(Sawant S. R.)
BA--- 3
मध्ययुगीन भारताचा इतिहास पेपर नंबर - 14-- प्रकरण एक:
मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधने -----अबुल फजल चे इतिहास लेखन अकबरनामा
मुघलाच्या भारताच्या इतिहासामध्ये समृठ अकबराच्या समकालीन अबुल फजल हा अकबराच्या दरबारातील विव्दान व्यक्ती होता. हा मोगल कालखंडातील श्रेष्ठ साहित्यिक म्हणून पृसिध्द आहे . तो कुशल राजकारणी सेनानी पुरोगामी विचारवंत होता. त्याचा जन्म 14 जानेवारी 1551 मध्ये झाला वडीलआणि भाऊ हे अकबराच्या पदरी होते त्यामुळे त्याला देखील अकबराच्या दरबारात मध्ये काम करण्याची संधी मिळाली.,
बुद्धिमत्ता आणि कुशलता याच्याजोरावर तो अकबराच्या दरबारातील एक विश्वासू व्यक्ती बंनला.आपल्या पांडित्याच्या छाप अकबरावर पाडली होती. अबुल फजल चे गुण हेरून अकबराने त्यास मोगल साम्राज्याचा इतिहास लीहण्याचीकामगिरी सोपवली .आणि मोठ्या कष्टाने ती त्याने पार पाडली .अबुल फजल ने अकबरनामा हा प्रमुख ग्रंथ लिहिला. त्याने तीन भागांमध्ये त्याचे लिखान केले. पहिल्या
पहिल्या भागामध्ये तैमुर पासून हुमायुन पर्यंतचा मोगलांचा इतिहास कथन केला आहे बाबर भारतात येण्याची कारणे पहिले पानिपतचे युद्ध दिल्लीवर मुघल सत्तेची स्थापना हुमायुनङाच्या जीवनातील अडचणी अबुल फजल ने लिहलेल्याआहेत. अकबर पूर्व इतिहास जाणून घेण्यासाठी हा पहिला विभाग महत्त्वाचा आहे. दुसर्या विभागात सम्राट अकबराची कारकीर्द रेखाटली आहे. अकबर पत्ती अबुल फजल चा निष्ठा एकवटल्या होत्या.
अकबराचे महान व्यक्तिमत्त्व बनवण्याचा त्याने प्रयत्न केला. दुसऱ्या भागांमध्ये इतिहास धर्म तत्त्वज्ञान यासंबंधीचे विवेचन त्याने केले. आहे अकबर अबुल फजल च्या मृत्यूपर्यंत चा इतिहास या खंडांमध्ये रेखाटण्यात आला आहे. त्यानंतर तिसरा भाग आईन ए अकबरी म्हणून ओळखला जातो या ग्रंथाचे पाच भाग पाडण्यात आले आहेत अबुल फजल ने आपल्या इतिहासलेखनात प्राथमिक साधनांना महत्त्वपूर्ण मानले आहे याची त्याच्यावर जबाबदारी असल्याने दरबारी कागदपत्रे फर्मान विमान वतने अधिकार पत्रे याचा त्याला अभ्यास करता आला. अनेक अधिकारी सरदार अनुभवी व्यक्तींच्या कडून त्याने माहिती मिळवली. घटना पडताळून पाहून त्याने त्याचा स्वीकार केला. नि काम करण्यापूर्वी ती माहिती अकबरा कडे तपासणीसाठी पाठवत होता. सुवर्णमय ग्रंथामध्ये इतिहासाच्या अभ्यासासाठी साधने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. सांगतो इतिहासाच्या अभ्यासातून मानवाच्या दुःख व वेदना कमी होऊन त्यास भविष्याची वाटचाल सुकर पणे करता येते असे अबुल फजल म्हणतो .राजकीय दृष्ट्या तों पक्षपाती होता तर धार्मिक दृष्ट्या तो धर्मनिरपेक्ष होता. तर्कावर आदित्य सत्य-असत्य शोधून काढण्याचा प्रयत्न करत होता. अकबरनामा मध्ये तू झुक मे बाबरी व मनुस्मृती या ग्रंथामधून काही उतारे घेतले आहेत .त्याच्या लिखाणामध्ये अनेक महत्त्वपूर्ण साधनांचा आधार घेतल्याने त्याचे लिखाण महत्त्वपूर्ण आहे असे म्हणावे लागेल .
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.