(Sawant S. R.)
BA--- 2--- इतिहास -- पेपर नं-- 6 भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास
सविनय कायदेभंग चळवळ मिठाचा सत्याग्रह
सविनय कायदेभंग चळवळीत अन्याय कारक कायद्याचा भंग सवीनय पद्धतीने करून चळवळीला सुरुवात करण्याचे 12 मार्च 1930 ची तारीख ठरवली. मिठाच्या सत्याग्रहाचा साठी गुजरात मधिल दांडी या गांवाची निवड केली. गांधीनी साबरमती आश्रमातून आपल्या 78अनुयायांसह गांधी12 मार्च 1930 रोजी पायी चालत निघाले.व दांडी येथे 5 एप्रिल 1930 रोजी पोहोचले त्यादिवशी दांडी येथे मिठाचा कायद्याचा भंग करून त्यांनी विनापरवाना मीठ उचलले. गांधींच्या मिठाच्या आंदोलनामुळे मीठ या शब्दाला फार मोठी ताकद निर्माण झाली. गांधींचे नेतृत्व किती उंची गाठू शकते.या वरून लक्षात आले. असे नेताजी सुभाष चंद्र म्हणतात.या चळवळीकडे जगाचे लक्ष लागले होते.नेहरू नेताजी सुभाष चंद्र बोस सरदार पटेल यांनी त्यामध्ये भाग घेतला. ही चळवळ खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या पृमानात चालु होती त्यावेळेला गांधीं गांधींना सोडून बाकी सर्व नेत्यांना अटक करण्यात आली. गांधीनी त्यानंतर 1 मे 1930 रोजी धारासना येते सत्याग्रह केला. या सत्याग्रह मध्ये सरोजिनी नायडू यांनी नेतृत्व केले. देशामध्ये अनेक ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक मिठाचा सत्याग्रहा मध्ये सामील झाले होते कायदेभंगाच्या चळवळीमध्ये शेतकऱ्यांनी सरकारलाच सारा देण्याचे नाकारले. परदेशी मालावर बहिष्कार टाकला .काही ठिकाणी समुद्रकिनार्यावर जाण्यास बंदी होती.त्या समुद्र किनाऱ्यावर लोकांनी पृवेश केला परदेशी कापडाची वाहतूक रोखण्याचे काम केले गेले .जंगलात जान्यास बंदी करन्यात आली होती ही बंदी जनतेने झुगारुन लावली. सोलापूर मध्ये लष्करी कायदा पु करण्यात आला मात्र आंदोलकांनी याच्याकडे दुर्लक्ष केले. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळाल्याने .सविनय कायदेभंग चळवळ स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचा टप्पा होती. सविनय कायदेभंग चळवळी चे महत्व-- या चळवळीने अनेक गोष्टी साध्य केल्या. कारण सविनय कायदेभंग चळवळी मुळे चळवळ ग्रामीण भागात पोहोचली. सामान्य माणसं त्यामध्ये सहभागी झाले. सर्व थरातील लोक या चळवळीचे कार्यकर्ते बनले. स्वातंत्र्य चळवळीचे हे सर्व स्वरूप आणि तिची लोकप्रियता बघून सरकारला राजकीय सुधारणा देणे भाग पडले.त्यातून पुढे गोलमेज परिषदेचे आयोजन केले.सरकारने राबवलेल्या दडपशाही मुळे शेवटच्या घटकापर्यंतचे लोक त्यामध्ये सामील झाले. परिणामी सरकार पोलीस
यांच्या विषयि लोकांच्या मनातील भिंती नाहीशी झाली.लोक स्वातंत्र्यासाठी पोलिसांचा लाठीमार तुरुंगवास आनंदाने स्वीकारू लागले या चळवळी मुळे राष्ट्रभक्तीला मोठ्या पृमानात उधान आलेआले.
Comments
Post a Comment