(K.S.Powar)
िषय-व्यवस्थापनाची तत्त्वे आणि उपयोगिता
बी- काॅम 1 सेम 2
विषय- व्यवस्थापनाची तत्त्वे आणि उपयोगीता
घटक- कार्यप्रेरणा उपघटक - कार्यप्रेरणा व त्याचे महत्त्व
कार्यप्रेरणा व्याख्या- अपेक्षित ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करण्यास लोकांना उत्तेजित करण्याची प्रक्रीया म्हणजे कार्यप्रेरणा होय.
महत्त्व-
1-कार्यक्षमतेत वाढ
कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी कर्मचार्यांना योग्य प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
2-उत्पादनात वाढ
उत्पादनात वाढ होणे हे कोणत्याही व्यवसायासाठी महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कार्यप्रेरणा हा मूळ स्ञोत आहे
3-कर्मचार्यांचे सहकार्य
कर्मचार्यांचे सहकार्य मिळवण्यासाठी त्यांच्या बरोबर आपुलकीचे संबंध असणे गरजेचे असते.त्यामुळे काम करण्यासाठी निश्चित प्रेरणा मिळते.
4- निष्ठा व आत्मीयता
निष्ठा व आत्मीयता ही सुद्धा कर्मचार्यांचे सहकार्य मिळवण्यासाठी गरजेचेची आहे. पण ती दोन्ही कडून असली पाहिजे. त्यामुळे कर्मचार्यांना काम करण्याची प्रेरणा मिळते.
5- कौशल्याचा विकास
कर्मचार्यांचे कौशल्याचा विकास होण्यासाठी व्यवसायाने प्रशिक्षणाच्या विशेष सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
6-संबंधात सुधारणा
कर्मचार्यांरी व व्यवस्थापन यांच्यामध्ये योग्य सुसंवाद असला पाहिजे. त्याचा सकारात्मक परिणाम व्यवसायावर होतो.तसेच कंपणीची बाजारपेठातील प्रतिमा सुधारते.
7- उत्पादन खर्चात घट-
उत्पादन खर्चात घट होण्यासाठी कर्मचार्यांचे विशेष सहकार्य अपेक्षित असते. जर कर्मचार्यांनी पूर्ण क्षमतेने काम केले तर त्यामुळे उत्पादनखर्चात बचत होते.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.