राधानगरी महाविद्यालय राधानगरी
बी ए भाग एक
मराठी आवश्यक
विषय शिक्षक: प्रा. डॉ. विश्वास पाटील
महात्मा फुले (इ.स. 18 27- 18 90) महात्मा ज्योतिराव फुले हे आधुनिक भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे समाजसुधारक, शिक्षण तज्ञ, तत्त्वचिंतक व साहित्यिक होते. त्यांनी शोषित जनसमूहांच्या दुःख दैन्याचा वस्तुनिष्ठ अन्वयार्थ. त्यांच्या शोषण मुक्तीची एक मूलगामी विचारसरणी मांडली. सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजपरिवर्तनासाठी कार्यकर्त्यांचे संघटन उभे केले. शोषितांचे मुक्ती, स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा, समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा हा क्रांतिकारी मूल्य विचार त्यांनी दिला. मुला - मुलींच्या शिक्षणासाठी शाळांची स्थापना, विधवा-पुनर्विवाह साहाय्य, बालहत्या प्रतिबंधक गृह, अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला करणे, सावकारशाही विरुद्ध शेतकऱ्यांचे संघटन व उठावाचे नेतृत्व करणे. यासारख्या त्यांच्या प्रत्येक कृतीमधून शोषितांच्या मुक्तीचा ध्यास प्रकटतो. तृतीय रत्न, छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, हंटर आयोग पुढील शैक्षणिक निवेदन, शेतकर्याचा असुड, मराठी ग्रंथकार सभेस पत्र, सत्सार, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, अखंड वगैरे साहित्यामधून कृषी जनसमूहाच्या पर्यायी वांग्मयीन संस्कृतीचे बीजारोपण त्यांनी केले. महात्मा फुले यांचे दोन अखंड अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट केलेले आहेत मानवांचा धर्म एक या खंडामध्ये मानवाने स्वतःला सोयीसाठी अनेक धर्म देव निर्माण केले आहेत. त्यातून त्याचे हित होण्याऐवजी शोषणच होत असते. सर्वांचा निर्मिक एकच आहे. त्याला स्मरून न्यायाने सर्व वस्तूंचा उपभोग घ्यावा. धर्माच्या नावाने आपापसात न भांडता सर्वांनी सत्य हा एकच धर्म मानवा असे मानवतावादी विचार महात्मा फुले यांनी मांडले. निर्मिकाने पृथ्वी निर्माण करताना कोणताही भेदभाव केला नाही. त्याने सर्वांसाठी समान तृण, वृक्ष, गोमटी फळे आपणास देऊ केले आहे. त्याप्रमाणे आपण मानवता हा एकच धर्म मानवा असे आव्हान महात्मा फुले यांनी या अखंड मध्ये केले आहे.
धीर या खंडांमध्ये व्यक्ती व समूह जीवनामध्ये धैर्याचे महत्त्व सांगितले आहे. फुल्यांनी मांडलेले विचार आजही उपयुक्त आहेत.
Comments
Post a Comment