The Lost Child
-Mulk
Raj Anand
The story ‘The Lost Child’ is
written by Mulk Raj Anand. Mulk Raj Anand was a famous Indian writer.
The story begins with a description
of one fair (जत्रा). The fair is in one village. It is the festival of
Spring (वसंत ऋतू). People are moving in the direction of the fair.
One little boy along with his mother and father is going to the fair. On the
way to the fair, the little boy is attracted by the toy shop. He lingers (रेंगाळणे)
there. But his father becomes angry. So the disappointed boy (निराश झालेला मुलगा) runs behind his parents.
On the way to the fair, there is a
mustard field (मोहरीचे शेत). The child is delighted looking at the yellow
coloured mustard field. He is attracted by the bees, butterflies and
dragon-flies. But once again, his mother asks him to hurry up.
Then they enter one grove (राई).
Here the child sees different trees such as banyan tree, jack tree, jaman tree,
neem tree. A shower of flowers of the gulmohar tree falls on the child. Then he
sees one dove. The child is excited looking at the beauty of nature. But once
again, the parents ask him to follow them.
Then they enter the fair. Here, the
child sees a sweetmeat-seller (मिठाईवाला). He is selling
gula-jaman, rasgula, burfi, jalebi. Burfi is his favourite sweet. But he knows
what would be the parent’s reply. So he doesn’t ask for any burfi.
In the fair, the child sees a
balloon seller selling colourful balloons. The child loves the balloons. But he
doesn’t ask for it because he knows what would be the parent’s reaction.
Then he sees one juggler (गारुडी)
playing a flute to a snake. He is attracted by the music. He wants to listen to
it. But he knows that the parents will call it coarse (हलक्या दर्जाचे) music.
Then the child is attracted by the
merry-go-round (पाळणा). He watches the fun for some time. He too wants to
enjoy the ride. This time, he decides that he will insist to his parents to
enjoy the merry-go-round. But what he finds that his parents are not there. He starts
crying. Near the temple, one man asks him about his parents. But the boy is
unable to answer any of his questions and goes on weeping. The man asks the boy
about burfi, balloon, music of the juggler, a horse ride. But the child is now
no more interested in all these things. He goes on crying demanding his mother
and father.
* * * * *
मुल्क राज आनंद हे या कथेचे लेखक. एका लहान मुलाचे भावविश्व
या कथेमध्ये चितारलेले आहे. एक शहरी कुटुंब एका खेड्यामध्ये वसंत ऋतूमध्ये
होणाऱ्या जत्रेला निघाले आहेत. पती-पत्नी आणि त्यांचा छोटा मुलगा असे हे कुटुंब
आहे. रस्त्यामध्ये मुलाला एक खेळण्याचे दुकान दिसते. तिथे तो काही वेळ रेंगाळतो.
पण वडील ओरडल्यावर त्यांच्या मागून धावत सुटतो. गावाकडे जाताना मध्ये एक मोहरीच्या
फुलांनी डवरलेले शेत त्याला दिसते. तिथली फुलपाखरे, भुंगे यांच्याशी त्याला
खेळावेसे वाटते. पण पुन्हा एकदा आईची हाक त्याच्या कानी येते. शेत ओलांडून ते एका
वनराईमध्ये येतात. तिथली वड, जांभळ, कडुलिंब, गुलमोहर अशी निरनिराळी झाडे पाहून तो
हरकून जातो. गुलमोहराच्या पाकळ्यांचा त्याच्यावरती वर्षाव होतो, त्यावेळी तो खूपच
आनंदून जातो. पण त्याचा हाही आनंद फार काळ टिकत नाही.
शेवटी एकदाचे ते जत्रेमध्ये पोहोचतात. जत्रेत लहान मुलाला
एक मिठाईवाला दिसतो. बर्फी, गुलाबजाम, जिलबी विकणाऱ्या त्या मिठाईवाल्याजवळ तो
रेंगाळतो. त्याला बर्फी खूप आवडत असे. पण वडलांचे उत्तर काय येणार हे ठाऊक
असल्याने तो वडलांकडे बर्फी मागणे टाळतो. मग त्याला एक रंगीबेरंगी फुगे विकणारा
दिसतो. पण हाही मोह तो टाळतो. त्याला एक पुंगी वाजवणारा गारुडी दिसतो. पुंगीच्या
सुरावटीनी मुलगा भारावून जातो. पण वडील काय म्हणतील या भीतीने तो पुढे सरकतो. मग
ते सर्वजण एका पाळण्यापाशी येऊन पोहोचतात. गोल-गोल फिरणारा, आकाशात उंच जाणारा
पाळणा तो मुलगा बराच वेळ पहात राहतो. यावेळी मात्र तो ठरवतो की आता काही वडिलांचे
ऐकायचे नाही. थोडा हट्ट करायचा आणि पाळण्यामध्ये बसायचेच.
वडलांना सांगण्यासाठी म्हणून मुलगा वळून पाहतो, तर त्याला
त्याचे आई-वडील दिसतच नाहीत. आणि मग मुलाच्या लक्षात येते की आपण जत्रेमध्ये हरवलो
आहोत. तो धाय मोकलून रडू लागतो. एका माणसाचे त्याच्याकडे लक्ष जाते. तो त्याची
चौकशी करतो. त्याचे रडणे थांबावे म्हणून तो मुलाला बर्फी, पाळणा, गारुडी यांचे
आमिष दाखवतो. पण मुलाला आता जत्रेतल्या या सगळ्या गोष्टींपेक्षा त्याचे दटावणारे
आई-वडीलच महत्त्वाचे वाटतात. त्यांची आठवण येऊन तो पुन्हा रडू लागतो.
* * * * *
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.