Skip to main content

Word formation processes

 

Q. 5 B I) Identify the word formation process used in the underlined words in the following sentences. (5 sentences)                                                                                                           (05 Marks)

 

Ø The following are the word formation processes in English:

1.      Affixation

2.      Compounding

3.      Conversion

4.      Reduplication

5.      Clipping

6.      Blending

7.      Acronymy

 

1.      Affixation: एखाद्या शब्दाला prefix/suffix जोडण्याच्या प्रक्रियेला Affixation असे म्हणतात. या प्रक्रियेमध्ये ज्या शब्दाला prefix/suffix जोडले जातात, त्याला free morpheme असे म्हणतात; तर prefix/suffix यांना bound morpheme असे म्हणतात. free morpheme ला स्वतंत्रपणे वेगळा अर्थ असतो. bound morpheme ला स्वतंत्रपणे वेगळा अर्थ नसतो.

उदा.

prefix जोडलेले : charge: recharge; happy: unhappy; connect: disconnect;

 suffix जोडलेले : charge: charger; happy: happily; connect: connection

 prefix/suffix दोन्ही जोडलेले : operate: co-operation; success: unsuccessful 

 

2.      Compounding:  या प्रक्रियेमध्ये दोन किंवा अधिक free morphemes एकत्र येऊन नवीन शब्द तयार होतो.

उदा.

table + cloth = tablecloth;

wrist + watch = wristwatch;

flower + pot = flowerpot

 

3.      Conversion: यामध्ये कोणताही नवीन morpheme जोडला जात नाही. परंतु शब्दाची व्याकरणातील असणारी मूळ जात बदलते. म्हणजेच एखादे noun हे verb म्हणूनसुद्धा जेव्हा कार्य करते, तेव्हा या प्रक्रियेला conversion असे म्हणतात.

उदा.

i.                    My father gave me a present. (present = noun)

I presented my paper. (present = verb)

ii.                  He has a very lovely look. (look = noun)

We look before and after. (look = verb)

 

4.      Reduplication: यामध्ये एकसारख्या दिसणाऱ्या morphemes चे duplication किंवा repetition होत असते. काही वेळेस repetition होणारे morphemes हे एकसारखे असतात, तर काही वेळेस त्यामध्ये किरकोळ बदल केलेला असतो.

उदा.

bye-bye;

tick-tock;

ding-dong;

see-saw

 

5.      Clipping: यामध्ये वापराच्या सोयीसाठी मूळचा शब्द हा लहान बनवलेला असतो.

उदा.

laboratory: lab;

photograph: photo;

telephone: phone;

advertisement: ad

 

6.      Blending: यामध्ये दोन morphemes एकत्र करून, त्यापासून नवीनच शब्द बनवला जातो.

उदा.

breakfast + lunch = brunch;

information + entertainment = infotainment

 smoke + fog = smog

wireless + fidelity = Wi-Fi

 

7.      Acronymy: म्हणजेच short फॉर्म्स. यामध्ये प्रत्येक पहिल्या शब्दाची अद्याक्षरे घेतली जातात. सर्व अद्याक्षरे capital मध्ये लिहिला जातात. या अद्याक्षरानंतर full stop दिला जात नाही.

उदा.

State Bank of India: SBI

Cash on Delivery: CoD

Chartered Accountant: CA

Maharashtra Public Service Commission: MPSC

 

Comments

Popular posts from this blog

Internal Evaluation_Winter Semester_2024-25

  Winter Semester Internal Evaluation 2024-25 Dept. of English सूचना : १.         सर्व विद्यार्थ्यांनी आपले अंतर्गत मूल्यमापनाचे काम दि. ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२४ यादरम्यान पूर्ण करायचे आहे. यानंतर कोणाचेही होम असाइनमेंट/सेमिनार/ग्रुप अॅक्टिव्हिटी स्वीकारली/घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. २.         होम असाइनमेंट/सेमिनार यासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या वह्यांचाच वापर करावा. सदर वह्या महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. ३.           बीए/बीकॉम भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप अॅक्टिव्हिटीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. बीए भाग दोन :  English (Compulsory): 9975669140 बीए भाग दोन :  English (Optional): 9890355376 बी कॉम भाग दोन :  English: 9766188306 Class: BA I                            1.   Subject: English (AEC)    ...

Serpent Lover

  (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) The Serpent Lover                                               -     A. K. Ramanujan ए. के. रामानुजन हे इंग्रजीतून लेखन करणारे एक महत्त्वाचे भारतीय लेखक आहेत. त्यांची ओळख ही मुख्यत्वे एक कवी म्हणून आहे. भारतीय लोककथांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी भारतीय , विशेषतः कन्नड लोककथा गोळा करण्यामध्ये व्यतीत केली आहेत. प्रस्तुतची कथा ‘ The Serpent Lover ’ ही अशीच एक कन्नड लोककथा आहे. ही कथा त्यांच्या ‘ A Flowering Tree’ या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. कामाक्षी नावाची एक तरुण स्त्री या कथेची नायिका आहे. कामाक्षीचे एका तरूणाबरोबर लग्न झाले आहे. पण हा तरुण बाहेरख्याली असून त्याचे अन्य एका स्त्रीसोबत (concubine— विवाहबाह्य संबंध असणारी स्त्री) ) संबंध आहेत. कामाक्षीला याची कल्पना आहे. एक दिवस आपला नवरा आपल्याकडे परत येईल , या आशेवर ती जगत आहे. अशीच २-३ वर्षे गेल्यानंतर , ...

Model Millionaire

  (e-content developed by Prof (Dr) N A Jarandikar) ‘ The Model Millionaire’ ‘द मॉडेल मिलियनेअर’ (‘ The Model Millionaire’ /आदर्श लखपती) ही कथा ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) या लेखकाने लिहिलेली आहे. कोणताही हेतू न बाळगता चांगल्या मनाने केलेली मदत ही अनमोल कशी असते, याविषयीची ही गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये पुढील पात्रे आहेत : १.        ह्युई अर्सकाईन ( Hughie Erskine): हा या कथेचा नायक आहे. २.        अॅलन ट्रेव्हर ( Alan Trevor ) : हा एक चित्रकार आणि ह्युईचा मित्र आहे. ३.        बॅरन हाऊजबर्ग ( Baron Hausberg ) : हा अॅलन ट्रेव्हरसाठी मॉडेल म्हणून काम करतो आहे. ४.        लॉरा मेर्टन ( Laura Merton ): ही ह्युईची प्रेयसी आहे. ही कथा लंडन शहरामध्ये घडते. ह्युई अर्सकाईन हा एक तरुण आणि रुबाबदार युवक आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे : 1. wonderfully good looking; 2. crisp brown hair; 3. clear-cut profile; 4. grey eyes. त्याच्या वडलांनी त्यांच्या पश्चात आ...