(E-content created by Patil B. K.)
बी. ए. भाग २
मराठी अभ्यासक्रम पञिका ४
सञ ३
काव्यगंध
नारायण सुर्वे (श्रमविषयक कविता)
५ नेहरु गेले त्या वेळची गोष्ट
नेहरु गेले त्या वेळची गोष्ट: राजकीय भान व्यक्त करणारी कविता
ही सुर्वे यांची महत्वाची कविता आहे. १९६४ च्या मे महिन्यात एका संध्याकाळी रेडिओवर नेहरु गेले ही बातमी प्रसृत झाली. ही बातमी ऐकताच सुर्वे यांना धक्का बसला, आता प्रकाश संपला हे पार्लमेंटमध्ये उच्चारलेले वाक्य त्यांच्या कानात घुमत होते.
या कवितेचे एक वैशिष्टे म्हणजे कवीने पं. नेहरु यांच्या निधनानंतर लिहिलेल्या या कवितेत नेहरुंचे कार्य, त्यांचे चरिञ याविषयी एकही ओळ नाही.पण सुर्वे यांच्या कवितेतील सुचकताफार बोलकी असते.अनेक संदर्भांना ही कविता सहज स्पर्श करते.
"पाठ शेकवत बसलेली घरे कलकलली
शहर कसे करडे होत गेले
नंतर अजिरी
पुढे..... काळोखाने माणिक गिळले."
इथे शहर करडे होणे नंतर अजिरी होणे व काळोखाने माणिक गिळणे या सगळ्या अवस्था एकाचवेळी शहराच्या व देशाच्याही आहेत,सगळ्यासमोर अंधार पसरला. कारखाने बंद पडले. ओले खमीस खांद्यावर टाकून सगळे घरी गेले. म्हणजे जणू प्रत्येकाच्या घरातील माणूस दिवंगत झाला आहे व सगळे ओलेत्याने, दहनानंतर घरी परतणारे अंतेवासी आहेत.
"क्या हुआ ए सुंद्रे!
'आज लोबन मत जला!...,नेहरु गये।।'
'सच, तो चलो आज छुट्टी!....'
वेश्यावस्तीतले हे चिञ रंगवताना जीवनाची शुद्र पातळीही गाठली आहे. सुट्टी मिळाली हा आनंद काहींना वाटतो आहे,
पण कवीला याचा राग नाही तर यांनाही समजून घेण्याची व्यापक सहानुभूती कवीकडे आहे. या दृष्टीने 'लोबन मत जला' हे वाक्य महत्वाचे आहे. सबंध पीडित जगाचा हुंदका या कवितेत कवीने साध्या शब्दांत टिपला आहे.
पुढे कवीला एक हातगाडीवाला भेटतो. तो कागदी खोळीत उजेड घेऊन चाचला होता. एका उदास वृत्तीला या हातगाडीवाल्याच्या रुपाने प्रकाशाने उजळले आहे.
पं. नेहरुसारखा युगंधर नेता गेला. यामुळे राष्टीय व आतरराष्टीय पातळीवर काय घडले हे इतिहासात लिहिले जाईल .पण या घटनेने सामान्यांच्या जीवनात काय घडले हे टिपण्याचे काम या ललित कवितेने केले आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.