Sunday, 27 June 2021

चलनवाढीवरील नियंत्रण (Control of Inflation)

 (J. D. Ingawale)

बीए. 2.      सेमी 4   पेपर 5         स्थूल अर्थशास्त्र

चलनवाढीवरील नियंत्रण (Control of Inflation)

    () द्रव्यविषयक उपाय अगर मुद्रानीती (Monetary Policy) चलनवाढ पैशाचा पुरवठा वाढल्याने निर्माण होते. अशा वेळी पैशाच्या एकूण पुरवठ्यावर नियंत्रण घालून लोकांची खरेदीशक्ती कमी करण्यासाठी सरकार देशातील मध्यवर्ती बँकेमार्फत पुढील चलनविषयक उपाय योजिते.

    . विधिग्राह्य चलन कमी करणे : देशातील मध्यवर्ती बँकेला चलननिर्मितीची मक्तेदारी प्राप्त झालेली असते. देशात चलनाचा पुरवठा आवश्यकतेपेक्षा अधिक होतो तेव्हा खर्च वाढून भाववाढीला चालना मिळते. अशा वेळी मध्यवर्ती बँक चलननिर्मिती कमी करते. काही वेळा जास्त किमतीच्या नोटा रद्द केल्या जातात. उदा. जनता राजवटीत भारतात १००० ५००० रुपये किमतीच्या नोटा रद्द केल्या होत्या त्यामुळे पैशाचे प्रमाण कमी होऊन भाववाढ रोखली जाते.

. बँकरेट वाढविणे : व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँक ज्या व्याजाच्या दराने कर्ज देते त्या आणि हुंड्याच्या पुनर्वटाव दराला बँकरेट म्हणतात. जेव्हा चलनवाढ होते तेव्हा मध्यवर्ती बँक बँकरेट वाढविते. साहजिकच व्यापारी बँका आपल्या कर्जावरील व्याजदरही वाढवितात. कर्जे महाग होतात. व्यापारी बँकांची पतनिर्मिती कमी होते. जुनी कर्जे परत केली जातात. अर्थव्यवस्थेतील एकंदर पैसा पतपैसा कमी होऊन भाववाढ रोखली जाते.

. रोकड निधीचे प्रमाण वाढविणे : आधुनिक काळात नियमानुसार देशातील सर्व व्यापारी बँकांना जमा झालेल्या एकूण ठेवींपैकी ठरावीक भाग मध्यवर्ती बँकेन रोकड निधी म्हणून ठेवावा लागतो. चलनवाढीच्या काळात मध्यवर्ती बँक रोकड निधीच्या प्रमाणात वाढ करते. त्यामुळे व्यापारी बँकांची रोखता कमी होऊन, त्यांची पतनिर्मिती घटते. भाववाढीवर मर्यादा पडतात.

. खुल्या बाजारात कर्जरोख्यांची विक्री : चलनवाढीच्या काळात मध्यवर्ती बँक विविध कर्जरोखे विक्रीस काढते. हे कर्जरोखे व्यापारी बँका आणि देशातील लोक खरेदी करतात. कारण कर्जरोख्यांमधील गुंतवणुकीमध्ये रोखता, सुरक्षितता लाभता यांचा योग्य समन्वय असतो. त्यामुळे अशा कर्जरोख्यांच्या खरेदीमुळे बँका लोकांजवळील पैसा मध्यवर्ती बँकेकडे जातो. अर्थव्यवस्थेतील एकूण पैसा, पतपैसा, पैशाचा भ्रमणवेग कमी होतो. खरेदी-विक्रीचे व्यवहार कमी होऊन चलनवाढ मंदावते.

. गुणात्मक पतनियंत्रणाचा वापर : वरील संख्यात्मक पतनियंत्रणाच्या उपायाबरोबर गुणात्मक मार्गाचाही अवलंब केला जातो. लोक टिकाऊ उपभोग्य वस्तूंसाठी बँकांकडून कर्जे घेतात. चलनवाढीच्या काळात सरकार मध्यवर्ती बँकेमार्फत व्यापारी बँकांना विविध तारणावर पूर्वीपेक्षा कमी टक्केवारीने कर्ज देण्याची सूचना करते. उपभोग्य कर्जाचे नियंत्रण करून कर्जाचे हप्ते मूळ कर्ज भरण्याची रक्कम वाढविते. कर्जाचे नियंत्रित वाटप करणे, विशिष्ट कामासाठीच कर्जे देणे इत्यादी बंधने घातली जातात. त्यामुळे व्यवहारातील पैसा कमी होऊन भाववाढ नियंत्रित होते.

