िषय-व्यवस्थापनाची तत्त्वे आणि उपयोगिता
B.Com I Sem II
उपघटक- नेतृत्व व त्याचे प्रकार
व्याख्या- अपेक्षित उद्दिष्टे गाठण्यासाठी लोकांना संघटित करून त्या पूर्ती साठी प्रयत्न करणे होय.
नेतृत्वाचे प्रकार-
1 -लोकशाही नेतृत्वशैली-
लोकशाही नेतृत्वशैली ही सर्वार्थाने योग्य ठरते.यामध्ये व्यवस्थापन व कर्मचारी हे एकमेकांचे विचार करून निर्णय घेतात. त्यामुळे निर्णय योग्य ठरतात. तसेच व्यवस्थापक व कर्मचारी यांचे संबंध चांगले राहतात. या नेतृत्वशैली प्रकारात अन्याय होण्याची शक्यता कमी असते. पण काही वेळेला व्यवसाय संधीचा फायदा घेता येत नाही.
2-हुकूमशाही नेतृत्वशैली-
यामध्ये एकटा व्यवस्थापन वर्ग निर्णय घेतो. तसेच काही वेळा स्वतः चे हीत लक्षात घेवून निर्णय घेतला जावू शकतो. या नेतृत्वशैली प्रकारात कर्मचारी अस्वस्थ असतात.तसेच ते प्रामाणिक काम करण्याची शक्यता कमी असते. कारण कोणत्याही निर्णय प्रक्रियेत त्यांना विचारात घेतले जात नाही.
3- मुक्त नेतृत्वशैली-
ही नेतृत्वशैली व्यवस्थापन प्रक्रियेत अव्यवहार्य ठरते. या नेतृत्वशैली प्रकारात व्यवस्थापक व कर्मचारी या दोघांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते.त्यामुळे मनमानी व अनागोंदी निर्माण होण्याची दाट शक्यता असते. व्यवस्थापक व कर्मचारी यांचे समन्वय अजिबात राहत नाही.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.