(Mokashi P A)
B.A.II SEMESTER - 4
पेपर क्रमांक - 6
आरोग्याचे समाजशास्त्र
प्रकरण - 3
जीवनशैली आणि आरोग्य
(Life style and Health)
अ.)
पारंपारिक जीवनशैली आणि आरोग्य
(अ) पारंपरिक जीवनशैली आणि आरोग्य
(Traditional Lifestyle and Health)
प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याचे मूल्यमापन स्वतःच्या समजुती व संस्कृतीनुसार करत असते.
यामध्ये धर्म,
चालीरीती, रूढी,
प्रथा, वैयक्तिक अपेक्षा, शिक्षण,
श्रद्धा, अंधश्रद्धा, आर्थिक स्थिती या सर्वांचा समावेश होतो. तसेच शारीरिक, मानसिक स्थिती व
जीवनावस्थेनुसार ती बदलत असते. त्यानुसार आरोग्याची स्थिती ठरते. ज जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या म्हणजे
केवळ रोग नसणे किंवा दुर्बल असणे असे नसून आरोग्य ही शारीरिक मानसिक सामाजिक-आध्यात्मिक सदृढ अवस्था
आहे अशी केलेली असली तरी आरोग्य, आजारपण व रोग यांच्या नेमक्या संकल्पनेवर अद्यापही
एकमत नाही. आरोग्य
(Health) रोज व्यायाम करणारा तगडा जवान पाहिला की एखाद्या
व्यक्तीला तो आरोग्यदायी वाटतो तर वृद्धांमध्ये थोडीशी हालचाल मर्यादित झाली किंवा
अशक्तपणा वाटू लागला की त्यांना आपले आरोग्य ढासळत आहे असे वाटते. आरोग्याच्या या कल्पना तशा
वैयक्तिक स्वरूपाच्या आढळतात.
१. आजारपण (Illness) :
रोजच्या सवयीतील बदल किंवा शारीरिक-मानसिक तक्रारींमुळे व्यक्तीच्या वर्तनातील बदलाचे निरीक्षण करून आपण ती
व्यक्ती आजारी आहे असे म्हणतो. व्यक्तीला स्वतःलाही तशी लक्षणे जाणवू लागतात.
२. रोग (Disease) :
जंतूंमुळे शरीरात होणारा रासायनिक बदल किंवा जैव
वैद्यकीय लक्षणांवरून व विविध तपासण्यांवरून ओळखता येतो.
आरोग्याविषयी विविध प्रकारच्या समजुती असतात.
अगदी बालपणापासून कुटुंब, शेजारी,
शाळा, धर्मसंस्कार,
प्रसारमाध्यमे तसेच शासनाकडून मिळणारे आरोग्यविषयक संदेश यातून आरोग्यविषयक समजुती दृढ होतात. या समजुती शास्त्रीय असतीलच असे नाही. एकूणच व्यक्ती तितक्या प्रकृती यानुसार प्रत्येकाचे आरोग्य वेगवेगळे असू शकते. आरोग्याची अवस्था नेहमीच परिपूर्ण दिसते असे नव्हे तर आरोग्याची अवस्था ही सतत दोलायमान असते.
(अ) एका बाजूला उत्तम प्रकृती चांगली प्रकृती आणि आजारापासून मुक्ती असते तर
(ब) दुसऱ्या बाजूला बाह्यतः न दिसणारी आजारी प्रकृती, सौम्य आजार, गंभीर आजार व मृत्यू असतात.
या दोन अवस्थांमध्ये आरोग्याची अवस्था सतत हेलकावत असते.
कारण आरोग्य ही कल्पनाच सापेक्ष आहे. एका व्यक्तीला जी अवस्था आजार वाटेल त्या अवस्थेत दुसऱ्या व्यक्ती मात्र कामे करीत असतात व त्यांना ती स्थिती सुसह्य असते.