     वरील उपायांनी सरकार महाग पैशाचे धोरण स्वीकारून अर्थव्यवस्थेतील पैशाची संख्या कमी करते. पण प्रा. गालब्रेथ यांच्या मते, हे धोरण फारसे यशस्वी होत नाही. कारण तेजीमुळे भरपूर नफा मिळतो, भांडवलाची सीमांत लाभक्षमता जास्त असल्याने महाग कर्जे परवडतात. तथापि सध्या एका द्रव्यविषयक धोरणाने चलनवाढ नियंत्रित होत नसल्याने या उपायांना दुय्यम स्थान प्राप्त झाले आहे.

() राज्यवित्तीय धोरण (Fiseal Policy)

       १९३० नंतर केन्सने या धोरणांचा पुरस्कार केला. सरकारच्या आयव्यय व्यवहारांशी संबंधित जी उपाययोजना केली जाते त्यास 'राजकोषीय धोरण' म्हटले जाते. यामध्ये पुढील उपयांचा अवलंब केला जातो.

1. सरकारी खर्चात कपात : चलनवाढीच्या काळात सरकारचा अनावश्यक खर्च कमी केला जातो. यासाठी कमी महत्त्वाच्या योजना लांबणीवर टाकल्या जातात. सरकारी खर्च कमी झाल्याने लोकांचे उत्पन्न कमी होऊन त्यांची वस्तूंची मागणी घटते. भाव कमी होण्यास सुरुवात होते. तथापि सरकारी खर्चात काटकसर करताना उत्पादन वाढीचा, विकासाचा वेग मंदावणार नाही अशी दक्षता घेतली पाहिजे.

. बचत वाढविणे : चलनवाढीच्या काळात सरकारने बचतीला प्रोत्साहन द्यावे. केन्सने यासाठी सक्तीची बचत योजना सुचविली आहे. बचतीच्या विविध आकर्षक योजना असल्यास लोक त्या स्वखुशीने स्वीकारतात. कर्जरोखे, बक्षीसरोखे, अल्पबचत इत्यादी मार्गांचा अवलंब करावा. बचतीच्या मार्गाने अर्थव्यवस्थेतील क्रयशक्ती कमी होते. लोकांजवळील पैसा कमी होऊन भाववाढ रोखली जाते.

. शिलकीचे अंदाजपत्रक : चलनवाढीच्या काळात सरकारने आपले अंदाजपत्रक शिलकीचे ठेवले पाहिजे. अंदाजपत्रकात तूट येता कामा नये. अंदाजपत्रकातील तूट सार्वजनिक कर्जाच्या मार्गाने भरून काढावी. त्यामुळे तुटीच्या अर्थभरण्याने चलनवाढ होणार नाही.

. करवाढ : चलनवाढीच्या काळात सरकार अनेक जुन्या करांचे दर वाढवून विविध नवीन कर आकारून लोकांच्या हातातील पैसा कमी करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे लोकांचे उत्पन्न कमी होऊन त्यांची विविध वस्तू सेवांची मागणी कमी होते. चलनवाढ नियंत्रित होते. त्यासाठी प्राप्तिकर, खर्चकर योग्य ठरतील. मात्र अशा करांच्या वाढीने बचत कमी होऊन भांडवलनिर्मिती घटण्याचा धोका असतो. वस्तूंवरील करामुळे त्यांच्या किमती वाढून उत्पादन घटण्याचा संभव असतो. म्हणून असे कर लादू नयेत.

5. कर्जफेड लांबविणे : चलनवाढीच्या काळात सरकारने पूर्वी लोकांकडून जी . कर्जे घेतलेली असतील, त्यांची मुदत संपली तरी व्याजासह परतफेड लांबवावी. त्या कर्जाचे नूतनीकरण करून मुदत वाढवून घ्यावी. यामुळे लोकांच्या हाती कर्जफेडीने प्राप्त होणारा पैसा जात नाही. त्यामुळे चलनवाढीची तीव्रता कमी होण्यास मदत होते..

