Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: वाकाटक सत्ता

Sunday, 4 July 2021

वाकाटक सत्ता

(Sawant S R)

 BA  -- 3---   

इतिहास---पेपर नंबर - 12 --प्राचीन भारताचा इतिहास -- वाकाटक सत्ता --- 

प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये दक्षिण भारतामध्ये सातवाहन सत्ता नष्ट झाल्यानंतर वाकाटक आणि दक्षिणेमध्ये प्रभावशाली सत्ता निर्माण केली. भारतामध्ये जे काही ताम्रपट लेणी मराठी यावेळेच्या सापडले ल्या साधना वरून यांची माहिती मिळते इतिहास सशोंधक डॉक्टर मिराशी यांनी विदर्भातील रामटेक जवळील नंदिवर्धन हे दक्षिण भारतातील वाकाटकांचे स्वतंत्र सत्तेचे मूळ स्थान आहे असे स्पष्ट केले आहे. विध्य शक्ती  हा वाकाटक सत्तेचा संस्थापक  हा मानला जातो.त्याने स्वतंत्र वाकाटक सत्तेची स्थापना केली. तो ब्राह्मण विष्णू वृद्ध  गोतराचा होता विदर्भातील परदेशी जिंकल्या नंतर त्याने पुरीया आणि जनका या त्याच्या दोन राजधान्या होत्या त्याच्यानंतर हा वाकाटक सत्तेचा प्रमुख बनला त्याने जवळजवळ साठ वर्षे राज्य केले.त्या नंतर पृवरसेन सत्तेवर आल्यानंतर वाकाटक साम्राज्यविस्तारास सुरुवात केली. बलाढ्य सैन्याची निर्मिती करुन अनेक  पृदेश जिंकले. प्रवरसेन हा वैदिक धर्माचा अनुयायी होता.  पहील्या पृवरसेना नंतर  वाकाटक सत्तेच्या  विघटनास सुरूवात  झाली त्या  नंतर  काही दिवसातच त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा पहिला पृथ्वीसेन हा सत्तेवर  आला याला हा गुप्त घराण्यातील दुसऱ्या चंद्रगुप्ताने आपली मुलगी प्रभावती हिचा विवाह पृथ्वी से ना बरोबर करून दिला. होता पृथ्वी सेना च्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र दुसरा रुद्रसेन सत्तेवर आला.   थोड्याच कालावधीत मृत्यू झाला त्यानंतर दुसरा रुद्रसेन नंतर त्याचा मुलगा दिवाकर सेन सत्तेवर आला.त्यावेळी तो अल्पवयीन होता. त्यामुळे त्याची कर्तबगार माता प्रभावती हिने  राज्यकारभाराची सर्व सूत्रे साभांळलीत . यावेळी तिला दुसऱ्या चंद्रगुप्ताने आपल्या  प्रशासनातील काही वरीष्ट अधिकारी  कामकाजासाठी वाकाटक सत्तेमध्ये पाठवले. गुप्तांचा राज्य कवी कालिदास याच काळात दक्षिण भारतात आला होता.मेघदूत या महाकाव्याची कालिदासाने याचभागात रचना केली. याच्यानंतर वाकाटक सत्तेमध्ये दामोदर सेन नरेंद्र सेन दुसरा पृथ्वी सेन  हे सवृ राज्यकर्ते वाकाटक सत्तेला लाभले आपापल्यापरीने त्याने आपली सत्ता स्थिर करण्याचा प्रयत्न केला माञ उत्तरेमध्ये यांना सत्ता  स्थापन करता आली नाही शेवटचा राजा हरीसेना जो होता .तो महत्त्वकांक्षी आणि कार्यक्षम होता .त्याने खसलेल्या फौजेची निर्मिती केली त्याच्या  जोरावर त्याने अनेक पराक्रम केले. मध्य भारतातील आणि पूर्वेतील बराचसा प्रदेश आपल्या ताब्यामध्ये आणला होता. तो विद्वान व कलाकारांचा आश्रयदाता होता. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेण्याचे खोदकाम याचकाळात झाले. हरीसेना ची कारकीर्द वाकाटक घराण्याला प्रतिष्ठेच्या शिखरावर घेऊन गेली. तोच वाकाटक सत्तेचा शेवट चा राजा होय. त्याच्यानंतर दुसऱ्या  कोणत्याही  राजाचा उल्लेख इतिहासात सापडत नाही.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Major English Syllabus_BA II

  BA Part II_Semester III English Major syllabus 1.      Major: Paper No. III 1)       Course Category: DSC (Major: Paper No. III) ...