(Sawant S. R.)
BA---- 3 -- इतिहास -- पेपर -- नं -- 12--
प्राचीन भारत-- प्रकरण -2 -- गुप्त आणि वाकाटक कालखंड --- गुप्त सत्तेची स्थापना हा प्राचीन भारताच्या इतिहासात महत्त्वाचा भाग मानला जातो.भारतीय संस्कृतीच्या क्षेत्रातील नव्या युगाचा प्रारंभ असे देखील म्हटले जाते. या गुप्त राजवटीमध्ये स्थिर राजकीय सत्ता सामाजिक व सांस्कृतिक जीवनात स्थैर्य सामृज्याचा विकास घडवून आणणारा धोरणात्मक निर्णय.वांग्मय कला पृशासन शिक्षण इत्यादी क्षेत्रात विकासात्मक कामगिरी.त्याच बरोबर मोयृ काळानंतर प्राचीन भारतात मोठ्या प्रमाणावरील एक संग सत्ता स्थापन करण्याचे श्रेय गुप्त राज्यकर्त्यांना दिले जाते. भारतात तसेच भारताबाहेर आपले वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केले होते. हिंदू धर्माच्या पुनर जीवनाबरोबरच परमधर्म सहिष्णुतेचा विशाल दृष्टिकोन ठेवून समाजाची प्रगती घडवून आणली होती.
shriगुप्त हा घराण्याचा संस्थापक होता, याच्या नावावरून या घराण्याला गुप्त घराणे असे नाव मिळाले असावे.इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या शेवटी कोषांबी येथे या राज्याचा उदय झाला असे पुराणांनी म्हटले आहे.
पृयाग सांकेत या प्रदेशावर श्री गुप्ताची सत्ता होती.त्यामुळे श्री गुप्ताला महाराज ही पदवी लावलेली दिसते , गुप्त सत्तेचा भारतात मोठ्या प्रमाणात प्रसार होण्यास पहिला चंद्रगुप्त च्या काळापासून खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. असे इतिहासाच्या साधनांमध्ये आढळते. प्राचीन भारताच्या इतिहासात गुप्तांच्या सत्तेला स्वतंत्र स्थान मिळवून पहिल्या चंद्रगुप्ताचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. महाराजाधिराज ही पदवी त्याने देखील लावलेली होती.त्यानेवेगवेगळ्या प्रकारची नाणी काढून राजा राणी एका बाजूला सिह व दुसऱ्या बाजूला दुर्गा अशी नाणी त्यांनी निर्माण केली होती. गुप्त सत्तेला स्थिरता मिळवून देण्यामध्ये त्याचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.
चंद्रगुप्ता पहिल्यानंतर समुद्रगुप्त हा गुप्त सत्तेचा प्रमुख बनला. उत्तर व दक्षिण भारतात त्याने सत्तेचा विस्तार केला. आणि भारतातील सर्वश्रेष्ठ विस्तारित सत्ता म्हणून त्याला स्थान मिळवून दिले. युवराज असताना विव्दतेच्या वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये पारंगत झालेला होता.त्यामुळे समृट झाल्यानंतर त्याला
पराक्रमाचा आणि साम्राज्याचा विस्तार केला. त्याने पाटीली पुत्र वर ताबा मिळवलेला होता. आर्यावर्ता तील महिमा त्याने काढलेल्या होत्या. त्याने छोटी-मोठी राज्य आपल्या ताब्यात घेतलेली होती. त्या मध्ये तो यशस्वी झाला होता. सीमेवरील राज्य व गणराजा विरुद्ध मोहीम उघडून त्याच्यावर त्याने आपली जरब बसवली होती. अनेक परकीय सत्तेशी त्याने संबंध प्रस्थापित केले होते. एवढ्या मोठ्या साम्राज्यविस्ताराची योग्य व्यवस्थापन त्याने उत्तम रित्या लावले होते. त्याने मिळवलेल्या प्रदेशाचे योग्य नियोजन केले होते.
समुद्रगुप्ताच्या कार्याचे मूल्यमापन करताना असे लक्षात येते की त्याचे आदर्श प्रशासन व्यवस्था त्यांनी निर्माण केली होती. अनेक विद्वानांना त्याने आश्रय दिला होता. समुद्रगुप्त हा हीदुं धमृचा अनुयायी होता. असे असले तरी त्यांना इतर धमियाना सन्मानाने वागणूक दिली होती.समुद्रगुप्ता ने अथृ व्यवस्था मजबुतीसाठी अतिशय प्रगत अशी नाणी काढली होती. आणि ती देखील कलात्मक आणि शुद्ध सोन्याची होती राजा छाप नानी धनुर्धर छाप नानी आणि आपण आणि व्याघ्र ची पृतिमा असनारी नानी तसेच वीणा वादक राजा अशा वेगळ्या पद्धतीची नाणी समुद्रगुप्ता ने काढलेली होती. एकंदरीत राज्यकर्ता म्हणून गुप्त राजवटीमध्ये सर्वश्रेष्ठ सम्राट म्हणून त्याची गणना केली जाते.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.