. सार्वजनिक कर्ज उभारणे : चलनवाढीच्या काळात लोकांचे उत्पन्न वाढलेल असते. यास्तव दीर्घमुदतीची कर्जे सरकारने उभारावीत. यामुळे लोकांची क्रयशक्ती घटून भाववाढीला आळा घातला जाईल.

. चलनमूल्य वाढविणे : चलनवाढीच्या काळात देशातील चलनाचे परदेशी चलनात वाढविल्यास निर्यात कमी होऊन निर्यातीपासून मिळणारे देशाचे उत्पन्न घटते. यामुळे आयात वाढून देशातील पैसा बाहेर जातो. स्वस्त आयात वस्तूंच्या वापराने देशातील उत्पादित वस्तूंच्या किमती कमी करता येतात.

. चलन रद्द करणे : चलनवाढीच्या काळात सतत घसरणाऱ्या चलनाचे मूल्य स्थिर ठेवणे जेव्हा सरकारला अशक्य होते तेव्हा चलन रद्द करण्याचा जालीम उपाय सरकार योजते. जुने चलन रद्द करून नवीन चलन अस्तित्वात आणले जाते. जुन्या चलनापैकी थोडासा भाग नवीन चलनात देऊन बाकीचा भाग गोठविला जातो. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशांची संख्या नियंत्रित होऊन भाववाढ रोखली जाते. जर्मनी, पोलंड, हंगेरी इत्यादी देशांत या मार्गाचा वापर करण्यात आला होता.

पण राजकोषीय धोरण दक्षतेने हाताळावे लागते. सध्या या धोरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

() इतर उपाययोजना (Other Measures)

. उत्पादन वाढविणे : चलनवाढीला नियंत्रित करण्याचा महत्त्वाचा उपाय म्हणजे विविध वस्तू सेवांचे उत्पादन वाढविणे होय. वस्तूंचा अपुरा पुरवठा है। भाववाढीचे प्रमुख कारण असते. यासाठी अर्थव्यवस्थेतील उत्पादन साधनांचा पूर्णपणे उपयोग करून घेणे, विविध क्षेत्रांत भांडवल गुंतवणुकीला उत्तेजन देणे, औद्योगिक शांतता राखणे इत्यादी उपायांचा अवलंब करून अनावश्यक चैनीच्या वस्तूंचे उत्पादन कमी करून आवश्यक दुर्मीळ वस्तूंचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. उत्पादन तंत्रात सुधारणा करणे, टंचाई भासणाऱ्या वस्तूंची आयात करणे इत्यार्दीद्वारा वस्तूंचा पुरवठा वाढविला जातो.

. किंमत नियंत्रण : चलनवाढीने किमती अधिक वाढू नयेत यासाठी सरका काही महत्त्वाच्या वस्तूंच्या कमाल किमती कायद्याने निश्चित करते. त्यापेक्षा अधिक किंमत आकारणे हा कायद्याने गुन्हा ठरविला जातो. परंतु या उपायांमुळे उत्पादन घटण्याची शक्यता असते. तसेच कमी प्रतीच्या वस्तूंची निर्मिती केली जाण्याच धोका असतो. वस्तूंचा काळाबाजार वाढतो. केन्सचा मात्र या धोरणाला विरोध आहेकारण यामुळे लोकांच्या उपभोग स्वातंत्र्यावर मर्यादा पडतात. हे धोरण राबविणे कटकटीचे ठरते.

. नियंत्रित वाटप पद्धती : चलनवाढीच्या काळात सरकार खास यंत्रणेच्या मदतीने अन्नधान्याआदी जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली असता त्यांच्या वाटपाची व्यवस्था करते. या यंत्रणेमार्फत आवश्यक वस्तूंचे योग्य किमतीला ठरावीक प्रमाणात वाटप केले जाते. ही पद्धत ठरावीक वस्तूंपुरतीच मर्यादित ठेवावी लागते. कारण ही यंत्रणा उभी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. शिधावाटप पद्धतीने जास्तीतजास्त लोकांना टंचाई असणाऱ्या वस्तूंचे मर्यादित प्रमाणात वाटप करण्याचा प्रयत्न होत असल्याने भाववाढ नियंत्रित राहते.

