(J D Ingawale)
बी.काॅम ३ सेमि.६ व्यावसायिक पर्यावरण
जागतिकीकरणाच्या काळातील भारताचा विदेशी व्यापार
(Foreign Trade in the Globalization
Era)
प्रास्ताविक
देशाच्या आर्थिक विकासात विदेशी व्यापाराची भूमिका महत्त्वाची ठरते. भारतात १९९१ नंतर जागतिकीकरणाचा स्वीकार केला.
जागतिकीकरणाच्या काळात भारताच्या विदेशी व्यापाराचे आकारमान, रचना आणि दिशा यामध्ये बदल घडून आला आहे. या बदलांचा आढावा या प्रकरणात घेणार आहोत. जागतिकीकरणाच्या काळातील भारताच्या परकीय व्यापाराचे आकारमान : सन १९९१ नंतरच्या काळातील भारताचा निर्यात-आयात व्यापारातील विस्तार मोठ्या प्रमाणात झाला भारताचा २०१३-१४ मधील निर्यात वृद्धीचा दर १५.९ टक्के आणि आयात वृद्धीचा दर १.६९ टक्के होता.
त्यामुळे या वर्षात व्यापार तुटीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली.
भारताच्या विदेशी व्यापाराची रचना (Composition of India's Foreign Trade)
आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या रचनेत आयात निर्यात कशा प्रकारची आहे याचा अभ्यास अभिप्रेत आहे.
देशाच्या आर्थिक परिस्थितीची योग्य कल्पना येण्यासाठी विदेशी व्यापाराची रचना पाहणे आवश्यक आहे.
भारताच्या आयातीचा आकृतिबंध निर्यातीचे वर्गीकरण हे मोठे परिमाण आयात व बिगर मोठे परिमाण (भर) आयात
(Bulk | Imports and Non-bulk Imports) असे केले जाते. मोठे परिमाण आयातीची तीन घटकांत विभागणी केली जाते. (अ) इंधन, कच्चे तेल व उत्पादने.
(ब) मोठे परिमाण असणाऱ्या उपभोग्य वस्तूंमध्ये तृणधान्ये,
कडधान्ये, खाद्य तेले व साखर यांचा समावेश होतो. (क) इतर मोठे परिमाण असणाऱ्या घटकांत खते, अलोह धातू, पेपर व पेपर बोर्ड, पल्प (लगदा), पेस्ट पेपर (कागदी टोपली), रबर, धातू माती, लोखंड व पोलाद यांचा समावेश होतो.
बिगर परिमाण आयातीचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले जाते. (अ) भांडवली वस्तू ज्यामध्ये धातू, यंत्रे, विद्युत व बिगर विद्युत यंत्रसामग्री, वाहतूक साधने आणि प्रकल्प वस्तूंचा समावेश होतो. (ब) प्रामुख्याने निर्यातीभिमुख घटकांमध्ये मोती, मौल्यवान व अर्ध मौल्यवान खडे, सेंद्रिय व निरिट्रिीय रसायने, कपडे,
सूत व तयार कपडे, काजूगर यांचा समावेश होतो. (क) इतरांमध्ये कृत्रिम राळमिश्रित व प्लॅस्टिक वस्तू, व्यावसायिक आणि शास्त्रीय उपकरणे,
कोळसा व कोक, रसायने वैद्यकी-औषधे निर्माण उत्पादने, बिगर-धातू,
धातू यंत्रे इत्यादींचा समावेश होतो.
सारांश, भारतीय विदेशी व्यापाराच्या रचनेचा विचार करताना सन १९९०-९१ नंतर | परिमाण आयात घटत असून बिगर परिमाण आयात वाढत आहे.
भारतातील प्रमुख वस्तूंची आयात
.
