बी.ए. भाग -तीन मराठी अभ्यासक्रमपञिका १६ सञ सहा. पाठ्यपुस्तक :वाड:मय प्रकाराचे अध्ययन ललितगद्य(व्यक्तिचिञे) / मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी:
बी.ए. भाग -तीन मराठी अभ्यासक्रमपञिका १६ सञ सहा. पाठ्यपुस्तक :वाड:मय प्रकाराचे अध्ययन ललितगद्य(व्यक्तिचिञे) विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील. मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी: हा एक वेगळ्या प्रकारचा लेख आहे. त्याला रुढार्थाने मृत्युलेख म्हणावे लागेल.साने गुरुजींचे जीवन हे राट्रजीवनासाठी वाहिलेले समर्पित जीवन होते. सुरुवातीलाच आचार्य अञे यांच्यासारखा समर्थ साहित्यिक साध्या सोप्या भाषेत साने गुरुजींचे व्यक्तिचिञ समग्रतेने उभे करीत आहेत. "हे सात दिवस मी विचार करतो आहे.त्यांच्या भाषणाचा विचार करतो आहे.त्यांच्या मरणाचा विचार करतो आहे. त्यांच्या उपोषणाचा विचार करतो आहे. त्यांच्या बसण्याचा विचार करतो आहे त्यांच्या उभे राहण्याचा विचार करतो आहे. संकोचाच्या भावनेने सदैव अवघडलेली त्यांची आकृती माझ्या डोळ्यासमोर उभी आहे. ओठांच्या दोन्ही कोपर्यातुन त्यांचे ते ओशाळू हसू अजून माझ्या दृष्टिपुढे उभे आहे.स्नेहभावाने डबडबलेल्या त्यांच्या डोळ्याच्या ओल्या कडा अजुन मला दिसता आहेत. याठिकानी त्यांच्या आयुष्याचे प्...