वेतनविषयक धोरण :

       काही वेळा कामगारांच्या वेतनवाढीने चलनवाढीला चालना मिळते. कारण भाववाढ झाली की कामगार वेतनवाढीची मागणी करून संघटनेच्या सामर्थ्यावर ती मान्य करून घेतात. यासाठी वेतनवाढीचा संबंध उत्पादन वाढीशी जोडावा. वेतनवाढ गोठविली जाणे, वेतनवाढीची रक्कम कर कर्ज इत्यादी मार्गांनी काढून घेणे या उपायांचा अवलंब केला जातो. यामुळे कामगारांची खरेदीशक्ती कमी होऊन चलनवाढीला आळा बसतो.

अशा प्रकारे चलनवाढ नियंत्रणासाठी चलनविषयक, राजकोषीय इतर मार्गांचा एकत्रित अवलंब करावा लागतो. तसेच त्यासाठी लोकांचे सहकार्य, व्यापारी बँकांचे सहकार्य, मध्यवर्ती बँक राजकीय क्षेत्रातील इत्यादी घटकांचे साह्य लागते.

Friday, 25 June 2021

E-COMMUNICATION

 (Ayesha Patel)

Radhanagari Mahavidyalay, Radhanagari. 

B. Com. - II Semester  - VI

 E-COMMUNICATION

Communication is a process of transfering information, ideas, suggestions, orders, requests, feelings, plans, messages, grievances, etc. from one person to another or many, or from one group to another There are different modes of communication. In ancient times, communication was done through messengers. Then there was the birth of Post Offices. However, with the advancement in science and technology and the spread of internet all over the World, there emerged  E-Communication. In this unit, you will learn about e-mail communication, e-mail discussion groups,e-mail pals and blogs.

Electronic Communication or E-communication is a term used for communication by means of electronic media. In E-Communication advanced techniques such as computer modems, facsimile machines, voice mail, electronic mail, teleconferencing, video cassettes or private television networks are used. It is an easy and fast way to communicate with a person or group. There are various advantages of E-Communication like speedy transfer of messages, Wide coverage, managing global access, exchange of feedback, reasonable cost, etc. 

ways of E-Communication and their uses. 

1. Electronic Mail or Email:

Electronic Mail or 'email/e-mail' is one of the most popular ways of communication using electronic means and being is delivered through e-mail one can send written messages both textual and non electronically. Through textual, information, pictures and files. The messages sent and received by email can be stored and organized according to our needs. It is eco-friendly, as it reduces the use of papers.

The most essential thing in email communication is email address. Email address includes three-part format: userid@host.domain. The userid is the name of the user, @[at] sign follow account name, the host of the email account (e.g. Gmail, Hotmail, Yahoo, etc.) and the domain (e.g. .com, .in, .org. net, etc.)

The caption 'From' is sender's email address and is at the top. 'To' is for the receiver's email address. 'Cc'(Carbon Copy) denotes the email address of the persons when you are to send the same mail to more than one person. By using this option you can send the same mail to many persons you would like to send. There is another option Bcc which means add "Blind Carbon Copy'. Bcc allows the sender of the message to conceal(लपवणे) the person entered in the Bcc:field from the other recipients.

2) Subject Line:

The Subject Line of the email is as important as the actual message. It should be appropriate, short, concise, specific and clear. It gives a kind of hint or sign for your message. When people receive a number of messages,a catchy and meaningful Subject Line will attract and enable the receiver to see the mail. When you try to send an email without subject you might have seen automatically generated reminder 'Would you like your message to be sent without a subject?" This itself defines importance of Subject Line. Generally the key words of the message are written in the Subject Line. Don't write Subject Line using all the capital letters.

* Here are a few examples of writing Subject Line:

> Request for Information about Submission of Examination Forms 

> Enquiring about Value Added Courses started by the University

> Schedule for the Oct. /Nov. Examination

> Regarding organization of Youth Festival

 > Invitation for Birthday Party

Keep in mind that the proper Subject Line will help the recipient (प्राप्तकरता) of the email in understanding the content properly.

3.  Beginning  and Ending emails:

Begin your email always with a proper salutation or greeting. It should be written taking into Propetion whether the email is formal or informal.  While writing informal or formal emails, use the proper beginning and ending.

3. Beginning and Ending emails -:

Unlike 'Complimentary Close'  in letter writing, the ending of email should be at the left side only. It is a customary( चालिरीतीना अनुरूप)  style. Also new paragraph is started without leaving space. Formal emails can be ended with the mention of your name, address or designation.( अधिकार) In the informal emails there is no need of such details, you can just write your name.

