16. Mouse

17. lovely              18. Early              19. Swiftly                      20. Daily

 

(आपण केलेले transcriptionबरोबर आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी पुढील वेबसाईटची मदत घ्या : https://tophonetics.com)

*     *     *     *     *

Comments

Popular posts from this blog

Internal Evaluation_Winter Semester_2024-25

  Winter Semester Internal Evaluation 2024-25 Dept. of English सूचना : १.         सर्व विद्यार्थ्यांनी आपले अंतर्गत मूल्यमापनाचे काम दि. ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२४ यादरम्यान पूर्ण करायचे आहे. यानंतर कोणाचेही होम असाइनमेंट/सेमिनार/ग्रुप अॅक्टिव्हिटी स्वीकारली/घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. २.         होम असाइनमेंट/सेमिनार यासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या वह्यांचाच वापर करावा. सदर वह्या महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. ३.           बीए/बीकॉम भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप अॅक्टिव्हिटीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. बीए भाग दोन :  English (Compulsory): 9975669140 बीए भाग दोन :  English (Optional): 9890355376 बी कॉम भाग दोन :  English: 9766188306 Class: BA I                            1.   Subject: English (AEC)    ...

Serpent Lover

  (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) The Serpent Lover                                               -     A. K. Ramanujan ए. के. रामानुजन हे इंग्रजीतून लेखन करणारे एक महत्त्वाचे भारतीय लेखक आहेत. त्यांची ओळख ही मुख्यत्वे एक कवी म्हणून आहे. भारतीय लोककथांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी भारतीय , विशेषतः कन्नड लोककथा गोळा करण्यामध्ये व्यतीत केली आहेत. प्रस्तुतची कथा ‘ The Serpent Lover ’ ही अशीच एक कन्नड लोककथा आहे. ही कथा त्यांच्या ‘ A Flowering Tree’ या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. कामाक्षी नावाची एक तरुण स्त्री या कथेची नायिका आहे. कामाक्षीचे एका तरूणाबरोबर लग्न झाले आहे. पण हा तरुण बाहेरख्याली असून त्याचे अन्य एका स्त्रीसोबत (concubine— विवाहबाह्य संबंध असणारी स्त्री) ) संबंध आहेत. कामाक्षीला याची कल्पना आहे. एक दिवस आपला नवरा आपल्याकडे परत येईल , या आशेवर ती जगत आहे. अशीच २-३ वर्षे गेल्यानंतर , ...

Model Millionaire

  (e-content developed by Prof (Dr) N A Jarandikar) ‘ The Model Millionaire’ ‘द मॉडेल मिलियनेअर’ (‘ The Model Millionaire’ /आदर्श लखपती) ही कथा ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) या लेखकाने लिहिलेली आहे. कोणताही हेतू न बाळगता चांगल्या मनाने केलेली मदत ही अनमोल कशी असते, याविषयीची ही गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये पुढील पात्रे आहेत : १.        ह्युई अर्सकाईन ( Hughie Erskine): हा या कथेचा नायक आहे. २.        अॅलन ट्रेव्हर ( Alan Trevor ) : हा एक चित्रकार आणि ह्युईचा मित्र आहे. ३.        बॅरन हाऊजबर्ग ( Baron Hausberg ) : हा अॅलन ट्रेव्हरसाठी मॉडेल म्हणून काम करतो आहे. ४.        लॉरा मेर्टन ( Laura Merton ): ही ह्युईची प्रेयसी आहे. ही कथा लंडन शहरामध्ये घडते. ह्युई अर्सकाईन हा एक तरुण आणि रुबाबदार युवक आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे : 1. wonderfully good looking; 2. crisp brown hair; 3. clear-cut profile; 4. grey eyes. त्याच्या वडलांनी त्यांच्या पश्चात आ...