१. अन्नधान्याची आयात सुरुवातीच्या काळात भारतात अन्नधान्याची आयात मोठ्या प्रमाणात करावी लागत असे. पण हरित क्रांतीने भारताने अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्णता प्राप्त केल्याने अन्नधान्याची आयात हळूहळू कमी होत गेली. सन १९८०-८१ मध्ये ती केवळ १०० कोटी रुपयांची होती तर सन १९९०-९१ मध्ये अन्नधान्याची आयात ६७३ कोटी रुपये एवढी वाढली. ती एकूण निर्यातीच्या २.२% होती. पण हा हिस्सा वाढून सन २००२-०३ मध्ये ४% झाली. या वाढीचे कारण खाद्यतेलाची वाढती आयात होय. पण सन २०००-०१ मध्ये अन्नधान्याची आयात नाममात्र म्हणजे फक्त ९० कोटी रुपये होती. भारत हा शेतीप्रधान देश असूनही आणि देशांतर्गत अन्नधान्याचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढले असूनही भारताला अन्नधान्याची आयात करावी लागते हे सत्य आहे.
२. पेट्रोलियम तेल व यंत्रतेल (यंगण) : भारतात खनिज तेलाची विशेषतः पेट्रोलची टंचाई असल्याने खनिज तेलाची आयात मोठी आहे. अलीकडे तेल उत्पादक देशांनी (OPEC) तेलाच्या किमती प्रचंड वाढविल्याने सन १९७३-७४ पासून पेट्रोलच्या आयातीच्या किमतीत सातत्याने वाढहोत आहे. सन १९८०-८१ मध्ये पेट्रोलियम तेल व वंगण यांची आयात ५,२६४ कोटी रुपयांची होती ती सन १९९०-९१ मध्ये दुपटीने वाढून १०,८१६ कोटी रुपये झाली.
३. खते : भारतीय शेती व्यवसायात नवीन तंत्राचा वापर करावयास सुरुवात झाल्याने खतांच्या आयातीत वाढ होत गेली. सन १९८०-८१ मध्ये खतांची आयात ८१८ कोटी रुपयांची होती ती सन १९९०
- ९१ मध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढून १७६६ कोटी रुपयांची झाली.
४. रसायने, द्रव्ये व औषधे
: रासायनिक पदार्थ, द्रव्ये व औषधे यांच्या आयातीत सातत्याने वाढ होत आहे. यांची आयात सन १९८०-८१ मध्ये ३५८ कोटी रुपयांची होती ती बाढून सन २०००-०१ मध्ये १५४२ कोटी रुपये झाली.
५. मोती व हिरे-माणिक इत्यादी भारतात या मौल्यवान वस्तूंची मागणी वाढत आहे. तसेच हा महत्त्वाचा निर्यात मिळकत उद्योग आहे. कारण यासाठी मोती, कच्चा माल यांची आयात करावी लागते. सन १९८०-८१ मध्ये मोती, हिरे-माणिक आदींची आयात ४१७ कोटी रुपयांची होती ती सन १९९०-९१ मध्ये ३,७३८ कोटी रुपये झाली ती जवळजवळ ९ पटीने बाढली.
६. धातू (अलोह व बिगर अलोह) : लोखंड,
पोलाद, इतर अलोह धातूंच्या आयातीत बेगाने वाढ होत आहे. जलद औद्योगिकीकरण, रेल्वेचा विकास, जलविद्युत प्रकल्प यासाठी या धातूंची आयात सातत्याने वाढत आहे.
भांडवली वस्तू भांडवली वस्तूंची आयात सन १९८०-८१ मध्ये १,९१० कोटी रुपये होती ती प्रचंड वाढून सन १९९०-९१ मध्ये १०,४७१ कोटी रुपये झाली. ही वाढ ५.५ पट होती.
(अ) धातूची यंत्रसामग्री:
भारताच्या जलद औद्योगिकीकरणाच्या उद्दिष्टाने यंत्रसामग्रीची आयात सातत्याने वाढत होती. सन १९८०-८१ मध्ये ही आयात ९० कोटी रुपयांची होती. ही आयात सन २०००-०१ मध्ये १७९० कोटी रुपये तर सन २००९-१० मध्ये ११,३९६ कोटी रुपये एवढी वाढली.
