Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: व्यापार चक्रे (Trade Cycles)

Wednesday, 30 June 2021

व्यापार चक्रे (Trade Cycles)

 

(J. D. Ingawale)

बी.. बी.कॉम 2          सेमी 4             स्थूल / समग्र अर्थशास्त्र.

व्यापार चक्रे (Trade Cycles)

प्रस्तावना

     देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्रामुळे मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. भांडवलशाही अर्थव्यवस्था असणान्या देशाचा आर्थिक विकास हा एका ठरावीक गतीने झालेला दिसून येत नाही. त्यांच्या आर्थिक व्यवहारात सातत्याने चढ-उतार झालेले दिसून येतात. 'भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन, रोजगार, व्यापार, किंमतपातळी, नफा, मजुरी इत्यादी घटकांत चक्राकार पद्धतीने जे बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्रे असे म्हणतात.' अशाच प्रकारचे बदल मिश्र अर्थव्यवस्थेतही घडून येतात. साम्यवादी अर्थव्यवस्थेत मात्र व्यापार चक्रीय बदल घडून येत नाहीत. या बदलात एक प्रकारचे सातत्य असते. काही काळ अर्थव्यवस्थेत तेजीची परिस्थिती असते. परंतु त्यानंतर मंदीची परिस्थिती निर्माण होते. 'आर्थिक व्यवहारात ठरावीक कालांतराने जी स्थित्यंतरे घडून येतात त्यालाच व्यापार चक्रे असे म्हणतात. व्यापार चक्रे का निर्माण होतात आणि ती किती काळ टिकतात याविषयी अर्थशास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही. क्लेमंट , हॉटे, शुंपीटर, जे. एम. केन्स, हिक्स, हॅबर्लर, सॅम्युअलसन, कॅल्डॉर, ड्युसेनबरी इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी व्यापार चक्राच्या अभ्यासात मोलाची भर घातली आहे.तेजी-मंदीचे चक्र म्हणजे व्यापार चक्र होय. काही वेळा अर्थव्यवस्थेत वस्तूंच्या किमती वाढतात.

व्यापार चक्राचा अर्थ (Meaning of Trade Cycle)

. एच. हॅनसन :अति परावलंबी असणाऱ्या आधुनिक समाजातल्या इतर विभागांमध्ये तेजी अगर मंदी पोहोचविणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या औद्योगिक विभागाचे प्रकटीकरण म्हणजे व्यापार चक्र होय."

प्रा. शुंपीटर : आर्थिक घडामोडींच्या बाबतीत दीर्घकालीन संतुलन स्थितीत तरंगाप्रमाणे घडून येणारे चढ-उतार (बदल) म्हणजे व्यापार चक्र होय."

 लॉर्ड जे. एम. केन्स : "वाढत्या किमती घटती बेकारी असलेल्या तेजीच्या अगर उत्तम व्यापाराच्या कालखंडानंतर घटत्या किमती आणि वाढती बेरोजगारी असलेल्या मंदीचा अगर वाईट व्यापाराचा कालखंड यांनी मिळून बनलेल्या चक्राला व्यापार चक्र असे म्हणतात.

व्यापार चक्राची रचना अवस्था

       फव्यापार चक्र म्हणजे तेजी-मंदी चक्र असे आपण म्हणत असलो तरी तेजीनंतर लगेच मंदी येत नाही. अर्थव्यवस्था जेव्हा तेजीकडून मंदीकडे वाटचाल करू लागते तेव्हा त्याला घसरणीची अवस्था असे म्हणतात. अर्थव्यवस्था घसरणीमधून मंदीकडे जाते. मंदीचा कालावधी सापेक्षतेने जास्त असतो. त्याचे एकूण अर्थव्यवस्थेवर दूरगामी असे अनिष्ट परिणाम होतात. काही कालावधीनंतर अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर पडून तेजीच्या दिशेने वाटचाल करते. त्याला पुनरुज्जीवन असे म्हणतात. या अवस्थेतून अर्थव्यवस्थेत पुन्हा तेजीची परिस्थिती निर्माण होते. थोडक्यात, प्रा. शुंपीटर यांच्या मते, () तेजी () घसरण () मंदी () पुनरुज्जीवन या व्यापार चक्राच्या प्रमुख अवस्था होत. अर्थव्यवस्था या अवस्थांतून चक्राकार गतीने फिरत असते. एक चक्र पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी भिन्न असतो. लहान मुदतीची गौण व्यापार चक्रे ते वर्षे मुदतीची असतात. काही व्यापार चक्रे ही ते १० वर्षे मुदतीची तर काही ५० ते ६० वर्षे इतक्या दीर्घ मुदतीची असू शकतात. केवळ कालावधीच्या दृष्टीनेच व्यापार चक्रे वेगवेगळी असतात असे नसून त्यांची तीव्रताही वेगवेगळी असते. प्रा. मिचेल यांच्या मते, व्यापार चक्रे ही पुनरुद्भवी असतात. म्हणजे पुनःपुन्हा त्याच क्रमाने अर्थव्यवस्थेत बदल घडून येतात.

