बी. ए. भाग ३
पेपर क्रमांक १२
सञा- ६
पाठ्यपुस्तक साहित्यविचार
विषय प्राध्यापक - प्रा. बी. के. पाटील.
विभाग- १
प्रकरण शब्दशक्ती
२) लक्षणा
ही शब्दाची दुसरी शक्ती आहे. वाक्याचा बोध होण्यासाठी कित्येकवेळा मुख्यार्थाचा उपयोग होत नाही, अशा वेळी मुख्यार्थास बाजुस सारुन दुसरा अर्थ स्वीकारावा लागतो ,यालाच लक्ष्यार्थ असे म्हणतात. लक्षणा ही महत्वाची शक्ती आहे.
उदा. तो साक्षात बृहस्पती आहे. या उदाहरणात एखादा विद्यार्थी फार बुध्दीमान आहे तेव्हा तु फार बुद्धीमान आहेस असे न म्हणता तो साक्षात बृहस्पती आहे असे म्हटले जाते.
लक्षणेस आवश्यक गोष्टी
अ) मुख्यार्थबाध:-
घरावरुन हत्ती गेला यावाक्यात घरावरुन हत्ती जात नाही हे लक्षात घ्यावे लागते किंवा आणखी एक पेला द्या म्हणजे रिकामा पेला नव्हे तर' आणखी एक पेला सरबत असा' त्याचा अर्थ असतो.
ब) लक्ष्यार्थाचा मुख्यार्थाशी संबंध :-
लक्षणा होण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्यार्थाशी काही संबंध हवा. हा संबंध म्हणजे 'तद्योग'
वरील उदाहणे घेतली त्यामध्ये' घरावरुन हत्ती गेला' किंवा ' आणखी एक पेला द्या या उदाहरणावरुन मुख्यार्थाचा लक्ष्यार्थाशी कोणता संबंध आहे हे समजते.
क) रुढी अथवा प्रयोजन :-**
लक्षणा होण्यासाठी मुख्यार्थबाध व मुख्यार्थाचा लक्ष्यार्थाशी संबंध या दोन अटी आहेत. तिसरी अट अशी की, असा शब्दप्रयोग करण्यासाठी काही कारण पाहिजे. म्हणजे काहीएक प्रयोजन पाहिजे किंवा असा शब्दप्रयोग करण्याची रुढी असली पाहिजे उदा: 'घरावरुन हत्ती गेला' असे म्हणण्यास काहीतरी कारण पाहिजे. हत्ती घरावरुन कधीच जात नाही, तरीही असे म्हटले जाते. कारण हत्ती घराजवळून गेला, ही घटना परिणामकारकतेने सांगायची आहे म्हणून थोडी अतिशयोक्ती करुन सांगितले . इथे असे बोलण्याचे प्रयोजन आहे. हत्ती घरावरुन गेला असा शब्दप्रयोग करण्याची एक परंपरा निर्माण झाली, एक रुढी निर्माण झाली आणि रुढीनेच'घराजवळून' असा लक्ष्यार्थ घेतला गेला
Comments
Post a Comment