पारंपरिक जीवनशैलीमध्ये आरोग्यविषयक संकल्पना
पाहण्यापूर्वी मानवाचे आरोग्य कसे बिघड •किंवा त्याला रोग कोणत्या घटकांमुळे होते हे पाहणे आवश्यक आहे. विशेषतः साथरोगशास्त्राच्या तिपाइ सिद्धांतानुसार रोग होण्याची
कारणे फक्त जंतू नसून वातावरण
व रोगक्षम व्यक्ती किंवा यजमान हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक स्थितीत बदल
होतो. इंद्रियांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो व मानवाला रोग होतो. हा
रोग अचानक
गंभीर होऊ शकतो किंवा दीर्घकाळ राहू शकतो.
कारक : रोगकारक घटक अथवा पदार्थ सजीव
किंवा निर्जीव अवस्थेत असू शकतात. अशा घटकांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे
१. जैविक घटक :
यामध्ये सजीव जंतूंचा समावेश होतो. विषाणू, जीवाणू, परोपजीवी, बुरशी हे रोगकारक घटक
रोगक्षम
व्यक्तीच्या शरीरात शिरून तिथे त्यांची वाढ होते, गुणन होते व ते रोग निर्माण करू शकतात. हे विषाणू मानवी शरीरात
पाणी, माती, अन्न, प्राणी, विष्ठा यामध्ये सापडतात.
२. आहारीय घटक :
अन्नाचे प्रामुख्याने सहा
मुख्य घटक आहेत. प्रथिने, शर्करायुक्त पदार्थ अथवा
कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, क्षार, पाणी या आहारीय घटकांच्या
कमतरतेमुळे अथवा अति सेवनाने रोग किंवा आजार होऊ शकतात. उदा. रक्तक्षय, लठ्ठपणा, 'अ' जीवनसत्त्वाच्या
कमतरतेमुळे रातांधळेपणा इ.
३. पर्यावरणीय घटक :
(अ) भौतिक घटक: अति थंडी अथवा उष्णता,
आर्द्रता, किरणोत्सर्ग,
कर्णकर्कश ध्वनिप्रदूषण तसेच दूषित पाणी व अस्वच्छता इ. गोष्टी आजारास कारणीभूत ठरतात.
(ब) जैविक घटक : प्राणी, कीटक,
उंदिर, डास, माश्या इत्यादी.
(क) रासायनिक घटक :
(१) शरीरातील अंतस्राव बदल, नलिकाि ग्रंथीस्राव, प्रतिकारशक्तीची कमतरता. उदा. थॉयराईड ग्रंथींच्या कमतरतेमुळे हायपोथायराईडिझम,
इन्शुलिन कमतरतेमुळे होणारा मधुमेह,
आजारामुळे शरीरातील रसायनामध्ये बदल होणे उदा. कावीळ. (२) शरीराबाहेर म्हणजे धूळ, कीटकनाशके,
वायू इ. शरीरात श्वासाबरोबर अन्नमार्गात अथवा इंजक्शनद्वारे गेल्यास.
४. यांत्रिकी घटक : मुरगळणे, जखमा, इजा, अस्थिभंग इ.
५. सामाजिक पर्यावरण : राहणीमानाचा दर्जा, अंधश्रद्धा, चालीरीती इत्यादी.
वरील आरोग्यविषयक घटकांना अनुसरून पारंपरिक किंवा
ग्रामीण जीवनपद्धर्तीमध्ये आरोग्य कशा रीतीने टिकून राहते किंवा बिघडते याबाबत
स्पष्टीकरण विचारात घेता येईल.
