Q. 5 B II) Morphological Analysis
Morphological Analysis करण्यासाठी खालील गोष्टी माहित करून घ्या :
सर्वप्रथम दिलेल्या शब्दाचा word class माहित करून घ्या. उदा. Noun, verb, adjective, adverb. हे ओळखण्यासाठीचे काही सर्वसाधारण नियम पुढीलप्रमाणे आहेत :
Noun:
१. Noun चे -s/-es लावून अनेकवचन होऊ शकते. उदा. Boys; villages; chairs
२. -tion शब्द हे noun वर्गातील असतात. उदा. Examination; competition; generation (Verb ला -tion लावल्यानंतर noun तयार होते.)
३. -ment; -ness हे शब्द noun वर्गातील असतात. उदा. Development; enjoyment; happiness; kindness
Adjective:
१. -er/-est लागणारे शब्द हे adjective असतात. उदा. Taller; tallest
२. -al हे शब्द adjective वर्गातील असतात. उदा. Musical; natural (Noun ला -al लावल्यानंतर adjective मिळते)
Verb:
१. -ize/-ify हे शब्द verb असतात. उदा. Modernize; simplify
२. -en/-ate हे शब्द verb असतात. उदा. Widen; originate
Adverb:
१. -ly हे शब्द सहसा adverb असतात. उदा. Slowly; happily (Adjective ला -ly लावल्यानंतर Adverb मिळते.)
Morphological Analysis मध्ये prefix/suffix लावून तयार झालेल्या शब्दाचा मूळ शब्द शोधण्यात येतो. उदा. Development या शब्दामध्ये ‘develop’ हा मूळ शब्द असून -ment हा suffix आहे. या मूळ शब्दाला ‘root’ असे म्हटले जाते.
काही वेळेला एका पेक्षा अधिक suffx जोडले जातात किंवा एखाद्या शब्दाला prefix आणि suffix दोन्ही जोडले जातात. उदा. recharging. येथे charge हा root word आहे आणि याला re- हा prefix व -ing हा suffix जोडला आहे. अशा वेळी charge पासून प्रथम charging हा शब्द बनतो व charging पासून recharging हा शब्द बनतो. त्यामुळे जो मधला शब्द येतो त्याला आपण stem असे म्हणतो.
यातील root word ला free morpheme असे म्हटले जाते, तर prefix/suffix ला bound morpheme असे म्हटले जाते.
आता खालीं दिलेली tree diagram पहा :
Prefix हे दोन प्रकारचे असतात : class changing आणि class maintaining
उदा. Discharge हा शब्द verb म्हणून काम करतो. यामध्ये -dis हा prefix आहे, तर charge हा root word आहे. Charge हा शब्ददेखील verb म्हणून काम करतो. याचाच अर्थ prefix जोडल्यानंतर discharge या शब्दाचा class बदलत नाही. म्हणून -dis हा prefix class maintaining आहे.
Encourage हा शब्द verb म्हणून काम करतो. यामध्ये -en हा prefix आहे, तर courage हा root word आहे. Courage हा शब्द noun म्हणून काम करतो. याचाच अर्थ prefix जोडल्यानंतर encourage या शब्दाचा class बदलतो. म्हणून -en हा prefix class changing आहे.
Suffix हे दोन प्रकारचे असतात : inflectional आणि derivational.
Inflectional Suffix हे प्रत्यय व्याकरणासंदर्भाने noun, verb आणि adjective/adverb या शब्दांना जोडले जातात. उदा. अनेकवचन करणे (villages); काळ बदलणे (working); degree बदलणे (taller). हे प्रत्यय जोडल्यानंतर शब्दांचा अर्थ बदलत नाही.
Villages - Village: root word; -es: inflectional suffix
Working: work: root word; -ing:inflectional suffix
Taller : tall: root word; -er: inflectional suffix
Derivational Suffix : हे पुन्हा prefix प्रमाणे दोन प्रकारचे असतात : class changing आणि class maintaining
class changing derivational suffix: happiness या शब्दामध्ये happy हे root word आहे, तर -ness हे suffix आहे. Happiness शब्दाचा class हा noun आहे, तर happy शब्दाचा class हा adjective आहे. याचाच अर्थ -ness हा suffix जोडल्यानंतर happiness या शब्दाचा class बदलतो. म्हणून -ness हा class changing derivational suffix आहे.
class maintaining derivational suffix: friendship या शब्दामध्ये friend हे root word आहे, तर -ship हे suffix आहे. Friendship या शब्दाचा class हा noun आहे, friend या शब्दाचा class सुद्धा noun आहे. याचाच अर्थ -ship हा suffix जोडल्यानंतर friendship या शब्दाचा class बदलत नाही. म्हणून -ship हा class maintaining derivational suffix आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.