Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: तथ्याचे निर्वचन. (Interpretation of Data)

Sunday, 4 July 2021

तथ्याचे निर्वचन. (Interpretation of Data)

 (J D Ingawale)

बी..भाग.. सेमी   पेपर 13 अर्थशास्त्रातील संशोधन पध्दतीशास्र

तथ्याचे निर्वचन. (Interpretation of Data)

प्रास्ताविक

आपण विविध प्रकारची माहिती जमा करतो. त्यासाठी विविध पद्धतींचा उपयोग केला जातो. शेवटी संशोधकांनी जी सामग्री तथ्ये जमा केली आहेत त्याचा अर्थ विशद करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे सर्वांना त्या संशोधनाचा अर्थबोध होतो. अहवाल तयार करण्यापूर्वी तथ्यांच्या निर्वचनाची खूप गरज असते.

तथ्य निर्वचनाचा अर्थ (Meaning of Data Interpretation)

  तथ्यांचे निर्वचन म्हणजे संशोधनकर्त्याने जमा केलेल्या माहितीच्या आकडेवारीच्या साहाय्याने वास्तव अर्थाचे योग्य स्पष्टीकरण करणे, त्यातील अन्वयार्थ समजावून सांगणे, त्यावरून काही निष्कर्ष काढणे आणि तांत्रिक पद्धतीने काही शिफारशी करणे होय. आतापर्यंतच्या प्रत्येक आलेखाचे आपण याप्रमाणे विश्लेषण करून आकडेवारीतील परस्परसंबंध स्पष्ट केलेला आहे. संशोधनाच्या उद्दिष्टांनुसार तथ्यांचे निर्वचन स्पष्टीकरण वेगवेगळ्या रीतीने करता येते. तथ्यांचे निर्वाचन ही एक कला आहे. जमा केलेल्या सामग्रीवर प्रक्रिया करून संख्याशास्त्रीय अनुमाने काढणे आणि त्यावरून संशोधन विषयातील माहितीचे स्पष्टीकरण करणे हे संशोधनकर्त्याचे प्रमुख कार्य असते. संशोधनातून निघालेल्या निष्कर्षातून व्यापक अर्थाचा शोध घेणे म्हणजे निर्वचन होय. त्यासाठी संशोधक प्रशिक्षित अनुभवी असावा लागतो. त्याने आकड्यांचे परस्परसंबंध स्पष्ट करून निष्कर्षातील शास्त्रशुद्धता दाखवावयाची असते. थोडक्यात, तथ्यांचे निर्वाचन हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण तंत्र आहे.

  संशोधनकर्त्याला त्याचे हे काम इतक्या काळजीपूर्वक आणि जागरूकतेने करावे लागते की, त्यावरून येणारे   निष्कर्ष हे व्यवहार्य पडताळून पाहण्याजोगे असावेत. कार्ल पिअरसन यांच्या मते, एखाद्या घटनेचे अथवा घटनाक्रमातील अवस्थेचे कोणतेही एकच एक कारण असत नाही. त्या घटनेमागच्या सर्व घटना किंवा अवस्था तिच्या कारण शृंखलेतील कड्या असतात. जेव्हा आपण कारणांचे शास्त्रीय निरूपण करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण दैनंदिन अनुभवातील एकानंतर एक अशा क्रमाने येणाऱ्या या सर्व अवस्थांचे वर्णन करीत असतो. युल कोन्डाळ यांनी मान्य केले आहे की, तथ्यांवर असंख्य कारणांचा असणारा प्रभाव हा त्यांचे सांख्यिकीय विश्लेषण करताना लक्षात घ्यावा लागेल. यामधील जास्त महत्त्वाची कारणे कोणती कोणत्या कारणांचा कितपत परिणाम झाला हे संशोधनकर्त्याला ठरवावे लागते. परिणाम समजली जाणारी घटना सर्व बाजूने पारखणे. शक्य तर तशा प्रकारचे प्रयोग करून आपल्या अनुमानाला बळकटी आणणारे निष्कर्ष काढणे निर्वचनात अभिप्रेत आहे.

