राधानगरी महाविद्यालय,राधानगरी.
बी.ए. भाग१ / अभ्यासक्रमपञिका कमांक २ / सञ:२ / विभाग :३
🔹वाचकांचा पञव्यवहार
विषय प्राध्यापक: प्रा बी के पाटील.
वाचकांचा पञव्यवहार:
🔹परस्तावना: वृत्तपञिय लेखनामध्ये वाचकांच्या पञांना विशेष स्थान दिले जाते. संपादकीय पृष्ठावर वाचकांची पञे छापली जातात. यावरुन अशा पञांना किती महत्व दिले जाते हे लक्षात येते. वाचकांच्या पञव्यवहारात मुक्तपणे आपली मते मांडण्याची मुभा असते.
वाचकांची पञे हा वृत्तपञांचा फार पूर्वीपासूनचा भाग आहे. वृत्तपञ क्षेञात त्यांना महत्वाचे स्थान आहे. वाचक वर्गात ती औत्सुक्याने वाचली जातात.समाजजीवनात आणि प्रशासनाच्या पातळीवर त्यांची दखल घेतली जाते.वाचकांचा पञव्यवहार व्यापक स्वरुपात कार्य करीत असतो. मुळातच वृत्तपञिय लेखन हे Literature in a hurry,त्या त्या दिवसापुरते मर्यादित,दररोज नव्याने आल्याने मागचा भूतकाळ दडपला जाणारे असे असते. वाचकांचा पञव्यवहारही असाच असतो.दररोज नवनव्या पञांची भर पडत जाते.
🔹वाचकांची पञे म्हणजे काय?
'आपली प्रतिक्रियामते, विचार आणि खाजगी वा सार्वजनिक समस्या पञाद्वारे संपादकांपर्यत पाठविण्याच्या कृतीला 'वाचकांचा पञव्यवहार' असे म्हणता येते'.
वाचकांची पञे म्हणजे विचार-भावना व्यक्त करण्याचा एक लेखनप्रकार आहे. वृत्तपञात'सदर' स्वरुपात अशी पञे छापली जातात. वाचक पञ लिहून जाहीरपणे आपले मत व्यक्त करीत असतो. मनातली घुसमट असो वा विचार, सार्वञिक स्वरुपात मांडून हलका होत असतो. त्याला आशा वाटत असते की आपले म्हणणे कुणीतरी विचारात घेईल. शेतकरी आभाळाकडे पाहून आशाळभूतपणे आज ना उद्या पाऊस पडेल असा विचार करीत असतो.वाचकाचीही अशीच अवस्था असते. कोणी दखल घेतली तर ठीक, अन्यथा वाट पाहणे सुरुच असते. वाचक केवळ प्रश्न आणि समस्या मांडत नसतो, स्वत:चे अनुभव, चिंतन आणि आनंद यालाही पञाद्वारे वाट मोकळी करुन
करुन देत असतो. त्यासाठी वृत्तपञ हे सदर हक्काची जागा वाटते.
एकूणच आपले विचार, सभोवतालची विसंगती! असुविधा, अन्याय, गळचेपी यांसह अनुभवलेले कडू-गोड क्षण, अनुभवातून आलेले शहाणपण, विचार धारणा इतरांबरोबर वाटून घेण्यासाठी पञस्वरुपात वृत्तपञाकडे पाठविलेले लेखन म्हणजे वाचकांचा पञव्यवहार होय. कोणी प्रतिसाद देऊ अथवा ना देऊ व्यक्त होऊन मन मोकळे करणे या मानसिकतेतून वाचक पञे पाठवितात.
🔹वाचकांच्या पञांचे महत्व:
वाचकांच्या पञव्यवहाराचा फायदा नेमका कुणाला होतो, खुद्द पञलेखकास की पञवाचकास? याचा विचार झाला पाहिजे. अग्रलेख/संपादकीय लेख वाचणार्यापेक्षा वाचकांची पञे वाचणारा वर्ग मोठा आहे. वृत्तपञ व्यवसायालाही याचा मोठा उपयोग होत असतो. पंचायती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगर पालिकांच्या कर्मचारी व अधिकारी वर्गासही वाचकांची पञे उपयोगी पडतात. पोलीस यंञणा, राज्य व क्रेंद्र सरकार वाचकांच्या पञव्यवहारावर बारकाइने नजर ठेवत असते, जनसंपर्क अधिकारी यांची नोंद घेत असतो. म्हणजेच वाचकांच्या पञांचे महत्व वाढत चालले आहे.
वाचकांच्या पञांचा उपयोग इतर वाचकांना, सर्वसामान्य नागरिकांनाही होतो. पञात मांडलेले निरीक्षण काही वाचकासाठी जसेच्या तसे लागू पडते.
उदा. पहाटे फिरायला बाहेर पडल्यानंतर भटक्या कुञ्यांचा ञास हा एकट्या-दुकट्याचा नसतो. अशा कुञ्यांचा बंदोबस्त व्हावा ही फिरणार्या सर्वांची इच्छा असते. आपल्या मनातील भावना कुणी तरी व्यक्त करत आहे,ही समाधानाची बाब असते.
वाचकांची पञे सर्वसामान्य नागरिकांच्या वर्तनावरही नियंञण ठेवण्याचे काम करतात.
🔹वाचकांच्या पञाचे लेखन:
वाचकांनी पञलेखन कसे करावे याचे कोणतेही नियम नाहीत.कार्यालयीन पञे कशी असावीत याविषयी मार्गदर्शक सूचना आढळतात. कौटुंबिक पञव्यवहाराचेही काही संकेत आहेत
उदा. लहानाना आशीर्वाद, मोठ्यांना दंडवत ,नमस्कार वगैरे वृत्तपञातील वाचकांच्या पञाचे लेखन कसे असावे याबद्दल माञ एकच मत आढळत नाही. पण असे असले तरी वाचकांच्या पञांतून काही किमान अपेक्षा नोंदविता येतात. त्यावरुन वाचकांच्या पञाची लेखनपद्धती स्पष्ट करता येते. शिवाय जी पञे छापली जातात ती जशीच्या तशी न छापता त्यात संपादक बदलही करतात. तो बदल इतर वाचकांना दिसत नसला तरी पञ लेखकाला तो सहज जाणवत असतो.
पञलेखनाची भाषा सोपी असली पाहिजे .ती आकलनक्षम असली पाहिजे. लहान लहान वाक्ये आणि व्यवहारातील शब्द यांचाही विचार झाला पाहिजे. भाषेवर किती प्रभुत्व आहे याचे प्रदर्शन पञलेखनात उपयोगी ठरत नाही, त्या भाषेतून मांडलेला विचार सहजतेने पोहचतो की नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी शास्ञीय भाषा महत्वाची ठरत नाही, आलंकारिक भाषाही उपयोगाची नसते. व्यवहार भाषेचा उपयोग करावा लागतो.
एकूणच पञलेखन हे संपादकांना उद्देशून लिहिले असले तरी त्याचे वाचन हे इतर वाचक करीत असतात. वाचकांशी संवाद करणारा पञव्यवहार अपेक्षित असतो.पञातून अभिव्यक्ती स्वातंञ्याचा अतिरेक होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.काल्पनिकता टाळूनच पञ लिहिले पाहिजे. भावनेचा आधार तारतम्याने घेतला पाहिजे.पञलेखन हे समाजकार्याचे फार मोठे साधन आहे याचे भान पञलेखकाने बाळगले पाहिजे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.