बी.ए भाग ३
मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७
सञ पाचवे
साहित्यविचार
विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील
पौर्वात्य साहित्य लक्षणा व भामहाची साहित्य व्याख्या :
प्रस्तावना:
संस्कृतमध्ये साहित्याला 'काव्य' हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने वापरला जातो.काव्याच्या केवळ पद्यभागासच तो वापरला जातो असे नसून सगळ्याच साहित्याचा अंर्तभाव या 'काव्य' शब्दात केला जात असे." वाणीच्या माध्यमातून जे-जे व्यक्त होते ते-ते वाड्मय असते" असे मानले जाते. काव्य या शब्दात मानवी भावसृष्टीचे रमणीय दर्शन घडविणारे सौंदर्यप्रधान साहित्य अपेक्षित आहे.
म्हणूनच दंडीपासून ते जगन्नाथापर्यंत संस्कृत किंवा पूर्वकालीन म्हणजेच पौर्वात्य साहित्यशास्ञज्ञानी केलेली काव्यलक्षणे हीच साहित्यलक्षणे आहेत.
जगन्नाथाने शब्दांना महत्व दिले आहे. पण हे शब्द रमणीय अर्थ प्रतिपादन करणारे असावेत असे म्हटले आहे. आनंदवर्धन याने 'ध्वनी' हा काव्याचा आत्मा आहे असे म्हटले आहे तर वामनाने 'रीती' ला काव्याचा आत्मा मानले. क्षेमेंद्राने औचित्यपूर्ण रचना महत्वाची मानली तर रुद्रटाने शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य असे म्हटले. विश्वनाथाने रसाला प्राधान्य दिले आहे.
या सर्व मीमांसकामध्ये भामह हा एखाद्या रत्नहारात हिरा चमकावा तसा उठून दिसतो.
इ. स.६०० ते इ.स. ७५० हा भामहाचा काल मानला जातो.'काव्यालंकार हा त्या काळात त्याने लिहिलेला ग्रंथ आजही प्रमाण आहे.या ग्रंथात त्याने ३९ अलंकारांचा परामर्श घेतला आहे."व्याकरणदृष्टा उचित अशी शब्दयोजना आणि अर्थालंकार या दोन्हींची काव्याला गरज आहे" हे मत त्याने आग्रहाने मांडले.
"शब्दार्थौ सहितौ काव्यम" अशी भामहाने साहित्याची व्याख्या केली.
म्हणजेच "शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजेच काव्य किंवा साहित्य होय" असे भामह म्हणतो.
भामह या संस्कृत साहित्यशास्ञज्ञाला साहित्यमध्ये शब्द आणि अर्थ दोन्ही हवे आहेत. शब्द आणि त्याचा अर्थ दोन्ही महत्वाचे वाटतात.
कवीच्या अंत:करणातील भाव ज्याच्या आधारे व्यक्त होतात ते माध्यम असते शब्द. हे भाव समर्थपणे व्यक्त होतात ते शब्दांच्याच माध्यमातून, भामहाच्या मते,शब्द अर्थ हे केवळ वाच्यार्थ नव्हे तर रसरुप अर्थ म्हणजेच अर्थ होय.
संस्कृत साहित्यात शब्द हे शरीर मानले आहे व आशय किंवा अर्थ हा आत्मा मानला आहे.शब्द हे बहिरंग आहे व आशय हे अंतरंग आहे.
कसे सांगितले म्हणजेचहे शब्द किंवा बहिरंग किंवा शरीर होय.
काय सांगितले म्हणजेच हा अर्थ किंवा अंतंरंग किंवा आत्मा होय.
भामहाने साहित्याच्या शरीरावरुन व आत्मावरुन शब्दार्थौ सहितौ काव्यम ही व्याख्या केली आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.