   संशोधनातून निघालेल्या निष्कर्षाच्या व्यापक अर्थाचा शोध घेणे म्हणजे निर्वाचन होय. त्यासाठी संशोधकास आपल्या निष्कर्षाचे विद्यमान सिद्धांताच्या उपलब्ध ज्ञानाच्या निकषावर पुनर्परीक्षण करता येते. संशोधन निष्कर्षातून प्रतिबिंबित होणाऱ्या अमूर्त तत्त्वांचा व्यापक अर्थाचा शोध घेणे निर्वचनात अभिप्रेत आहे. आकडेवारीचा अभ्यास करताना अवलोकनात आलेल्या सामान्य घटनांना प्रकाशात आणणे हे निर्वचनात जसे अभिप्रेत आहे तसेच संशोधनाच्या निष्कर्षांना सैद्धांतिक आधार प्राप्त करून देणे हीही बाब निर्वचनात अभिप्रेत आहे. त्यामुळे पुढील संशोधनासाठी सैद्धांतिक आधार उपलब्ध होतो. त्यामुळे विश्वातील क्रिया प्रक्रियांचा गुंता उलगडण्यास मदत होते.

निर्वचनाची आवश्यकता का असते ?

  काही Interpretation याचा अर्थ नवीन अर्थ सांगणे असाही होतो. कारण संशोधका तथ्यांच्या मदतीने जे संशोधन केलेले असते त्यातून नवीन अर्थ उपलब्ध होऊ शकतो. निर्वाचन म्हणजे विश्लेषणात्मक अगर प्रयोगात्मक अभ्यासानंतर संकलित केलेल्या तथ्यापासून अनुमान काढण्याचे काम असते. म्हणूनच अर्थनिर्वचनाची गरज असते. कारण यामुळे योग्य निर्वचनातील संशोधन निर्णयाची उपयोगिता उपयुक्तता समजते. ही बाब संशोधन प्रक्रियाची आधारभूत घटक मानली जाते. पुढील कारणांनी निर्वचनाची आवश्यकता असते.

. अमूर्त तत्त्वाची ओळख : अर्थनिर्वचनाच्या माध्यमाने संशोधक त्याच्या शोधाच्या कार्यात असलेल्या अमूर्त तत्त्वांची ओळख चांगल्या प्रकारे करून देतो. या निर्वचनातून तो त्याचा शोधाच्या इतर अभ्यासाशी असलेला संबंध स्पष्ट करतो. तसेच अमूर्त तत्त्वांशी संबंध जोडला जातो, ज्यायोगे घटकांचे सत्यसृष्टीतील जगाचे भविष्य कथन करतो. नंतर या विशेष कलेचे परीक्षण नवीन चौकशीने केले जाते. त्यामुळे संशोधनातील सातत्य राखले जाते.

. स्पष्टीकरणात्मक संकल्पनेची स्थापना : निर्वचनाने स्पष्टीकरणात्मक संकल्पनेची स्थापना करता येते, ज्यायोगे भविष्यकालीन अभ्यासाला मार्गदर्शन होते. यामुळे बौद्धिक साहसाचे .नवीन प्रवेशमार्ग उघडतात आणि अधिक ज्ञानासाठी शोधाला प्रोत्साहन देते.

. चांगली योग्यता : संशोधक निर्वचनाने फक्त चांगली योग्यता (वा किंमत) ओळखू शकतो का त्याचा शोध महत्त्वाचा आहे. त्यामध्ये काय आहे आणि त्यावरून त्याच्या संशोधित शोधाचे वास्तव महत्त्व इतरांना समजण्यास मदत करते.

. अन्वेषणात्मक संशोधनाचे रूपांतर प्रयोगात्मक संशोधनात स्पष्टीकरणात्मक संशोधन अभ्यासाच्या शोधाच्या अर्थविवेचनाने प्रयोगात्मक संशोधनाच्या गृहीतामध्ये बहुधा त्याचा परिणाम होतो आणि असे निर्वचन हे अन्वेषणात्मक ते प्रयोगात्मक अभ्यासाच्या संक्रमणातपरिणत होते. ज्या अर्थी अन्वेषणात्मक अभ्यासाची सुरुवात करण्यास गृहीताची आवश्यकता नसते. अशा अभ्यासातील शोध घटनोत्तर आधारावर निर्वाचन केले जाते. या उदाहरणाबाबत निर्वाचन तांत्रिकपणे 'घटनोत्तर' निर्वाचन असे वर्णन केले जाते.

