Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व (Importance of IT in India)

Thursday, 29 July 2021

भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व (Importance of IT in India)

 (J D Ingawale)

बीए भाग .        सेमी..       भारतीय अर्थव्यवस्था

भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व

(Importance of IT in India)

माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्व

      वृत्तपत्रे, रेडिओ यांसारख्या दळणवळण माहिती तंत्रज्ञान साधनांच्या उपलब्धतेचे भारतातील प्रमाण अगदीच कमी आहे. देशात हजारातील शंभर लोकही वृत्तपत्रे वाचत नाहीत. भारतातील टी. व्ही. संचाचा वापर वाढत असला तरी अमेरिका, इंग्लंड, जपान या देशाशी तुलना करता त्याचे प्रमाण अगदी कमी आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल.

. ज्ञानशक्तीचे केंद्र : या उद्योगामुळे भारताची जगात ज्ञानशक्तीचे केंद्र अशी प्रतिमा तयार होऊ लागली आहे. माहिती तंत्रज्ञान हा उत्पादनातील स्वतंत्र घटक संबोधला जातो. माहिती तंत्रज्ञान हे उत्पादनाचे प्रमुख आदान (Input) संबोधले जाते. मनुष्यबळाची गुणवत्ता कौशल्य विकसित करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान अनिवार्य ठरते. जागतिक दर्जाचे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात हा उद्योग महत्त्वाची भूमिका पार पाडतो.

. कार्यक्षमतेत वाढ : भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या सर्वच घटकांचीकार्यक्षमता वाढविण्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्र महत्त्वाची भूमिका पार पाडते. म्हणून या युगाला माहिती दळणवळणाची क्रांती (Information and Communation Revolution) असे संबोधणे वावगे ठरू नये.

. जॉब मार्केटचा वेगळा फॉर्म : आधुनिक काळात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील सेवा वेबसाईटच्या साहाय्याने सहज मिळविता येते. इंटरनेटच्या साहाय्याने जगातील कोणतीही माहिती क्षणात मिळू शकते. मोबाईल फोन, आकाश टॅबलेटस् यांच्या वाढत्या वापरामुळे माहितीचे जागतिक केंद्र (Global Hub) भारत बनू पाहत आहे त्यामुळे जॉब मार्केटचा फॉर्म बदलत आहे.

. देशातील सामान्य माणूस आय. टी. शी जोडला : भारतातील आय. टी. उद्योगात () आय. टी. सेवा () बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (BPO) () इंजिनिअरिंग सेवा आणि संशोधन विकास (R&D) () सॉफ्टवेअर प्रोडक्टस् या चार घटकांचा 'समावेश होतो. गेल्या काही वर्षांत माहिती तंत्रज्ञानाचा सरकारी कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, खाजगी क्षेत्र, विद्यापीठे, महाविद्यालये शाळांमधून वापर सातत्याने वाढत आहे. देशातील अगदी सामान्य माणूस आय. टी. शी जोडला गेला आहे.

. महसुलाचे साधन : नॅसकॉम (NASSCOM) या राष्ट्रीय स्तरावरील माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या मते, भारतातील आय. टी. आणि बी. पी. . (हार्डवेअर वगळून) क्षेत्राकडून सन २०११-१२ मध्ये ८७. महापद्म अमेरिकन डॉलर एवढा महसूल मिळाला. आय. टी. च्या अन्य साधनांची विक्री करून त्यांच्या टॅक्सद्वारे सरकारला भरपूर महसूल मिळत आहे. सन २००५-०६ मध्ये भारतात हार्डवेअरचे उत्पादन ५६,६०० कोटी रुपये, निर्यातीसाठीचे सॉफ्टवेअर ,०३,२०० कोटी रुपये, देशांतर्गत सॉफ्टवेअर २६,४६० कोटी रुपये असे एकूण ,८६,२६० कोटी रुपये महसूल प्राप्त झाला.

. रोजगार संधीत वाढ : आय. टी. क्षेत्रातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. सन २०१६-१७ मध्ये या क्षेत्रात .८६ दशलक्ष लोकांना प्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला तर १२ दशलक्ष लोकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध झाला.

. राष्ट्रीय उत्पन्नात वाढता हिस्सा : आय. टी. आणि त्याच्याशी निगडित (ITCS) क्षेत्रामध्ये सन १९९७-९८ मध्ये . टक्के स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मिळाले होते. हे प्रमाण सन २०११-१२ मध्ये . टक्क्यांपर्यंत वाढले.

. इंटरनेट वापरात भारत जगात दुसरा : जगात सध्या इंटरनेटचा सर्वाधिक वापर चीनमध्ये असून भारताचा दुसरा क्रमांक आहे तर अमेरिकेचा क्रमांक तिसरा आहे.भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) सर्व्हेक्षणानुसार मार्च, २०१३ मध्ये देशात इंटरनेट वापरणान्यांची संख्या १६ कोटी ४० लाख यामध्ये मोबाईलद्वारा इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्याही गृहीत धरली आहे. इंटरनेटचा वापर करणाऱ्यांमध्ये ३५ वर्षे वयाखालील तरुणांची संख्या ६५ टक्के आहे. वैशिष्ट्य म्हणजे यातील तरुण महिलांचा सहभागही वाढता आहे.