(ब) बिगर विद्युत यंत्रसामग्री: औद्योगिकीकरणात बिगर विद्युत यंत्रसामग्रीची वाढती आवश्यकता असते. या यंत्रसामग्रीची आयात सन १९८०-८१ मध्ये १०८९ कोटी रुपये होती ती सन १९९०-९१ मध्ये ३,७६८ कोटी रुपये झाली.
(क) विद्युत यंत्रसामग्री,
इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर यांची आयात सन १९८०-८१ मध्ये २६० कोटी रुपयांची होती ती सन १९९०-९१ मध्ये १,७०२ कोटी रुपये झाली.
(४) वाहतुकीची साधने : सन १९८०-८१ मध्ये वाहतुकीच्या साधनांची आयात ४७२ कोटी रुपये होती ती सन १९९०-९१ मध्ये १,६७० कोटी रुपये झाली. सन २००७-०८ मध्ये या आयातीत वेगाने वाढ होऊन ती ८०,९७१ कोटी रुपये झाली.
भारताच्या निर्यातीची रचना
१. शेती व तिच्याशी संलग्न उत्पादने (Agriculture and Allied
Products) : यामध्ये चहा, कॉफी, तंबाखू,
मसाले, साखर, कापूस,
तांदूळ, मासे, मांस,
वनस्पती तेल,
भाजीपाला व डाळी यांचा समावेश होतो. सन १९९०-९१ मध्ये यांची निर्यात ६, ३१७ कोटी रुपये होती ती २००८-०९ मध्ये ८०,६४९ कोटी रुपये एवढी प्रचंड वाढली.
२. खनिजे यात अशुद्ध मँगनीज, अभ्रक व लोखंड यांचा समावेश होतो. सन १९९०-९१ मध्ये यांची निर्यात १,४९७ कोटी होती. ती बाढून सन २००८-०९ मध्ये ३५,८७७ कोटी रुपये झाली.
३. कारखानदारी माल (Maufactured Goods) : यात सुती कपडे, तयार कपडे, ज्यूटच्या वस्तू, कमावलेले चामडे, पादत्राणे,
गालिचे, हस्तव्यवसायातील वस्तू, मोती, मौल्यवान हिरे, रसायने, इंजिनिअरिंग वस्तू,
लोखंड व पोलाद इत्यादींचा समावेश होतो. भारताच्या एकूण निर्यातीत या विभागाचा एकूण हिस्सा सन १९७०-७१ मध्ये ५०.३% होता तो वाढून सन २००८-०९ मध्ये ६७.४% झाला. याचा अर्थ भारत औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश बनत आहे भारताची निर्यात कारखानदारी मालाला अनुकूल होत आहे.
४. खनिज इंधन व वंगण तेल (Mineral,
Fuels and Eluding Coal) : यामध्ये पेट्रोल, बंगण, पेट्रोलजन्य पदार्थ इत्यादींचा समावेश होतो. सन १९७०-७१ मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत या घटकाचा हिस्सा ०.८% होता तो वाढून सन २००८-०९ मध्ये १४.७% झाला.
५. इतर : इतरमध्ये वरील गटात समाविष्ट झालेल्या वस्तू निर्यात होणाऱ्या इतर वस्तूंचा समावेश होतो. यांची निर्यात भारताच्या एकूण निर्यातीत सन १९७०-७१ मध्ये ६.५% होती ती घटून सन २००८-०९ मध्ये ४.१% झाली.
प्रमुख वस्तूंची निर्यात
.१. चहा पूर्वीपासून भारतीय निर्यातीत चहाच्या निर्यातीला महत्त्वाचे स्थान आहे. अनेक वर्षे भारताच्या निर्यातीत चहाचा पहिला क्रमांक आहे.