निर्वचनाचे तंत्र (Technique of Interpretation)

निर्वचनाचे काम हा सोपा व्यवसाय नाही. यासाठी संशोधकाकडे मोठे कौशल्य वहस्तकौशल्याची आवश्यकता असते. निर्वचन ही एक कला आहे जी कृती आणि अनुभवाने शिकता येते. संशोधकाने निर्वचनाचे कार्य पूर्ण करण्यासाठी तज्ज्ञाकडून मार्गदर्शन घ्यावे.

() योग्य स्पष्टीकरण संशोधकाने संबंधाचे योग्य स्पष्टीकरण दिले पाहिजे ज्यामध्ये : त्याच्या प्रक्रियेत असलेल्या अटीत सहसंबंधाच्यासंबंधी आढळणाऱ्याचे अर्थविवरण करावे लागते. त्याने असा प्रयत्न करावा की, एकरूपतेची बाब बाहेर काढून ती शोधावी जी त्याच्या विविध संशोधन शोधाच्या पृष्ठभाग थराखाली असते. वास्तवात हे तंत्र म्हणजे सामान्यीकरण कसे करणे आणि संकल्पनेचे सूत्रण करणे असते.

() बाहा माहिती : बाह्य माहिती जर अभ्यासाच्या कालावधीत संकलित केली असेल तर संशोधन अभ्यासाचा अंतिम निर्णयाचा अर्थ सांगताना तिचा विचार केलाच पाहिजे ज्यायोगे अभ्यासाखालील समस्या समजून घेण्यास महत्त्वाचा घटक म्हणून सिद्ध होईल.

() योग्य सल्ला: असा सल्ला दिला जातो की, अंतिम निर्वचनावर आरंभ करण्यापूर्वी कोणाशी तरी सल्लामसलत करून अभ्यासाचे अंतरंग पाहण्यास सांगावे जो स्पष्ट प्रामाणिक आहे. तसेच त्यातील मुद्दे गाळण्यास आणि तर्कशुद्ध चर्चेतील चुका गाळण्यास हयगय करू नये. अशा प्रकारच्या सल्ल्याने निर्वचन बरोबर निर्णयात रूपांतर होईल आणि अशा प्रकारे संशोधन निर्णयाची उपयुक्तता वाढवेल.

() योग्य निर्वचन: संशोधकाने चुकीचे सामान्यीकरण टाळण्यासाठी त्याच्या निर्वचनाचे काम त्याच्या समस्येवर परिणाम करणारे सर्व संबंधित घटक विचारात घेतल्यानंतर करावे. (सिद्धीस न्यावे) त्याने निर्वचनाचा निर्णय घेताना घाई-गडबड करता कामा नये, कारण अनेक वेळा निष्कर्ष जो सुरुवातीस अगदी बरोबर वाटतो तो अचूक नसण्याची शक्यता असते.

निर्वचनातील दक्षता (Precautions in Interpretation)

आपणास लक्षात ठेवले पाहिजे की, जरी तथ्य संकलन योग्य रीतीने केले असले तरी निर्वचनाने निष्कर्षात चूक होऊ शकते. यासाठी निर्वचन करताना पूर्णपणे सावधगिरी (दक्षता) घेणे आवश्यक असते. त्यासाठी धीर हंवा, निष्पक्षपातीपणा असावा योग्य अर्थ लावावा. संशोधकाने बरोबर निर्वचन करण्यासाठी पुढील दक्षता घ्याव्यात.