पारंपरिक जीवनशैली आणि आरोग्य याचा अभ्यास करत
असताना त्याचे दोन भागात स्पष्टीकरण पाहणे आवश्यक आहे. एक म्हणजे त्यांच्या जीवनशैलीतील आरोग्याच्या
दृष्टीने हितकारक असलेल्या गोष्टी म्हणजे मानवाच्या आरोग्याला उपयुक्त असणाऱ्या
आणि दुसरे म्हणजे मानवी आरोग्याला घातक किंवा हानिकारक असणाऱ्या अशा दोन
भागांमध्ये अभ्यास करणे आवश्यक ठरते.
'मानवाची जीवन जगण्याची एकूण पद्धती'
यालाच समाजशास्त्रीयदृष्ट्या आपण 'संस्कृती'
ही संकल्पना वापरतो. म्हणजेच इथे मानवाच्या जीवनशैलीचा म्हणजेच संस्कृतीचा मानवाच्या आरोग्यावर होणाऱ्या चांगल्या व वाईट परिणामांचा अभ्यास अपेक्षित आहे.
(अ) पारंपरिक जीवन शैली
पारंपरिक जीवनशैलीचे फायदे किंवा संस्कृतीचा
आरोग्यावर होणारा उपयुक्त परिणाम
१. सकाळी लवकर उठणे, अंघोळ करणे, रात्री लवकर झोपणे, हात स्वच्छ धुतल्याशिवाय जेवण किंवा पाणी न पिणे, योग्य साधना करणे, स्तोत्र पढणे ही संस्कृती
आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
२. तांब्याच्या भांड्यातून पाणी
पिणे, उपवास करणे, ताणतणावाच्या वेळी प्रार्थना
३. सर्दी, खोकल्याकरिता निलगिरी तेलाचा वापर करणे, तुळशीची पाने खाणे.
४. घाणेरीची पाने खाणे यामुळे
रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते.
५. गरम पाण्यात कडुलिंबाची पाने
घालून अंघोळ करणे. यामुळे त्वचारोग
प्रतिबंध होतो.
६. स्वयंपाकघरात किंवा घरामध्ये
चप्पल घालून प्रवेश करणे निषिद्ध मानले जाते. पारंपरिक जीवनपद्धतीमध्ये काही संस्कारातून आरोग्याचे महत्त्व दिसून येते. ज की, 'लवकर निजे, लवकर उठे तयासी ज्ञान, आरोग्य व संपत्ती लाभे'. तसेच प्रत्येकाच्या घरासमोर दारात तुळशी वृंदावन
असते त्यामुळे स्वच्छ हवा घरात येण्यास मदत होते. छोट्या-छोट्या आजारावर घरगुती औषधोपचार केले जातात. 'आजीबाईचा बटवा' हा पारंपरिक जीवनशैलीतील
आरोग्याचा महत्त्वाचा पारंपरिक उपाय दिसून येतो.
जसे की कडुलिंबाचा रस, गव्हांकुर, कोरफड, आले-गवती चहा, तुळशीचा काढा वगैरे. आजीबाईचा बटवा
म्हणजे घरगुती वैद्यच मानले जाते.
(ब) आरोग्य सुव्यवस्थित राहण्यामागील जबाबदार घटक
१. वैयक्तिक स्वच्छता :
व्यक्तीच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची म्हणजे डोळे,
नाक, कान, दात, केस, नखे, त्वचा, हात, पाय यांची योग्य निगा राखण्यामुळे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.
२. आहार :
पोषक आणि
सात्त्विक आहार घेतला जातो. ज्वारी, बाजरी, कडधान्ये, भाजीपाला, फळभाज्या तसेच जेवणात दूध, दही, ताक, लोणी यांचाही समावेश असतो. अंडी, मांसाहारदेखील केला जातो. म्हणजेच आहारशास्त्राच्या दृष्टीने प्रथिने . दूध, दही, चीज, अंडी, मटण तसेच स्निग्ध पदार्थ - तेल, तूप, लोणी, ताक, साय बगैरे, कर्बोदके किंवा
पिष्टमय पदार्थ सर्व प्रकारची धान्ये, साखर, गूळ, मध, साबुदाणा वगैरे. शिवाय डाळी, कडधान्ये, बटाटा, सुरण, रताळी यासारखी कंदमुळे भरपूर असतात. शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत चालवून शरीराला रोगांपासून मुक्त ठेवण्यात
जीवनसत्त्वाचा मोठा वाटा असतो. जीवनसत्त्वे प्रामुख्याने अ, ब, क, ड, ई व के अशी असतात. ती दूध, अंडी, मांस, मटण, डाळी, भाज्या, फळे, धान्य, कडधान्ये व शेंगदाणे इत्यादी पदार्थांतून मिळतात.