. सॉफ्टवेअरची वाढती निर्यात भारतातून जगभर सॉफ्टवेअरची निर्यात वाढते आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, इन्फोसिस, आय. बी. एम. इंडिया, सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेस, हेव्लेट पॅकर्ड इंडिया, इन्ग्राम मायक्रो इत्यादी प्रमुख भारतीय कंपन्या या सेवांची निर्यात करीत आहेत. सन २०१०-११ मध्ये सॉफ्टवेअरची निर्यात ५९ महापद्म डॉलर्स २०११-१२ मध्ये ६९ महापद्म डॉलर्स एवढी होती ती सन २०१७-१८ मध्ये १११ बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी वाढली आहे. सर्वाधिक निर्यात अमेरिकेला होत आहे.

१०. व्यवस्थापकीय कौशल्यात वाढ : व्यवस्थापकीय कौशल्यात वाढ घडवून आणण्यासाठी त्वरित निर्णय घेण्याची क्षमता उपयोगात आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान उद्योग महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. फायलिंग, गव्हर्नन्स, कॉमर्स, मोबाईल बँकिंग इत्यादींमध्ये आय. टी. उद्योग महत्त्वाचा ठरतो आहे. सन २००६ च्या भारत सरकारच्या धोरणानुसार सामान्य माणसाला परवडेल अशा खर्चात देशात ९७,००० पेक्षा अधिक सामान्य सेवा केंद्रे (Common Service Centres) स्थापन करण्याचे ठरविले आहे. सर्वकाळ, सर्व ठिकाणी, इन्कमटॅक्स, कार्पोरेट अफेअर्स, पासपोर्ट, सेंट्रल एक्साईज, शेअर बाजार इत्यादींमध्ये या सेवांचा वापर वाढत आहे. उद्योग व्यवसायात दैनंदिन वेळ वाचविण्यात आय. टी. सेवांचा वापर वाढत आहे. उद्योग व्यवसायात दैनंदिन वेळ वाचविण्यात आय. टी. सेवांचे योगदान मोठे आहे.

११. शिक्षण आणि संशोधन क्षेत्राचा विकास : के. जी. ते पी. जी. शिक्षण प्रणालीत इंटरनेटचा वापर वाढतो आहे. त्यामुळे माहिती प्रक्षेपणाचा वेग वाढतो आहे. गेल्या काही वर्षांपासून माहिती तंत्रज्ञानाचा शाळा, महाविद्यालये, विश्वविद्यालयामधील वापर वाढला आहे. उच्च दर्जाच्या संशोधन कार्यासाठी अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात या क्षेत्राचे योगदान मोठे आहे. मेल, ऑनलाईन परीक्षा पद्धती, मुलाखती इत्यादी सुविधांमुळे दूरशिक्षणाच्या संधी सर्वदूर पोहोचल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक साक्षरता प्रस्थापित करण्यात या क्षेत्राचे योगदान मोठे आहे. यामुळे जागतिक ज्ञानशक्ती (Global Knowledge Power) स्फोटक रीतीने वापरात आणलीजाते. संगणक साक्षरता, विभिन्न भागात सॉफ्टवेअरची निर्मिती यामुळे या क्षेत्राचा वेगाने विकास होत आहे. NITT/APTEC इत्यादी संस्था, विद्यापीठे, इंजिनिअरिंग कॉलेजीस, पॉलिटेक्निक इत्यादींची संख्या वाढत आहे.

१२. बँकिंग आणि अन्य सेवांमध्ये महत्त्व : बँकिंग क्षेत्रात आय. टी. मुळे सर्व जग जवळ आले आहे. त्यामुळे भांडवलाची गतिक्षमता वाढली आहे. बँकिंग मोबाईल बँकिंगमुळे ठेवी ठेवणे, रोख रकमा काढणे, खात्यावरील शिलकीची चौकशी करणे, एका खात्यातून अन्य खात्यांत पैशाचे स्थानांतरण करणे सुलभ झाले आहे. •भारतातील केंद्र सरकार शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक वितरण पद्धती, पोस्टल सर्व्हिसेस, इलेक्ट्रिकल डिलिव्हरी सर्व्हिसेस इत्यादी बाबतीत आय. टी. वापरण्याकरिता आग्रही आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू ही राज्ये याबाबत आघाडीवर आहेत. विशेषत: शेतकरी वर्गाला सवलतीच्या दरात टेलिफोन सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.

    मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करून संशोधन वृत्ती वाढीस लावण्याचे श्रेय आय. टी. उद्योगाला आहे. सन १९९१ नंतरच्या काळात संगणक, इंटरनेट, हार्डवेअर सॉफ्टवेअर उत्पादनांच्या क्षेत्रात भारताची प्रगती नेत्रदीपक आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात या उद्योगांची स्पर्धात्मकता अव्वल दर्जाची आहे. या उद्योगाला जागतिक स्पर्धेला तोंड द्यावे लागत असले तरी या उद्योगाचे भारतातील भवितव्य उज्ज्वल आहे.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...