Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: E-Communication

Sunday 1 August 2021

E-Communication

 

(Dr Jarandikar N. A.)

BA Part II/English Compulsory/Semester IV

E-Communication

1. Email:

  •          Email हा Electronic Mail या शब्दाचा short form आहे.
  •          Email ही पत्रलेखनाची सुधारित आवृत्ती आहे.
  •          Email पाठवणे/स्वीकारणे यासाठी आपल्याकडे Internet असणे गरजेचे असते.
  •           Email साठी कागद लागत नसल्याने ही प्रक्रिया Eco-friendly (पर्यावरण पूरक) मानली जाते.
  •          Google द्वारे ज्या Email चा आपण वापर करतो त्याला Gmail असे म्हणतात.
  •          Email पाठवण्यासाठी प्रथम Internet वरती आपला स्वतःचा एक पत्ता असणे गरजेचा आहे. या पत्त्याला Email ID असे म्हणतात.
  •          Email ID हा small letters मध्ये असतो. यामध्ये @ या चिन्हाचा वापर केला जातो. या चिन्हाचा उच्चार at the rate असा केला जातो.
  •          Email ID मध्ये तीन भाग असतात. पहिल्या भागामध्ये आपले नाव येते. यानंतर @ हे चिन्ह येते. नंतर host of the email account म्हणजेच gmail/hotmail/rediffmail/yahoo आणि the domain म्हणजेच .com/.in/.org या गोष्टी येतात.
  •          Email पाठवताना एक डायलॉग बॉक्स ओपन होतो. यामध्ये पुढील गोष्टी असतात:

१) To: याच्यापुढे ज्याला Email पाठवायची आहे त्या व्यक्तीचा Email ID टाकावा लागतो.

२) Cc, Bcc: To च्या उजव्या बाजूला या दोन गोष्टी दिसतात. यातील Cc चा अर्थ Carbon Copy असा होतो. तीच Email जर अनेकांना पाठवायची असेल तर या बटनावर क्लिक करून ज्यांना Email पाठवायची आहे त्यांचे Email ID टाईप करावेत.

३) Bcc म्हणजे Blind Carbon Copy. जर आपणाला एका वेळी अनेकांना मेल करायची असेल आणि ती कोणाकोणाला पाठवलेली आहे हे इतरांना कळू द्यायचे नसेल त्यावेळी हा ऑप्शन वापरला जातो.

४) Subject: यामध्ये आपण मेलमधील महत्त्वाचा विषय सांगत असतो. Email ID वरून नेमकी कोणाची मेल आहे हे कळू शकत नाही. तसेच असंख्य मेल असतील तर वाचणाऱ्याला Subject वरून मेलचा विषय सहजी कळू शकतो. (समोरच्याने आपली मेल वाचली आहे की नाही हे आपणाला कळू शकत नाही.)

५) Message Box: यामध्ये आपण आपले सर्व पत्र लिहित असतो.

  •          पत्राप्रमाणे Email ही Formal/Informal असते. जर आपण एखाद्या कंपनीला/अधिकाऱ्याला Email पाठवत असू तर तिला Formal Email असे म्हणतात. तर आपल्या मित्राला, मैत्रिणीला, नातेवाईकांना, ओळखीच्या व्यक्तीला Email पाठवत असू, तर तिला Informal Email असे म्हणतात.
  •          पत्राप्रमाणे Email ला देखील Salutatation (पत्राची सुरुवात) आणि Complimentary close (पत्राचा शेवट) असतो.

ü  Salutatation: Dear Sir/ Dear Madam/Hello Baba/Hi Nikita

ü  Complementary close: Yours sincerely/Yours faithfully/Yours truly

  •   Email चा आपल्या दैनंदिन वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. Email चे या व्यतिरिक्त अन्य काही प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:  
  •          Email Discussion Group: हा Whats app group प्रमाणे असतो.विशिष्ट विषय/व्यक्ती यांचा हा ग्रुप असतो. Google Group च्या द्वारे असा ग्रुप तयार करता येतो. Teaching-learning प्रक्रियेमध्ये अशा ग्रुपचा चांगल्या पद्धतीने वापर होऊ शकतो.
  •   Email Pals: पूर्वी ‘पेन फ्रेंड’ नावाची एक सुविधा होती. ज्यामध्ये तुम्ही अनोळखी व्यक्तींशी पत्राद्वारे मैत्री करू शकत होता. त्याप्रमाणेच Email Pals चे काम चालते. संस्कृती, भाषा, परंपरा भावना इ. गोष्टींची देवाणघेवाण करण्यासाठी Email Pals चा वापर केला जातो.

2. Blogs:

ü  मूळच्या Weblog या शब्दापासून Blog हा शब्द तयार झालेला आहे.

ü  Blog म्हणजे एखाद्या व्यक्तीने तयार केलेली वेबसाईट होय. ही वेबसाईट एखाद्या विशिष्ट विषयावरील, संस्थेसंदर्भातील असू शकते.

ü  Blog ला ‘Online Diary’ असेही म्हणतात.

ü  Header, Sidebar, Footer हे blog चे घटक असतात. Header मध्ये Blog चा main content येत असतो.

ü  जो Blog लिहित असतो त्याला Blogger असे म्हणतात. Blog तयार करणे आणि लिहिणे या क्रियेला Blogging असे म्हणतात.

ü  Personal Blogs, Professional Blogs असे Blog चे प्रकार आहेत.  

*        *        *        *        *

  •          Email संदर्भातील अधिक माहितीसाठी पुढील व्हिडीओ पहा. लिंक ओपन न झाल्यास लिंक कॉपी करून युट्युब/गुगलमध्ये पेस्ट करावी.

      https://www.youtube.com/watch?v=00e8V49Yti8

  •          Blog संदर्भातील अधिक माहितीसाठी पुढील व्हिडीओ पहा. लिंक ओपन न झाल्यास लिंक कॉपी करून युट्युब/गुगलमध्ये पेस्ट करावी.

            https://www.youtube.com/watch?v=phEt1Ykeodk

 

*        *        *        *        *

Practice Test: सोबत दिलेली सराव प्रश्नपत्रिका पुन्हा पुन्हा सोडवा. सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. लिंक ओपन न झाल्यास ती कॉपी करा व गुगलमध्ये पेस्ट करा.  

https://forms.gle/8NpE6UuVP8uuBuEK6

 

 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Group Discussion

 (e-content developed by Dr N A Jarandikar) GROUP DISCUSSION ·          Group Discussion: Q. 3 (A) – Marks: 08 ·          Group Discussi...