. तेजी (Prosperity or Expansion) : अर्थव्यवस्था पुनरुज्जीवन अवस्थेतून तेजीच्या अवस्थेकडे वाटचाल करीत असते. तेजीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच क्षेत्रांत वाढ (Expansion) होत असते. पुनरुज्जीवनाच्या परिस्थितीत मिळालेल्या प्रेरणेमधून संयोजक अधिक नफा मिळविण्यासाठी उत्पादनवाढीची योजना हाती घेतात. त्यामुळे कच्चा माल, मजूर, भांडवल इत्यादी उत्पादन घटकांची मागणी वाढते. त्यामुळे कच्च्या मालाच्या किमती वाढतात. खंडाचे दर, वेतन दर, व्याजदर इत्यादींत वाढ होते. उत्पादन घटकांचे उत्पन्न वाढले की त्यांची खरेदीशक्ती वाढते. त्यांच्याकडून विविध उपभोग्य वस्तू सेवांची मागणी वाढते, भाववाढ होते, उत्पादकांचा नफा वाढतो. तेजीच्या काळात उत्पादन व्यापार या दोन्ही क्षेत्रांत वाढ होते. त्यामुळे रोजगार संधीत वाढ होते. बेकारी कमी होते. श्रमिकांची गतिशीलता वाढते. सर्वत्र आल्हाददायक, आशावादी उत्साहवर्धक वातावरण असल्याने व्यापारी कारखानदारांकडे अधिक वस्तूंची मागणी (ऑर्डर) नोंदवितात. त्यामुळे संयोजक उत्पादनवाढीच्या नवनवीन योजना हाती घेतात. त्यांच्याकडून भांडवली वस्तूंची यंत्रसामग्रीची मागणी वाढते. त्यामुळे भांडवली वस्तूमधील गुंतवणूक लाभदायक ठरते.

     भांडवलाची सीमांत लाभक्षमता अधिक असल्याने गुंतवणूक वाढते. संयोजकांचा आत्मविश्वास द्विगुणित झाल्याने ते भांडवली वस्तूमधील गुंतवणूक वाढवितात. साहजिकच रोजगारातही वाढ होते. उपभोग्य वस्तूंची मागणी वाढल्याने किमती वाढतात नफ्याचे दर वाढतात. अशा रीतीने किमती, गुंतवणूक, रोजगार, उत्पादन, नफा इत्यादीत एकाच वेळी वाढ घडून येते. व्यापारी अधिक नफा मिळविण्यासाठी मालाची साठेबाजी करतात. सट्टेबाजीचे व्यवहार तेजीत असतात. व्यापारी बँका आणि वित्तीय संस्था भांडवल पुरवठा करून कार्याला हातभार लावतात. अर्थव्यवस्थेत पडून राहिलेली साधनसामग्री उत्पादन कार्यासाठी वापरली जाते. त्यामुळे बेकारी संपुष्टात येते. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. अशा रीतीने आर्थिक विस्ताराची प्रक्रिया ही स्वयंगतिमान साकलिक परिणाम घडवून आणणारी असते. हा तेजीचा कालखंड कायम टिकणारा नसतो. तेजीला कारणीभूत ठरलेल्या घटकांचे सामर्थ्य कमी होऊ लागताच अर्थव्यवस्था घसरणीला लागते.