. सुरुवातीला संशोधकाने पुढील बाबींविषयी पूर्णपणे समाधान करून घेतले पाहिजे. () अनुमान काढण्यासाठी आधारसामग्री (तथ्ये) योग्य, विश्वसनीय पुरेशी असावी. () तथ्यामध्ये चांगली सजातीयता असावी. () संख्याशास्त्रीय पद्धतीने योग्य विश्लेषण केले असले पाहिजे.

. संशोधकाने निर्वाचन निर्णयाच्या प्रक्रियेत चुका निर्माण होण्याच्या शक्यतेची काळजी घ्यावी. चुका चुकीच्या सामान्यीकरणाने अगर संख्याशास्त्रीय मापनाच्या चुकीच्या अर्थ लावण्याने निर्माण होतात. अशा प्रकारच्या बाबी आपल्या निरीक्षणाच्या पलीकडे असतात. तसेच सहसंबंधाची ओळख पटणे ही दुसरी महत्त्वाची चूक (धोका) असते की, विशेष गृहीताच्या रचनेच्या आधारावर निश्चित सहसंबंधाची प्रवृत्ती अस्तित्वात येते. पण प्रत्यक्षात सकारात्मक परीक्षण निर्णय स्वीकारणे गृहीताचा अर्थ गृहीताच्या सहमतीशी (जुळण्याशी) असतो. यासाठी संशोधकाने या सर्व गोष्टींविषयी जागरूक असले पाहिजे ज्यायोगे चुकीचे सामान्यीकरण होणार नाही. त्याच्या संबंधित अभ्यासात योग्य अनुमान काढण्यासाठी संशोधकाकडे योग्य साधने असली पाहिजेत त्याला संख्याशास्त्रीय मापनाचा योग्य वापर करता आला पाहिजे.

. संशोधकाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, विश्लेषणासह निर्वचन कार्य एकत्र गुंफणे अत्यंत कठीण असते तो स्पष्टपणे वेगळे करू शकत नाही. अशा वेळी त्याने विश्लेषणाचा विशेष दृष्टिकोण म्हणून निर्वचनाचे कठीण कार्य केले पाहिजे. त्यासाठी त्याने सर्व प्रकारची दक्षता घेतली पाहिजे. त्या म्हणजे तथ्याच्या विश्वसनीयता संबंधित दक्षता, गणना तपासणे, निर्णयाचा (परिणामाचा) कायदेशीरपणा तुलना इत्यादी.

. त्याने या बाबीकडे कधीही दुर्लक्ष करता कामा नये की, त्यास संबंधित घटनेच्या संवेदनाक्षम निरीक्षणाचेच काम करावयाचे नसून, दृष्टिआड आरंभी लपलेल्या घटना ओळखणे मुक्त करणे हेही काम असते. त्यासाठी हे करण्यास त्याला निर्वचनाचे कार्य योग्य मार्गाने करावे लागेल. विस्तृत सामान्यीकरण शक्यतो टाळावे पण बहुसंख्य संशोधक ही जबाबदारी पार पाडीत नाहीत कारण संशोधन विशिष्ट काळात विशिष्ट अटीत पार पाडण्याचे बंधन असते. अशा प्रकारच्या नियंत्रणाचे भान ठेवून संशोधकाने त्याच्या मर्यादित निर्वचनाची रचना केली पाहिजे.

. संशोधकाने लक्षात ठेवले पाहिजे की, संशोधन अभ्यासाच्या काळात आदर्शाप्रमाणे वागावे. त्याने सातत्याने आरंभीचे गृहीत, अनुभवनिष्ठ निरीक्षण सैद्धांतिक संकल्पना यांमधील परस्परांवरील क्रिया अभ्यासल्या पाहिजेत. सैद्धांतिकाभिमुख अनुभवनिष्ठ निरीक्षण यांमधील परस्परांवरील क्रिया क्षेत्राचा तंतोतंत अभ्यास केला पाहिजे ज्यायोगे त्याखाली नवनिर्मितीक्षमता आणि सर्जनशीलतेची लपलेली संधी आढळून येते. सारांश, त्याने जेव्हा निर्वचनाच्या कामात स्वत:ला गुंतविलेले असते तेव्हा त्याने या दृष्टिकोणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...