4. Informal and Formal Email Writing -:

Now-a-days most formal and informal communication is carried out through emails. You can send message to your friends, relatives, acquaintances or send your business affairs or other official messages through email. On the basis(आधार) of content and purpose e-mails are divided into two types  :- 1) informal and 2) formal mails.

1] Informal E-mails -:

The emails written to friends,relatives, colleagues, and dealing with informal subject matters can be considered as informal emails. Such emails typically have personal conversations with friends or family members or acquaintances.(ओळखीचा). You can write informal emails for: Invitation for birthday, wedding ceremony, thanking someone for some favour(उपकार) done, accepting or refusing invitation, greeting, apologizing(माफी मागणे), etc... And so on. 

 *See the following email inviting a friend to the Birthday Party:

From: rutuja12@gmail.com

To: risha11@gmail.com

Cc:

Subject: Invitation for Birthday Party 

Hi Risha,

It's my birthday tomorrow. We have arranged a party at home at 6 in the evening. All our friends are coming. I want to invite you. Will be waiting eagerly and keep in mind no excuses. We shall enjoy a lot. 

See you tomorrow.

Yours,

Rutu

*Suppose you are unable to attend the programme,see how to send email refusing invitation:

From:risha09@rediffmail.com 

To: rutuja12@gmail.com

Cc: 

Subject: Inability to attend the Party

Hi Rutu,

Thank you so much for inviting me to the b. d. celebration. But dear, I'm extremely sorry...can't attend... appointment with dentist, U know. Extremely sorry for my inability to attend. Definitely we shall meet next week and enjoy a lot. What if we plan for a picnic? Happy b.d. in advance!

Yours sincerely,

Risha

You can send informal emails congratulating someone, enquiring about health, sending greetings, etc. See the language used in the emails above.In informal emails, people often make use of abbreviations ( लघुरूप)such as:b.d.-birthday, CU-see you, Uyou, BTW-By the Way, WBW-with best wishes, B4-Before,etc.

You can also make use of contractions (आकुंचन) like I'm, can't, etc. The accuracy and grammatical correctness is not strictly observed in informal emails. The style of informal emails is with the use of emotive(भावनात्मक) words,crippled(shortcut)  spellings, jargons (special words)and acronyms.

2] Formal E-mails -:

For business correspondence, you write formal e-mails. You write formal e-mails to college, bank, administrative office, bookshops, hotel for booking rooms, corporation, etc.. Salutation' and 'Complimentary Close' as we have already discussed should have formal tone like 'Hello Sir', 'Respected Mr. Jones' and Yours faithfully', etc. Accuracy and grammatical correctness should be observed. Care should be taken of punctuation marks, passive construction, etc. Here you have to use formal salutations and state your requirement precisely( तंतोतंत). There are various types of formal emails. 

*Let us see some types:

 1. Request for Something:

From: sagargaikwad@rediffmail.com

To: jaywantcollege10@gmail.com 

Subject: Request for Bonafide Certificate

Respected Sir,

I am Sagar Gaikwad studying in B. A. III in your college.Sir, I have applied for a job, so I need Bonafide certificate. I request you to issue me the certificate. Could you please intimate (सुचवणे) me when shall I come to the college office to collect the certificate? I will be grateful to you if you provide me the certificate in time.

Thanking You.

 Yours faithfully, 

Sagar Gaikwad 

B. A. III

*2. Complaint Emails-: 

There may be some occasions when you complain about something. You can send emails complaining about unavailability of results, irregular water supply, damaged roads, non-delivery of specific orders, etc. 

Study the example given below:

From: suoberoi10@gmail.com

To: internationalbooks@gmail.com

Cc:

Subject: Supply of Books

Dear Sir,

I had placed an order with you for a book on 15th of this month. The parcel containing the book sent by you is damaged and I am afraid the book inside it must have been damaged too. Hence I would appreciate( दाद देणे) it if you would replace the book as early as possible.

Yours faithfully,

S. U. Oberoi

Pune

You can send email for informing something like organization of meeting, schedule of programmes, schemes, etc.

**Do You Know This?

In the corporate world, email is an effective means to advertise your product. There are some specific types of e-mails sent to the subscriber for advertising or intimating( सूचित)  about the product. 

See some of these types -: 

1. Newsletters( वृत्तपत्रे) E-mail:

It is a popular type of mail since it is a powerful marketing tool. It always contains upcoming events, updates, offers etc of the companies.