. घसरण किंवा अपसरण (Recession) : तेजीच्या अत्युच्च अवस्थेनंतर अर्थव्यवस्था घसरणीला लागते. तेजीनंतरची अवस्था म्हणजे अपसरण किंवा घसरण होय. तेजीच्या अवस्थेतील विस्ताराला कारणीभूत ठरलेल्या घटकांचे सामर्थ्य हळूहळू कमी होऊ लागून तेजीचा शेवट होतो. तेजीच्या काळातील अवास्तव आशावादातच घसरणीची बीजे पेरलेली असतात. घसरणीची अवस्था सुरू होणे म्हणजे आर्थिक विस्ताराची शक्ती संपुष्टात येणे होय.

        उत्पादक उत्पादन कमी करण्याचा प्रयत्न करतात. काहींना तर आपले उत्पादन बंद करावे लागते. त्यामुळे उत्पादन घटकांची बेकारी वाढते. उद्योगव्यवसायातील आशावाद संपुष्टात येतो. उद्योगपती व्यापारी यांनी बँकांची पूर्वी घेतलेली कर्जे परत करणे कठीण होते. त्यामुळे कर्जाची थकबाकी वाढते. कर्जव्यवहार कमी होतात. पूर्वीची कर्जे वसूल करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे पत संकोच होऊन अर्थव्यवस्थेतील एकूण पतपैशाचे प्रमाण घटते. रोखे बाजारात अस्थिरता निर्माण होऊन शेअर्सच्या किमती घटतात. शेअर बाजार रोखे बाजारात घसरण सुरू होते. एकूण उलाढाल मंदावते.

      अर्थव्यवस्थेतील विश्वासाचे वातावरण नाहीसे होऊन सर्वत्र चिंतेचे निराशेचे वातावरण सुरू होते. उद्योग, व्यापार, बँकिंग इत्यादी सर्वच क्षेत्रांची निराशा होते. भांडवल गुंतवणुकीत घट होऊन भांडवली वस्तूंचे उत्पादन घटते. त्यामुळे बेकारीत भर पडते. लोकांचे उत्पन्न कमी होते. त्यामुळे मागणी घटून किमती अधिक वेगाने कमी होऊ लागतात.

वस्तूंच्या किमती घटत असल्याने पैशाचे मूल्य वाढते. लोकांची रोकड पसंती जास्त असल्याने बँकांना ठेवी मिळत नाहीत. त्यांच्या कर्जव्यवहारांवर मर्यादा पडतात, अर्थव्यवस्थेतील चलनपुरवठा कमी होऊन अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल त्या करते. आकृतीत '' बिंदूपासून '' पर्यंतची अवस्था ही घसरण होय.

. मंदी किंवा संकोच (Depression or Contraction).   तेजीच्या शिखरावरून अर्थव्यवस्था घसरणीला लागल्यानंतर ती वेगाने तळ बिंदूकडे येते. घसरणीचा वेग अधिक असल्यामुळे घसरण ही अवस्था फार काळ टिकत नाही. घसरणीचा शेवटचा बिंदू म्हणजे मंदी होय. मंदी ही तेजीच्या विरोधी अवस्था असते.

          मंदीच्या काळात सर्वच आर्थिक आघाड्यांवर निराशेचे वातावरण असते. वि एकूण उपभोग, एकूण उत्पादन, एकूण रोजगार, एकूण उत्पन्न इत्यादींमध्ये मोठी घट झालेली असते. किमती कमी झाल्याने नफ्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे गुंतवणूक घटते बेरोजगारी वाढते. अर्थव्यवस्थेतील प्रभावी मागणी घटल्यामुळे संयोजक उत्पादन वाढीच्या नवीन योजना हाती घेत नाहीत. बँकांच्या कर्जाला मागणी राहत नाही. पूर्वीची कर्जे वसूल करण्यात अडचणी येत असल्याने बँका बुडतात. उपभोग्य वस्तूंची मागणी कमी असल्यामुळे भांडवली वस्तूंनाही मागणी नसते. त्यामुळे भांडवली वस्तूमधील गुंतवणूक घटते. उपभोग्य वस्तूंपेक्षा भांडवली वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कारखानदारांवर मंदीचे अनिष्ट परिणाम होतात. नफ्याची प्रेरणा संपुष्टात आल्याने सर्वच क्षेत्रांत निराशेचे वातावरण असते. या अवस्थेत वेतन दर, व्याजदर, खंडांचे दर इत्यादींत घट होते. असे असले तरी किमती त्याहीपेक्षा वेगाने घटल्याने कारखानदारांचे अतोनात नुकसान होते. अनेक व्यवसायांचे दिवाळे निघते.

