(Dr N. A. Jarandikar)
Class: BA III
English (Compulsory)
The Lighthouse Keeper of Aspinwall
-Henry Sienkiewicz
·
It is a story
about one lighthouse keeper. His name is Skavinski.
·
The lighthouse
is located in an island Aspinwall, near Panama (America).
·
Mr Isaac
Falconbridge is the officer in charge of the lighthouse. He is living in Panama.
·
The lighthouse
was very important for the ships going from New York to Panama. Due to fog, it
was difficult for ships to cross the sea.
·
One day, the
lighthouse keeper disappeared. It was supposed that he died in the storm. So
the post of the lighthouse keeper was vacant.
·
So for Mr
Falconbridge it was necessary to appoint a new lighthouse keeper urgently.
·
The job of a
lighthouse keeper is very difficult because -
i) no one lives on the island. The lighthouse keeper
has to live a lonely life.
ii) the lighthouse keeper is like a prisoner. He is
not allowed to leave the place except Sundays.
iii) there are four hundred steps to reach the top
of the lighthouse.
iv) the lighthouse keeper has to be busy for the
whole day.
·
At that time, Skavinski,
a 70 years old man approaches Mr Falconbridge for the post of lighthouse
keeper.
·
Mr Falconbridge
takes his interview.
·
Skavinski is a
soldier and had participated in wars. He had done different jobs in his life:
i) Skavinski had been a gold-miner in Australia. ii) He had been a diamond-digger in Africa. iii) He
had been a rifleman in East Indies. iv) He had a cigar factory in Havana.
·
In every
business, every job Skavinski faced failure. He believed that Nature and the
four elements – water, wind, earth, fire were against him.
·
Tired and
disappointed Skavinski comes to Aspinwall. Now he wants peace and rest.
·
Mr Falconbridge
informs Skavinski that how difficult is the job of a lighthouse keeper.
·
Skavinski
informs Mr Falconbridge that he knows how tough the job is, and yet he is
willing to accept it. Mr Falconbridge very happily appoints Skavinski as a
lighthouse keeper.
·
Skavinski joins
his duties immediately.
·
That night,
Skavinski watches a terrible storm in the sea. There is a roaring wind, heavy
rains. Voyagers crossing the sea are struggling in the storm.
·
But Skavinski is
now not worried about wind or water. He is taking rest in the lighthouse. His
search for peace and quietude is now over, and he is now no more worried about
the four elements.
-------------------------------------------------------------------------------------------------------
Vocabulary:
Lighthouse: दीपस्तंभ / Lighthouse keeper: दीपस्तंभ
सुरक्षारक्षक; Island: बेट; Fog:
दाट धुके; Storm: वादळ; Prisoner:
कैदी; Vessels: जहाजे; Slumber: गाढ झोप; Persecute: छळणे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आयुष्यात प्रत्येक टप्प्यावरती अपयशी ठरलेल्या स्काव्हिन्स्की
नावाच्या एका वृद्धाबद्दलची ही कथा आहे. अमेरिकेतील पनामानजीकच्या अॅस्पिनवॉल
नामक बेटावरील एका दीपस्तंभाच्या सुरक्षा रक्षकाचा एके दिवशी अचानक मृत्यू होतो. न्यूयॉर्क
ते पनामा प्रवास करणाऱ्या असंख्य जहाजांना दिशा दाखवण्याचे महत्त्वाचे काम हा
दीपस्तंभ करत असे. त्यामुळे नव्या रक्षकाची तात्काळ नेमणूक करणे गरजेचे होते. या
दीपस्तंभावरती काम करणे म्हणजे एक मोठी शिक्षा होती. कारण हे बेट पूर्णपणे
निर्मनुष्य होते. जहाजांची सातत्याने ये-जा होत असल्याने, सुरक्षा रक्षकाला दिशा/हवामान
याबाबतचे निरनिराळे झेंडे दाखवण्यासाठी सतत दक्ष राहावे लागत असे. रविवारखेरीज
त्याला सुट्टी मिळत नसे. दीपस्तंभावर जाण्यासाठी तब्बल ४०० पायऱ्या होत्या, आणि
सुरक्षा रक्षकाला वारंवार वरखाली करावे लागत असे.