2. Lead Nurturing E-mails -:

These types of emails contain typically series of related emails that are sent over a period of several days or weeks.

3. Transactional( व्यवहार) E-mails -:

This type of email is useful for e-commerce where you can easily send transactional e-mails such as receipts and confirmations.

There are many other types of e-mails which can be included in the list.

वाचकांचा पञव्यवहार

राधानगरी महाविद्यालय,राधानगरी.

बी.ए. भाग१ / अभ्यासक्रमपञिका कमांक २ / सञ:२ / विभाग :३

🔹वाचकांचा पञव्यवहार

विषय प्राध्यापक: प्रा बी के पाटील.

 वाचकांचा पञव्यवहार:

  🔹परस्तावना: वृत्तपञिय लेखनामध्ये वाचकांच्या पञांना विशेष स्थान दिले जाते. संपादकीय पृष्ठावर वाचकांची पञे छापली जातात. यावरुन अशा पञांना किती महत्व दिले जाते हे लक्षात येते. वाचकांच्या पञव्यवहारात मुक्तपणे आपली मते मांडण्याची मुभा असते.

       वाचकांची पञे हा वृत्तपञांचा फार पूर्वीपासूनचा भाग आहे. वृत्तपञ क्षेञात त्यांना महत्वाचे स्थान आहे. वाचक वर्गात ती औत्सुक्याने वाचली जातात.समाजजीवनात आणि प्रशासनाच्या पातळीवर त्यांची दखल घेतली जाते.वाचकांचा पञव्यवहार व्यापक स्वरुपात कार्य करीत असतो. मुळातच वृत्तपञिय लेखन हे Literature in a hurry,त्या त्या दिवसापुरते मर्यादित,दररोज नव्याने आल्याने मागचा भूतकाळ दडपला जाणारे असे असते. वाचकांचा पञव्यवहारही असाच असतो.दररोज नवनव्या पञांची भर पडत जाते.

🔹वाचकांची पञे म्हणजे काय?

        'आपली प्रतिक्रियामते, विचार आणि खाजगी वा सार्वजनिक समस्या पञाद्वारे संपादकांपर्यत पाठविण्याच्या कृतीला 'वाचकांचा पञव्यवहार' असे म्हणता येते'.

      वाचकांची पञे म्हणजे विचार-भावना व्यक्त करण्याचा एक लेखनप्रकार आहे. वृत्तपञात'सदर' स्वरुपात अशी पञे छापली जातात. वाचक पञ लिहून जाहीरपणे आपले मत व्यक्त करीत असतो. मनातली घुसमट असो वा विचार, सार्वञिक स्वरुपात मांडून हलका होत असतो. त्याला आशा वाटत असते की आपले म्हणणे कुणीतरी विचारात घेईल. शेतकरी आभाळाकडे पाहून आशाळभूतपणे आज ना उद्या पाऊस पडेल असा विचार करीत असतो.वाचकाचीही अशीच अवस्था असते. कोणी दखल घेतली तर ठीक, अन्यथा वाट पाहणे सुरुच असते. वाचक केवळ प्रश्न आणि समस्या मांडत नसतो, स्वत:चे अनुभव, चिंतन आणि आनंद यालाही पञाद्वारे वाट मोकळी करुन

करुन देत असतो. त्यासाठी वृत्तपञ हे सदर हक्काची जागा वाटते.

    एकूणच आपले विचार, सभोवतालची विसंगती! असुविधा, अन्याय, गळचेपी यांसह अनुभवलेले कडू-गोड क्षण, अनुभवातून आलेले शहाणपण, विचार धारणा इतरांबरोबर वाटून घेण्यासाठी पञस्वरुपात वृत्तपञाकडे पाठविलेले लेखन म्हणजे वाचकांचा पञव्यवहार होय. कोणी प्रतिसाद देऊ अथवा ना देऊ व्यक्त होऊन मन मोकळे करणे या मानसिकतेतून वाचक पञे पाठवितात.

