Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: प्रज्ञा दया पवार

Wednesday, 2 June 2021

प्रज्ञा दया पवार

 राधानगरी महाविद्यालय राधानगरी

 *बी ए भाग -एक

मराठी आवश्यक* 

विषय शिक्षक: प्रा डॉ विश्वास पाटील

     प्रज्ञा दया पवार (जन्म 19 66)

         नव्वदोत्तर कालखंडातील महत्त्वाची कवयित्री. अंत:स्थ, उत्कट जीवघेण्या धगीवर, मी भिडवू पाहतेय समग्रासी डोळा, आरपार लयीत प्राणांतिक, दृश्यांचा ढोबळ समुद्र हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. अफवा खरी ठरावी म्हणून हा कथासंग्रह. केंद्र आणि परिघ. धांदात खैरलांजी ही त्यांची नाटके. मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे, विमुक्तांचे स्वातंत्र्य ही संपादने. महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत वांग्मय पुरस्कार तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक व महाराष्ट्र फाऊंडेशन यांचेही पुरस्कार प्राप्त. त्यांच्या कवितांचे अनुवाद मल्याळम, तमिळ, तेलुगु, कन्नड, गुजराती, हिंदी, बंगाली, रशियन आणि इंग्रजी मध्ये झालेले आहेत. पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्या कार्याध्यक्ष, सामाजिक चळवळीत विशेषता स्त्री संघटनांमध्ये सहभाग, ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत.                                एकविसाव्या शतकात स्त्रियांच्या जगण्याचे अवकाश विस्तृत झाले असले तरी आजही तिच्याकडे माणूस म्हणून पाहिले जात नाही ही शोकांतिका आहे. स्त्री आणि पुरुष मानवी जीवनातील संवादी अनुबंध असले तरी ही पुरुषाची स्त्रीकडे पाहण्याची दृष्टीही एक उपभोगाची वस्तू अशीच आहे. आज ही पुरुष स्त्रीच्या संपूर्ण देहावर आपली मालकी बांधतो. परंतु आधुनिक स्त्रीने पुरुषाच्या भोगाचे साधन बनणे नाकारले. त्यातून स्त्रीला आपले माणूस म्हणून अस्तित्वात असणे गरजेचे असल्याचे अधोरेखित होते. 

   माणसासारखा माणूस असूनही या कवितेत पुरुषांच्या मनातील स्त्री बद्दलचे नकारात्मक विचार व्यक्त झालेले आहेत. स्त्री आपल्या अस्तित्वासाठी झगडत असताना त्याला असे वाटते की तिची नग्न धिंड काढावी, तिला चाबकाने फोडवे, उकळत्या तेलामध्ये हात घालायला लावून तिची कठोर सत्वपरीक्षा घ्यावी, तिच्या स्त्री देहाचे लचके तोडून त्याला आपलं पुरुष पण दाखवून द्यायचं असतं परंतु त्याला आता यातील काहीच करता येत नाही. कारण स्त्री ही आपल्या अस्तित्वासाठी जागृत झालेली आहे. तिला जगण्याचं भान आले आहे. आजपर्यंत इथल्या पारंपरिक समाजव्यवस्थेने पुरुषांची प्रतिमा सुसंस्कृत आणि पुरोगामी अशी चित्रित केली आहे. त्यांच्या घरात महापुरुषाचे फोटो आहेत, मात्र त्यांच्या मनात स्त्रीबद्दल अस्थाच भरलेली दिसते. या कवितेतून कवयित्री समता व न्यायाची अपेक्षा व्यक्त करुन मानवी मूल्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य असल्याचे सूचित करते.       आग आणि फुफाटा या कवितेमधून पुरुषप्रधान संस्कृतीचे चित्रण केलेले आहे. अनेकदा पुरुषी मानसिकतेने आदर्श बसनवलेला चेहरा प्रत्यक्षात संकुचित असतो. स्त्रीने कितीही प्रगती केली तरी ती बंड करू शकत नसल्याचे दिसते. एखाद्या स्त्रीने आत्मसन्मानासाठी बंड केले तरी काही होऊ शकत नाही. कारण शेवटी ती बाई आहे. अशी गळचेपी करणारी ही व्यवस्था आहे. पारंपारिक समाजव्यवस्थेत आग आणि फुफाटा हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत. हे वास्तव कवयित्री सूचित करते. नीतिमत्तेच्या नावाखाली पुरुषांची पाशवी वृत्ती स्त्री रोज अनुभवत असते. अशी स्त्री वेदना अस्वस्थता निर्माण करते.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...