बी. ए.भाग २
मराठी अभ्यासक्रमपञिका -४
सञ-३
काव्यगंध
विषय प्राध्यपक प्रा. बी. के पाटील
नारायण सुर्वे यांची "पोष्टर" : कामगारांच्या हक्कासाठी लढणार्या तरुणांचे भावविश्व.
पोष्टर ही कविता कामगारांच्या हक्कासाठी लढणार्या ,कामगार चळवळीतील पडेल ते काम करणार्या आणि त्यासाठी मिळेल ती जबाबदारी उचलणार्या तरुणांचे भावविश्व अतिशय समर्थपणे व्यक्त करते.
कवितेचा निवेदक ,हणम्या, शिंदे आणि इसल्या असे हे चार घरातले चौघेजण कामगार वस्तीतल्या तरुणांचे प्रतिनिधी आहेत. कामगार आंदोलनाचे पोष्टर डकवण्याचे काम ते राञीच्या वेळी करतात. एकजण शिडी घेतो. ,दुसरा खळ लावतो. तिसरा पोष्टर चिकटवतो आणि चौथा सगळ्यांना मदत करतो. हे काम अर्थातच चळवळीसाठी विनामूल्य चालले आहे.
हे काम करतांना ते एकमेकांशी मिञत्वाच्या नात्याने बोलत आहेत. पोष्टर खिडकीपाशी चिकटवायचे नाही. कारण तिथे इसल्याची "मैना" राहते.खडूस बुढ्याची तक्रार ते करतात.
दुसरे दिवशी मीटिंग आहे पण इसल्याला झोप अनावर होते.तेव्हा तू ह्या शिडीवर झोप. तुला तिघेही असच उचलून कबरस्तानात नेतो अशी त्याची चेष्टा करतात.इसल्याच्या शादीचे बेत रचतात. आणि आपल्याही घरात एक दुल्हन येईल असे स्वप्न बघतात. बुढ्यासाठी चश्मा घेण्याचाही त्याचा विचार आहे,त्यांची स्वप्ने किती साधी आहेत... या तरुणांचे हे भावविश्व कवीने या कवितेत अचूक पकडले आहे.
कवी हा कामगार वस्तीत राहणारा,तेथील विश्व काव्यात मांडणारा आहे.म्हणून त्याची शब्दकळाही तशीच आहे.या कवितेतही मराठी, हिंदी, उर्दूमिश्रित भाषा कवी वापरतो.
उदा: इसल्याची माॅं बडी कडक बाई.नजर बचाके भागा.
शू शोर मत कर.
कवी प्रसिध्द शायर मिर्झा गालिबच्या एका जगप्रसिध्द शेरावर आधारित ओळी इसल्याबाबत वापरतो.
यासगळ्यामुळे कवितेची उंची फार वाढते. अशी ही पोष्टर कविता कामगारांच्या हक्कासाठी लढणार्या तरुणांचे भावविश्व रेखाटणारी महत्वाची कविता आहे.
............................................
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.