- आता स्पेलिंगवरून त्या शब्दाचा उच्चार लिहून कसा दाखवायचा (यालाच Transcription असे म्हणतात) ते पाहू.
१.
Pot: या शब्दामध्ये एकूण तीन ध्वनी
आहेत – प्+ऑ+ट्. यासाठी आपण पुढील IPA symbols वापरतो : /p/+/ɔ/+/t/. त्यामुळे दिलेल्या शब्दाचे
Transcription
खालीलप्रमाणे होईल :
/pɔt/
२.
Catch: ध्वनी : क्+अॅ+च् ; IPA symbols: /k/+/æ/+/tʃ/
Transcription: /kætʃ/
३.
Tough: ध्वनी : ट+अ+फ ; IPA symbols: /t/+/ʌ/+/f/ (स्पेलिंगमध्ये o चा उच्चार अ असा होत असल्याने /ʌ/ हे phoneme वापरलेले आहे.)
Transcription: /tʌf/
४.
Curve: ध्वनी : क्+अ (दीर्घ)+व्ह् ; IPA symbols: /k/+/ə:/+/v/ (‘अ’ नंतर स्पेलिंगमध्ये r येत असल्याने दीर्घ अ
हे vowel
वापरले आहे.)
Transcription: /kə:v/
५.
Thank: ध्वनी : थ्+अॅ+ङ्+क् ; IPA symbols: /θ/+/æ/+/ŋ/+/k/ (अनुस्वारासाठी /ŋ/ हे व्यंजन वापरले आहे.)
Transcription: /θæŋk/
६.
They: ध्वनी : द्+एइ ; IPA symbols: /ð/+/eI/ (स्पेलिंगमध्ये e आहे आणि त्यानंतर y असल्याने dipthong वापरला आहे.)
Transcription: /ðeI/
७.
Zero: ध्वनी : झ्+इ+र्+अऊ ; IPA symbols: /z/+/I/+/r/+/əU/ (मराठीतील ओ आल्यामुळे अउ
हा स्वर वापरला आहे.)
Transcription: /zɪərəʊ/
८.
Shop: ध्वनी : श्+ऑ+प् ; IPA symbols: /ʃ
/+/ɒ/+/p/
Transcription: /ʃɒp/
९.
Pleasure: ध्वनी : प्+ल्+ए+झ्य्+अ ; IPA symbols: /p/+/l/+/e/+/ʒ/+/ə/ (शब्दाच्या
शेवटी र आल्याने उच्चार नाही.)
Transcription: /pleʒə/
१०.
Wait: ध्वनी : व्+एइ+ट् ; IPA symbols: /w/+/eɪ/+/t/ (स्पेलिंगमध्ये
a
आहे आणि उच्चार ए असा होत असल्याने diphthong वापरला आहे.)
Transcription : /weɪt/
११.
Yellow: ध्वनी : य्+ए+ल्+अउ ; IPA symbols: /j/+/e/+/l/+/əʊ/ (मराठीतील ओ उच्चारासाठी diphthong वापरला आहे.)
Transcription: /jeləʊ/
१२.
Feet: ध्वनी : फ्+ई+ट् ; IPA symbols: /f/+/iː/+/t/
Transcription: /fiːt/
१३.
Tall: ध्वनी : ट्+ऑ (दीर्घ)+ल् ; IPA symbols: /t/+/ɔː/+/l/
Transcription: /tɔːl/
१४.
Sky: ध्वनी : स्+क्+आई ; IPA symbols: /s/+/k/+/aɪ/
Transcription: /skaɪ/
१५. High: ध्वनी : ह्+आई ; IPA symbols: /h/+/aɪ/ (मराठीमध्ये या शब्दाचा उच्चार आपण हाय असा करतो. शेवटी य
येत असल्याने आई हा diphthong वापरला आहे.)
Transcription: /haɪ/
१६. Boy: ध्वनी : ब्+ऑई ; IPA symbols: /b/+/ɔɪ/
Transcription: /bɔɪ/
१७. Slow: ध्वनी : स्+ल्+अऊ ; IPA symbols: /s/+/l/+/əʊ/ (मराठीमध्ये ओ हा स्वर येत असल्याने अऊ हा diphthong वापरला आहे.)
Transcription: /sləʊ/
१८. Tear: ध्वनी : ट्+इअ ; IPA symbols: /t/+/ɪə:/
Transcription: /tɪə:/
१९. doer: ध्वनी : ड्+उअ ; IPA symbols: /d/+/uə/
Transcription: /duə/
२०. hair: ध्वनी : ह+एअ ; IPA symbols: /h/+/eə/
Transcription: /heə/
Exercise: Transcribe the following words:
1. college; 2. Knowledge;
3. Village;
4. nation; 5. Election;
6. Pension;
7. development; 8. Compartment;
9. Entertainment;
10. pillow; 11. Glow;
12. Throw;
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.