🔹वाचकांच्या पञांचे महत्व:

      वाचकांच्या पञव्यवहाराचा फायदा नेमका कुणाला होतो, खुद्द पञलेखकास की पञवाचकास? याचा विचार झाला पाहिजे. अग्रलेख/संपादकीय लेख वाचणार्‍यापेक्षा वाचकांची पञे वाचणारा वर्ग मोठा आहे. वृत्तपञ व्यवसायालाही याचा मोठा उपयोग होत असतो. पंचायती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगर पालिकांच्या कर्मचारी व अधिकारी वर्गासही वाचकांची पञे उपयोगी पडतात. पोलीस यंञणा, राज्य व क्रेंद्र सरकार वाचकांच्या पञव्यवहारावर बारकाइने नजर ठेवत असते, जनसंपर्क अधिकारी यांची नोंद घेत असतो. म्हणजेच वाचकांच्या पञांचे महत्व वाढत चालले आहे.

      वाचकांच्या पञांचा उपयोग इतर वाचकांना, सर्वसामान्य नागरिकांनाही होतो. पञात मांडलेले निरीक्षण काही वाचकासाठी जसेच्या तसे लागू पडते.

उदा. पहाटे फिरायला बाहेर पडल्यानंतर भटक्या कुञ्यांचा ञास हा एकट्या-दुकट्याचा नसतो. अशा कुञ्यांचा बंदोबस्त व्हावा ही फिरणार्‍या सर्वांची इच्छा असते. आपल्या मनातील भावना कुणी तरी व्यक्त करत आहे,ही समाधानाची बाब असते.

     वाचकांची पञे सर्वसामान्य नागरिकांच्या वर्तनावरही नियंञण ठेवण्याचे काम करतात.

🔹वाचकांच्या पञाचे लेखन:

वाचकांनी पञलेखन कसे करावे याचे कोणतेही नियम नाहीत.कार्यालयीन पञे कशी असावीत याविषयी मार्गदर्शक सूचना आढळतात. कौटुंबिक पञव्यवहाराचेही काही संकेत आहेत

उदा. लहानाना आशीर्वाद, मोठ्यांना दंडवत ,नमस्कार वगैरे वृत्तपञातील वाचकांच्या पञाचे लेखन कसे असावे याबद्दल माञ एकच मत आढळत नाही. पण असे असले तरी वाचकांच्या पञांतून काही किमान अपेक्षा नोंदविता येतात. त्यावरुन वाचकांच्या पञाची लेखनपद्धती स्पष्ट करता येते. शिवाय जी पञे छापली जातात ती जशीच्या तशी न छापता त्यात संपादक बदलही करतात. तो बदल इतर वाचकांना  दिसत नसला तरी पञ लेखकाला तो सहज जाणवत असतो.

     पञलेखनाची भाषा सोपी असली पाहिजे .ती आकलनक्षम असली पाहिजे. लहान लहान वाक्ये आणि व्यवहारातील शब्द  यांचाही विचार झाला पाहिजे. भाषेवर किती प्रभुत्व आहे याचे प्रदर्शन पञलेखनात उपयोगी ठरत नाही, त्या भाषेतून मांडलेला विचार सहजतेने पोहचतो की नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी शास्ञीय भाषा महत्वाची ठरत नाही, आलंकारिक भाषाही उपयोगाची नसते. व्यवहार भाषेचा उपयोग करावा लागतो.

एकूणच पञलेखन हे संपादकांना उद्देशून लिहिले असले तरी त्याचे वाचन हे इतर वाचक करीत असतात. वाचकांशी संवाद करणारा पञव्यवहार अपेक्षित असतो.पञातून अभिव्यक्ती स्वातंञ्याचा अतिरेक होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.काल्पनिकता टाळूनच पञ लिहिले पाहिजे. भावनेचा आधार तारतम्याने घेतला पाहिजे.पञलेखन  हे समाजकार्याचे फार मोठे साधन आहे याचे भान पञलेखकाने बाळगले पाहिजे.

Practice Test

 बी .ए भाग ३ पेपर क्र १६ सत्र ६ विभाग २ व्यक्तिचित्रे

मुलखा वेगळी माणस या ललित गध्यातील १) रामा मैलकुली २)मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी ३) निळू मांग ४)मोरणी या व्यक्तीचित्रावर प्रत्येक प्रश्नाला एक मार्क अशी पंचवीस मार्कांची टेस्ट सोडविणे.

प्रा.बी.के.पाटील (मराठी विभाग प्रमुख ) राधानगरी महाविद्यालय राधानगरी

सूचना: सोबतची सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी प्रथम खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करावी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc-seGOFRkKUSJUx3riCdF1AQ_ddEqFk3ubxmuZadj_GmsoKQ/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&usp=mail_form_link

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing