Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: कृषी व ग्रामीण उद्योजक समस्या

Sunday, 4 July 2021

कृषी व ग्रामीण उद्योजक समस्या

(K S Powar)

 विषय- उद्योजकतेची मूलतत्वे   

बी काॅम भाग 2 सेम 4

उपघटक- कृषी व ग्रामीण उद्योजक समस्या 

1पायाभूत सोयींचा अभाव-

             उद्योग चालवताना लागणार्या पायाभूत सुविधांचा अभाव आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. वीज ,पाणी ,रस्ते यांचा शिपूल प्रमाणात उपलब्धता गरजेची असते. हे उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी व ग्रामीण उद्योजक यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. 


2-वित्तीय मर्यादा-

           उद्योग चालविताना सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे भांडवल उभारणी होय. त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात  पैशाची गरज असते. जर तो उपलब्ध नसेल तर उद्योग चालवणे शक्य नसते.परिणामी उद्योग बंद पडण्याची शक्यता अधिक असते.

3- विपणन ज्ञानाचा अभाव-

             विपणन ज्ञानाच्या अभावाने अनेक उद्योजकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी व ग्रामीण उद्योजक यांच्याकडे फारसे विपणन  ज्ञान आढळत नाही. त्यामुळे विक्री व स्पर्धा शक्ती कमी राहते.याचा फटका उद्योगाला बसतो.

4- व्यवस्थापकीय कौशल्यांचा अभाव -

              नियोजन,संघटन, निर्णय घेणे यासाठी जे स्कील लागते त्याचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. उद्योगाचे यश हे वरील गोष्टींवर अवलंबून असतं.  हे स्कील नसल्यामुळे काही बाबतीत अडचणी येवू शकतात.


5-  तांत्रिक ज्ञानाचा अभाव-

                 लोकांना तांत्रिक ज्ञान कमी असल्याने व्यवसाय चालवणे अव्यवहार्य होते. प्रत्येक वेळी दुसर्याचा सल्ला घेणे व  

विसंबून राहणं शक्य नाही.  ही सुद्धा एक मोठी समस्या उद्योगा साठी मारक ठरते.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...