(Parit V B)
Radhanagari Mahavidhyalay, Radhanagri
B.Com - 1 Sem - II
Subject- Principles of Marketing
Topic - 1 वस्तू : अर्थ व महत्त्व (Product: Meaning and Importance )
*प्रास्ताविक -
विपणनामध्ये 'वस्तू' ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. सर्व विपणन क्रियांचा व कार्यांचा 'वस्तू' हा केंद्रबिंदू आहे. 'वस्तू' असेल तरच विपणन, वितरण, विक्रयवृद्धी या सर्व क्रिया करता येतात. उपभोक्ता ही वस्तू खरेदी करीत असतो. पण खऱ्या अर्थाने वस्तूच्या रूपात तो आपल्या 'गरजांचे समाधान' खरेदी करीत असतो. हे 'गरजांचे समाधान' आर्थिक व मानसिक स्वरूपाचे असते. प्रत्येक वस्तूच्या संकल्पनेमागे हे गरजांचे समाधान असते. म्हणजेच वस्तूमध्ये तिच्या लाभांची गोळाबेरीज अंतर्भूत असते. अर्थशास्त्राच्या भाषेत 'वस्तूच्या लाभांची गोळाबेरीज' म्हणजे त्या वस्तूची उपयोगिता होय. उपभोक्त्याच्या गरजेचे समाधान त्या वस्तूच्या उपयोगितेतून प्राप्त होत असते. वस्तूला उपयोगिता मूल्य आहे. म्हणून बाजारपेठेत तिला महत्त्व आहे. वस्तू म्हणजे विशिष्ट उपयोगिता असलेली बाब होय. काही वस्तू भौतिक किंवा दृश्य स्वरूपात असतात. उदा. पेन, स्कूटर, कापड इ. तर काही वस्तू अभौतिक किंवा अदृश्य स्वरूपात असतात. विभिन्न प्रकारच्या सेवा अथवा कल्पना या अदृश्य स्वरूपातील वस्तू समजल्या जातात. उदा. गायन, संगीत, विमा सेवा, बैंकिंग सेवा, कायदेशीर सल्ला, व्यवस्थापन सल्ला इत्यादी. तात्पर्य, वस्तू ही भौतिक अथवा अभौतिक स्वरूपाची उपयोगिता मूल्य असलेली बाब होय.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.