रोख्यांच्ते.मंदीत उद्योग व्यवसायापेक्षा शेती व्यवसायाची स्थिती अधिक शोचनीय होते. कारण शेतीमालाच्या किमती कमी होत असताना औद्योगिक उत्पादनाप्रमाण शेतीमालाचे उत्पादन कमी करता येत नाही. कृषी आधारित उद्योगातील कच्च्या मालाच्या किमती अन्नधान्याच्या किमती कमी होत असल्याने शेतकऱ्याचे उत्पन्न घटते. त्यातून त्यांना पूर्वीची कर्जे परत करता येत नाहीत. शेतकऱ्यावरील कर्जाचा भार वाढत जातो. मंदीच्या काळात सर्वच आर्थिक व्यवहार थंडावतात. त्याचे अर्थव्यवस्थेवर दूरगामी अनिष्ट परिणाम होतात. सापेक्षतेने मंदीची अवस्था अधिक काळ टिकून राहते. असे असले तरी काही कालावधीनंतर अर्थव्यवस्था मंदीतून सावरली जाते अर्थव्यवस्थेत पुनरुज्जीवन घडून येते.

 . पुनरुज्जीवन (Recovery) : अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर पडून पुन्हाविकासाकडे वाटचाल करू लागते अशा अवस्थेला पुनरुज्जीवनाचा टप्पा म्हणतायेईल. मंदीच्या निर्मितीस जे घटक कारणीभूत झालेले असतात त्याच घटकातीलबदलांमुळे अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर येऊन पुनरुज्जीवनास सुरुवात होते.

      आर्थिक मंदीचा काही कालावधी गेल्यानंतर हळूहळू टिकाऊ उपभोग्य वस्तू यंत्रसामग्री बदलण्यासाठी नवीन यंत्रांकरिता मागणी येते. त्यामुळे मागणी पूर्ण करण्यासाठी धाडसी (साहसी) संयोजक उत्पादन कार्य हाती घेतात. साहजिकच, काही लोकांना रोजगारी मिळून त्यांचे उत्पन्न वाढते आणि मागणी वाढते. अनेक वेळा अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात. सरकारकडून अनुत्पादक स्वरूपाची कामे सुरू केली जातात. त्यामधून रोजगार संधीत वाढ होते. उत्पन्नातील वाढीमुळे मागणी वाढायला लागते. किंमतपातळीत हळूहळू वाढ होऊन भांडवलाची लाभक्षमता वाढू लागते. उद्योजकांचा नफा वाढू लागतो. निराशाजनक स्थिती हळूहळू दूर होऊन उत्पादकांना आशेचा किरण दिसू लागतो त्यातून पुनरुज्जीवन घडून येते.

       पुनरुज्जीवनाला सुरुवात झाली की कारखानदारांना नफा मिळू लागतो. ते उत्पादनवाढीच्या योजना आखतात. कारखानदारांची व्यापाराची उलाढाल पाहून बँका व्यवसायांना कर्जे देण्यास तयार होतात. कर्ज व्यवहारात वाढ होऊ लागली की बँकांची पतनिर्मिती वाढत जाते. भांडवली वस्तूतील गुंतवणूक वाढत जाऊन रोजगारीत पुन्हा वाढ घडून येते. कंपन्यांच्या शेअर्सना रोख्यांना मागणी येऊन शेअर बाजारात रोखे बाजारात सुधारणा होऊ लागते. विकास प्रक्रियांत अधिक वेग घेऊन अर्थव्यवस्था विस्तारते. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते त्यातून तेजीकडे वाटचाल करते.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...