मि. आयझॅक फाल्कनब्रिज हे या दीपस्तंभाचे प्रशासकीय काम पहात. नव्या
रक्षकाची नेमणूक करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. अशा ठिकाणी तात्काळ नवा
सुरक्षा रक्षक मिळणे कठीण काम असल्याने फाल्कनब्रिज काहीसे चिंतीत होते. इतक्यात त्यांच्यासमोर
एक ७० वर्षाचा वृद्ध हजर होतो. आपले नाव स्काव्हिन्स्की असल्याचे तो सांगतो
आणि सुरक्षा रक्षकाचे काम करण्यास आपण तयार असल्याचेही सांगतो. फाल्कनब्रिज त्याला
त्याचा पूर्वानुभव विचारतात. त्यावेळी तो आपल्याला दोन युद्धांमध्ये सैनिक म्हणू
लढल्याचा अनुभव असल्याचे सांगतो व तशी कागदपत्रे सादर करतो. नंतर फाल्कनब्रिज
त्याला अॅस्पिनवॉल दीपस्तंभावरती काम करणे किती जिकीरीचे आहे ते सांगतात. आणि
तरीही स्काव्हिन्स्की हे काम करण्यास अत्यंत आनंदाने तयार होतो. शेवटी फाल्कनब्रिज
त्याची अॅस्पिनवॉल दीपस्तंभावरील सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक करतात.
त्याच दिवशी स्काव्हिन्स्की आपल्या कामावर रुजू
होतो. त्याला आपला सगळा संघर्षमय भूतकाळ आठवतो. युद्धाव्यतिरिक्त स्काव्हिन्स्कीने
आयुष्यात अनेक ठिकाणी आपले नशीब आजमावून पाहिले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये
त्याने सोन्याच्या खाणीमध्ये काम केलेले आहे. आफ्रिकेमध्ये हिऱ्याच्या
खाणीत काम केलेले आहे. इस्ट इंडीजमध्ये सैनिक म्हणून काम केलेले आहे. हवानामध्ये
त्याने स्वतःची सिगार फॅक्टरी टाकून पाहिलेली आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी लोकांनी
फसवल्यामुळे त्याला अपयश आलेले आहे. त्याने असा एक ग्रह करून घेतलेला आहे की पाणी,
वारा, अग्नी आणि पृथ्वी ही चार तत्वे त्याच्या अपयशाला कारणीभूत आहेत.
त्यामुळे तो अशा एका सुरक्षित जागेच्या शोधात आहे जिथे मनुष्यप्राणी वा
निसर्गतत्वे त्याच्या जवळही फिरकू शकणार नाहीत. परिणामी अॅस्पिनवॉल दीपस्तंभावरील
नोकरीच्या निमित्ताने आपला संघर्ष संपेल अशी आशा उराशी बाळगून स्काव्हिन्स्कीने
इथली नोकरी स्वीकारलेली आहे.
कथेच्या शेवटी असे दिसते की समुद्रामध्ये मोठे
वादळ आले आहे, समुद्रामध्ये प्रवास करणाऱ्या जहाजातील प्रवासी जीव वाचवण्यासाठी
धडपडत आहेत, आणि स्काव्हिन्स्की मात्र दीपस्तंभामध्ये निवांत झोप घेत आहे. जणू
काही स्काव्हिन्स्कीचा आयुष्यभराचा संघर्ष आता संपला आहे. या निर्जन बेटावरच्या
दीपस्तंभामध्ये त्याला अपयशाच्या खाईत लोटण्यासाठी ना कुठला मानवप्राणी येऊ शकणार
आहे की ना कुठले निसर्गतत्व!
अशा प्रकारे प्रस्तुत कथेतून लेखकाने मानवाच्या
सुरक्षित आयुष्य जगण्याच्या आकांक्षेवर प्रकाशझोत टाकलेला आहे. कथेतील ‘अॅस्पिनवॉल
बेट’ आणि ‘दीपस्तंभ’ यांच्याकडे सुरक्षित आयुष्याची प्रतीके म्हणून पाहता येईल.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Practice Test:
१) वरील स्टडी मटेरियल अभ्यासून झाल्यानंतर सोबत दिलेली सराव प्रश्नपत्रिका सोडवा. सर्व उत्तरे जोपर्यंत बिनचूक येत नाही तोपर्यंत ही सराव प्रश्नपत्रिका वारंवार सोडवत राहा. सर्व उत्तरे बरोबर आल्यानंतर प्रश्नोत्तरे (वरील प्रश्न आणि क्विझ) आपल्या वहीमध्ये न विसरता लिहून काढा.
२) प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. लिंक ओपन न
झाल्यास ती कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा.
https://forms.gle/ypkPitN6xPXMzKJU6
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.