*बी.ए.भाग 3 मराठी *घटक-७(भाषाविज्ञान आणि मराठी भाषा)
प्रा.डॉ.विश्वास पाटील
वर्ण वर्णाचे प्रकार व वर्गीकरण
आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनी ना आपण वर्णन असे म्हणतो
*मराठीची वर्णमाला*
मराठीने आपल्या भाषिक व्यवहारासाठी संस्कृत भाषेतील वर्णमाला स्वीकारली आहे. मराठीतील ध्वनि संस्कृत प्राकृत अपभ्रंश या परंपरेने बदलत आले. परंतु लेखनासाठी मात्र लिपी स्वीकारताना मराठी ने संस्कृत वर्णमाला स्वीकारली. त्यामुळे संस्कृत वर्णमाला व आजच्या मराठीची वर्णमाला यात बराच फरक दिसून येतो.
वर्णांचे प्रकार
*स्वर* व *व्यंजन* असे दोन प्रकार आहेत
*स्वर*
मराठी सोळा स्वर मानण्यात आले आहेत
अ आ इ ई उ ऊ ऋ ॠ लृ ॡ ए ऐ ओ औ अं अः
जो वर्ण स्वतंत्र आहे म्हणजे ज्या वर्णांच्या उच्चाराला दुसऱ्या कोणत्याही वर्णांचे सहाय्य घ्यावे लागत नाही त्या वर्णनास स्वर असे म्हणतात. स्वरांचा उच्चार होत असताना ओटांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात. पण त्यांचा एकमेकाशी किंवा जिभेचा कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनि बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे म्हणजे दुसर्या कोणत्याही वर्णाच्या साह्या वाचून होतो. स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडले व पसरलेले असते म्हणजे स्वरांच्या उच्चारात यावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो स्वर म्हणजे नुसते सुर.
*स्वरांचे प्रकार*
अ) उच्चारानुसार प्रकार
१] र्हस्व स्वर-अ इ उच्चार ऋ ऌ या स्वरांचा उच्चार आखूड होतो. म्हणजे यांचा उच्चार करायला थोडा वेळ लागतो.म्हणून त्यांना र्हस्व स्वर म्हणतात.
२] दीर्घ स्वर- आ ई ऊ ए ऐ ओ औ या स्वरांचा उच्चार करायला अधिक वेळ लागतो.म्हणजेच त्याचा उच्चार लांबट होतो. म्हणून त्यांना दीर्घ स्वर म्हणतात.
र्हस्व व दीर्घ हे स्वरांचे प्रकार त्याचा उच्चार करावयास लागणाऱ्या कालावधी वरून ठरवितात. त्यानाच मात्रा असे म्हणतात. र्हस्व स्वर उच्चारायला जो वेळ लागतो त्याची एक मात्रा मानतात. दीर्घ स्वरांच्या दोन मात्रा मानतात.
Comments
Post a Comment