(e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar)
The poem ‘The Seven Stages’ is written by Meena Kandasamy. Meena Kandasamy is the Indian poet.Caste issues and gender inequality are the main themes of her poetry.
The poem ‘The Seven Stages’ deals with a sad love story. This story may happen in any part of India. The lovers are cursed by the caste issues. The society does not accept their marriage, and they are killed brutally. In one sense, the poem brings forward the issue of ‘honour killing’ in India.
The poem begins with a warning to the beloved, her lover and the readers.
The poet warns the beloved not to lose her love and the lover.
The poet asks the lover not to ignore her advice about the precious love, not to lose his love.
The poet asks the readers to consider the tragic incident as a dream. She asks them to defy this dream.
At the beginning of the poem, the poet refers to the seven stages of love as cherished by Sufi tradition. These seven stages of love are as follows:
Hub (Attraction)
In (Infatuation)
Ishq (Love)
Aquidat (Trust)
Ibadat (Worship)
Junoon (Madness)
Maut (Death)
According to the poet a love story begins with attraction, infatuation and love. Here a silent man falls in love with a talkative girl.
After the third stage, the society enters the story along with ‘caste code’. That means the lovers belong to the different castes and society is against it. The lovers are separated by society for two years. But this separation of lovers goes through the stages of trust, worship and then madness.
Out of this junoon or madness, the lovers become rebels. They throw away the barriers of society. They elope and get married.
However, they are constantly under threat from society. So they prefer to live underground like rabbits. But society doesn’t spare them. The society discovers them and they are slaughtered. This is how comes the final stage of their love: death. The lovers tried to defy the social conventions, but they were defeated and died.
But the poet appeals to take this sad story as a dream, and try to ‘turn it on its head’. The honour killing is a reality in our society. But the poet appeals to change the mentality.
The seven stages of love are described in Sufi tradition. Here the love is between the devotee and God. Death refers to a state of self-dissolution where a devotee becomes one with God.
But in real life, the real love story follows the path of death literally and ends tragically.
* * * * *
कविता ‘द सेवन स्टेजेस’ ही मीन कंदसामी यांनी लिहिलेली आहे. मीन कंदसामी या भारतीय कवयित्री आहेत. जातिव्यवस्था आणि लैंगिक विषमता हे त्यांच्या कवितांचे मुख्य विषय आहेत.
‘द सेवन स्टेजेस’ ही कविता एका दु:खद प्रेमकथेवर आधारित आहे. अशी कथा भारतात कुठेही घडू शकते. या कवितेतील प्रेमी युगलाला जातीच्या बंधनाचा शाप लागतो. समाज त्यांच्या विवाहाला मान्यता देत नाही आणि त्यांना क्रूरपणे ठार मारले जाते. एका अर्थाने, ही कविता भारतातील ‘ऑनर किलिंग’चा मुद्दा समोर आणते.
कवितेची सुरुवात एक इशारा देऊन होते — प्रेयसीला, प्रियकराला आणि वाचकांना.
1. कवयित्री प्रेयसीला तिचं प्रेम आणि प्रियकर गमावू नकोस, असा इशारा देते.
2. कवयित्री प्रियकराला सांगते की, हे अमूल्य प्रेम गमावू नकोस; माझं म्हणणं दुर्लक्षित करू
नकोस.
3. कवयित्री वाचकांना सांगते की, ही शोकांतिका एक स्वप्न समजावी आणि त्या स्वप्नाला विरोध
करावा.
कवितेच्या सुरुवातीला कवयित्री सूफी परंपरेतील प्रेमाच्या सात टप्प्यांचा उल्लेख करते. हे टप्पे असे आहेत:
1. हब (आकर्षण)
2. इन (आवड)
3. इश्क (प्रेम)
4. अकीदत (विश्वास)
5. इबादत (पूजा)
6. जुनून (वेडेपणा)
7. मौत (मृत्यू)
कवयित्रीच्या मते, प्रत्येक प्रेमकथेची सुरुवात आकर्षण, आवड आणि प्रेम अशा पहिल्या तीन टप्प्यांनी होते. इथे एक अबोल माणूस एका बोलक्या मुलीवर प्रेम करतो.
पण तिसऱ्या टप्प्यानंतर समाज त्यांच्यात हस्तक्षेप करतो आणि जातीभेदाची भिंत उभी राहते. दोघे वेगवेगळ्या जातीतले असल्यामुळे समाज त्यांच्या विरुद्ध उभा राहतो. समाज त्यांना दोन वर्षांसाठी वेगळं करतो. पण या विरहातून त्यांच्या प्रेमाचा विश्वास, पूजा आणि शेवटी वेडेपणा अशा पुढील तीन टप्प्यांतून प्रवास होतो.
वेडेपणाच्या या टप्प्यावर ते बंडखोर बनतात. ते समाजाचे बंधन झुगारून देतात. ते पळून जाऊन लग्न करतात.
पण समाजाकडून त्यांना नेहमीच धोका असतो. म्हणून ते सशासारखे लपून राहतात. पण समाज त्यांना सोडत नाही. समाज त्यांना शोधून काढतो आणि ठार मारतो.
अशी ही प्रेमकथा शेवटी मृत्यू या अंतिम टप्प्याला पोहोचते. त्यांनी सामाजिक बंधनांचा विरोध केला, पण त्यांना हरवण्यात आलं आणि त्यांचा अंत झाला.
कवयित्री हे दु:खद सत्य एक स्वप्न मानायला सांगते आणि ते उलटवून टाकायला सांगते. ऑनर किलिंग ही आपल्या समाजातली एक कटू वास्तविकता आहे. पण कवयित्री मानसिकता बदलण्याचे आवाहन करते.
मूळ सूफी परंपरेतील सात टप्पे हे देव आणि भक्त यांच्यातील प्रेमाचे प्रतीक आहेत. मृत्यू म्हणजे भक्त देवामध्ये विलीन होतो, अशी अवस्था.
पण खरी प्रेमकथा प्रत्यक्ष मृत्यूकडे वाटचाल करते आणि दु:खदरीत्या संपते.
* * * * *
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.