खनिजे हाडे, दात व रक्त यांच्या मजबुती करता आवश्यक असतात. दूध, भाजीपाला, फळे, मीठ, मांस, अंडी, संपूर्ण धान्य, मोड आलेली धान्ये, सुकामेवा यातून आवश्यक तेवढी खनिजद्रव्ये उपलब्ध होतात. पारंपरिक समाजव्यवस्थेत आहार हा चौरस व सात्त्विक असतो.
अन्न बनवितानादेखील तेलाचा कमी वापर असतो. मसाले कमी वापरले जातात. ज्याला आपण सॅलाड म्हणतो ते तर त्यांच्या रोजच्या जेवणात हमखास असते. त्यामध्ये गाजर, टोमॅटो, काकडी, कांदा, मुळा, बीट यांचा समावेश होतो.
पारंपरिक जीवनपद्धती पाहता त्यांच्यामध्ये जेवणाची
वेळ पाळली जाते. पहाटे लवकर उठणे, सूर्योदयापूर्वी अंघोळ करणे, शेतावर जाण्याआधी न्याहारी करणे, दुपारी ऊन डोक्यावर आल्यावर म्हणजे बारा वाजता जेवण घेणे, संध्याकाळी पुन्हा शेतातून परत आल्यानंतर लवकर सात ते आठच्या दरम्यान रात्रीचे
जेवण. यामुळे व्यक्तीच्या शरीराची
एक व्यवस्थित क्रिया सुरू राहते व आजारी पडण्याला वावच राहात नाही.
३. आचार-विचार, सवयी :
मनुष्याचे बरेचसे वर्तन धर्माच्या किंवा
संस्कृतीच्या आधारे निर्धारित केले जाते. मनुष्याचे आचार-विचार, रूढी, परंपरा, सणसमारंभ यांचा आरोग्य जीवनाशी अप्रत्यक्ष संबंध असतो.
तसेच व्यक्तीला लहानपणापासून चांगल्या सवयी लावल्या
जातात. विशिष्ट नियमांचे पालन करण्याची सवय लावली जाते. की मोठ्यांचा आदर राखावा, खोटे बोलू नये, समाजोपयोगी कार्यात
भाग घेणे, सार्वजनिक उत्सव एकत्र साजरा करणे, आर्थिक परिस्थितीनुसार खर्चाचे नियोजन करणे,
काटकसरीने बागणे, अनावश्यक खर्च टाळणे, शक्यतो कर्ज काढायला
लागू नये व लागलेच तर ते नियमितपणे फेडणे. विशेषतः माणूस या नात्याने सर्वांशी आदराने व आपुलकीने वागणे, चांगले आचार-विचार व सवयीमुळे
जीवनात ताणतणाव येत नाहीत.
४. झोप, विश्रांती, ताणतणाव :
काम करून थकल्यानंतर पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक
असते. उत्तम आरोग्यासाठी झोपेला
ठरावीक वेळ दिला पाहिजे. झोपेमध्ये शरीर व मन
पूर्णतः रिलॅक्स अवस्थेत राहते. शारीरिक कष्टामुळे आलेला थकवा नाहीसा होतो. पुन्हा जोमाने काम करण्याची ताकद येते. विश्रांतीमुळे शारीरिक कष्टाबरोबर ताणतणाव दूर
होण्यास मदत होते. पारंपरिकतेमध्ये पुरेशी
विश्रांती व झोप घेतली जाते. त्यामुळे जीवनातील ताणतणाव दूर होतात. आरोग्याच्या दृष्टीने ते अतिशय फायद्याचे राहते.
