बी. ए. भाग -तीन
(अभ्यासक्रमपञिका क्र:१६ DSE-E130)
वाड्:मय प्रकाराचे अध्ययन:ललितगद्य(व्यक्तिचिञे)
मुलुखावेगळी माणसं
विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील
रामा मैलकुली:-
प्रस्तावना:
'माणदेशी माणसं हा व्यकटेश माडगुळकर यांचा सोळा व्यक्तिचिञांचा संग्रह आहे व्यक्तिदर्शन हाच निवेदनात्मकतेचा गाभा आहे. कथनशैलीत तटस्थपणे लेखकाचे निवेदन येते. माणदेशाच्या या अभावग्रस्त कृषीसंस्कृतीत वावरणार्या माणसाभोवती ही कथानके गुंफली आहेत
व्यकटेश माडगुळकर यांचे लेखन अल्पाक्षरी वाटते. मनुष्य स्वभावाच्या गाभ्याला सहजपणे भिडण्याची शक्ती त्यांच्या लेखणीत आहे.
यापाश्वभूमीवर रामा मैलकुली या व्यक्तिचिञातील अनुभूतीचा पोत तपासून पाहिला तर काय जाणवते ? ही सामान्य व्यक्ती असुन सामान्य वाटत नाही. चिञमय शैलीत लेखकाने रंगविलेले हे व्यक्तिचिञ अनुभवताना सर्व रंगछटासह रंगविलेले हे चिञच वाटते फक्त माध्यम निराळे
निवेदकाच्या निवेदनातून या परिसराचे चिञ उभा राहते. परिसरातील दारिद्राचे विदारक चिञही लेखकाने रेखाटले आहे. रामा मैलकूल्याच्या बाह्यांगाचे तसेच तसेच अंतरंगाचे प्रत्ययकारी चिञण लेखकांने रेखाटले आहे. यात त्यांच्या शैलीचे कौशल्य दिसून येते.
अल्पाक्षराने लिहिणारे माडगुळकर येथे तपशिलाचे रंग भरतात. कारण त्यांच्या आशयाची ती मागणी असते. हा लवचिकपणा त्यांच्या भाषाशैलीत आहे.
रामा मैलकूल्याच्या संवादामधून त्याच्या करुणमय जीवनाची निवेदकाला कल्पना येते
"कशाला देव परपंच ? काय तरी करुन हातातोंडाची गाठ घालायची ! ढोरावानी जीव ! काय अंगभर धडुता मिळतूया, का गोडधोड खायाला मिळतया ? आमा गरीबाचं हे असच ! तरी बरं, आपला सोताचा काय खटाला न्हाई. एकलाच हाय"
रामा मैलकूल्याची दर्दभरी कहाणी लेखकांने कलात्मक संयमाने सांगितली आहे. त्यात भावविवशतेचा सूर नाही. सहानूभूतीचा कंप माञ ओतप्रोत भरला आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.