५. व्यायाम, खेळ व करमणूक :
विशेषतः पूर्वी व्यायाम आणि खेळ यातून स्वत:चे आरोग्य जपले जात असे. व्यायाम करणे, योगासने करणे, चालणे यातून शरीराला चांगले वळण लागते. शरीराच्या विशिष्ट हालचालींमुळे मानवाचे आरोग्यही जपले जाते. पूर्वी करमणुकीची साधने फारशी नव्हती. गाणी, नृत्य, पोवाडा, भजन, कीर्तन यातून लोकांचे मनोरंजन होत असे. साहजिकच व्यक्तीचे आरोग्य यामध्ये जपण्याचा प्रयत्न केला जातो.
भजन, कीर्तनातून समाजाचे प्रबोधनही केले जाते. तसेच आरोग्याच्या काही सूचनाही दिल्या जातात. पारंपरिक खेळ, आट्यापाट्या, कबड्डी, खो-खो यासारख्या खेळातून व्यायामही होतो व आरोग्याला हितकारकही राहते.
६. व्यवसाय:
पारंपरिक व्यवसायामध्ये शेती करणाऱ्या लोकांचे
प्रमाण अधिक आहे. शेती व्यवसायामध्ये शारीरिक
कष्टाची कामे खूप असतात. नांगरणी, पेरणी, कापणी, मळणी यासारख्या कामांमुळे आरोग्य चांगले शकते. राहू शकते.
एकूण योग्य आहार, व्यायाम, चांगल्या सवयी, वैयक्तिक व परिसर स्वच्छता, सकारात्मक विचार व
आरोग्यदायी जीवनशैली यामुळे व्यक्तीचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.
(क) शारीरिक कष्टाची कामे याचा आरोग्यावरील चांगला परिणाम
पारंपरिक जीवन पद्धतीचा विचार करता सुमारे ६० ते ७०
टक्के लोक शेती या व्यवसायावर अवलंबून असल्याचे दिसते. शेतात काम करणे हे अतिशय कष्टाचे असते.
शिवाय ऊन, वारा, पाऊस अशा सर्व काळामध्ये काम करावे लागते. त्यांच्या शारीरिक कष्टाचा आरोग्याच्या दृष्टीने चांगला परिणाम होतो तो
पुढीलप्रमाणे -
१. शेती व्यवसायामुळे शारीरिक
कष्ट अधिक राहतात. चालणे, उन्हात काम करण्यामुळे स्थूलता कमी होते.
चरबीचे प्रमाण कमी राहते. शिवाय 'ड' जीवनसत्त्व - देखील मिळत असे.
२. रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजाराचे प्रमाण अगदीच कमी राहते.
३. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे
व्यक्ती एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती राहते.
४. ताणतणाव कमी राहतात.
५. भौतिक सुखाच्या मागे लागत नाहीत. आहे त्यामध्ये आनंदी जीवन
जगतात.
६. वाहनांचा वापर नाही. सायकल चालवण्यामुळे आपोआपच व्यायाम होतो.
७. महिलांचा सकाळच्या कामामुळे
शारीरिक व्यायाम होतो.
८. करमणुकीसाठी भजन, कीर्तन, प्रवचन, यात्रा, उत्सव या गोष्टी असतात. ९. पारंपरिक जीवन पद्धतीमध्ये विशेषतः शुद्ध हवा आणि रोगप्रतिकारक शक्ती अधिक
असते.
थोडक्यात, पारंपरिक जीवनशैली ही आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर, हितकारक व कमी आजारी पडायला लागणारी आनंदी स्वरूपाची असते.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.