सन १९९०-९१ मध्ये चहाची निर्यात १,०७० कोटी रुपयांची होती. ती वाढून सन २००९-१० मध्ये २,९४४ कोटी रुपये झाली. अर्थात, अलीकडे निर्यातीतील चहाचे महत्त्व कमी होत आहे.
२. कॉफी: भारतीय कॉफीची निर्यात वेगाने वाढत आहे. सन १९९०-९१ मध्ये कॉफीची निर्यात २५२ कोटी रुपयांची होती ती सन २००९-१० मध्ये २,०३२ कोटी रुपये झाली.
३. फळे व भाजीपाला भारतातील हरित क्रांतीने अन्नधान्याच्या उत्पादनात वेगाने वाढ होऊन देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबन प्राप्त झाले. पण भारतीय शेतकऱ्यांनी विविध शेतीमालाचे उत्पादन वाढवून निर्यातही सुरू केली आहे. सन १९९०-९१ मध्ये फळे व भाजीपाल्याची निर्यात ३३५ कोटी रुपयांची होती ती सन २००९-१० मध्ये ६,३७० कोटी रुपये एवढी वाढली. द्राक्षे,
आंबे, चिकू इत्यादी विविध फळे व भाज्यांची निर्यात वाढत आहे. हा भारतीय शेतीरचनेतील चांगला बदल दर्शवितो.
४. कापूस व सुती कापड पूर्वीपासून या वस्तूंना भारताच्या निर्यातीत वेगळे स्थान आहे. सन १९९०-९१ मध्ये या वस्तूंची निर्यात २,१०० कोटी रुपयांवरून सन २००९-१० मध्ये १७,४७९ कोटी रुपयांपर्यंत वाढली.
मात्र या निर्यातीत भारताला आंतरराष्ट्रीय बाजारात तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागते. कारण भारतात वाढता मजूर खर्च व जुनी यंत्रसामग्री यामुळे उत्पादन खर्च अधिक असतो.
५. चामडे व चामड्याच्या वस्तू: भारतात पूर्वीपासून कच्च्या चामड्याची निर्यात होत असे. परंतु अलीकडे कमावलेले कातडे व चामड्याच्या वस्तू (बूट, चप्पल,
बॅगा इत्यादी)
यांची निर्यात वाढलेली आहे. सन १९९०-९१ मध्ये या वस्तूंची निर्यात २,५६६ कोटी रुपये होती ती सन २००९-१० मध्ये १५,९४६ कोटी रुपये झाली. भारताला निर्यातीद्वारे परकीय चलन मिळवून देण्यात या वस्तूंचा वरचा क्रमांक आहे.
६. कच्चे लोखंड: भारतातून कच्च्या लोखंडाची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. सन १९९०-९१ मध्ये निर्यात १,०४९ कोटी रुपयांची होती ती वाढून सन २००९-१० मध्ये २८,३६६ कोटी रुपये झाली. अभ्रक व मँगनीज यांची निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारताने आपल्या पोलाद कारखान्यात कच्च्या लोखंडाचा अधिक वापर करून पोलाद निर्यात वाढविणे गरजेचे आहे. विशेषत: चीनच्या वाढत्या मागणीने कच्च्या लोखंडाची निर्यात वाढत आहे.
७. तंबाखू : ही भारताची पारंपरिक निर्यात वस्तू आहे. सन १९९०-९१ मध्ये भारताला तंबाखूच्या निर्यातीपासून २६३ कोटी रुपये मिळाले होते तर सन २००९-१० मध्ये ४,३४४ कोटी रुपये मिळाले.
८. इंजिनिअरिंग वस्तू सन १९९०-९१ मध्ये भारतातून इंजिनिअरिंग वस्तूंची निर्यात ३,८७७ कोटी रुपयांवरून सन २००९-१० मध्ये १,८१,०७३ कोटी रुपये एवढी प्रचंड वाढली. भारताच्या निर्यातीमध्ये सध्या या वस्तूंचा प्रथम क्रमांक आहे. भारताच्या औद्योगिक विकासाचे हे लक्षण आहे. एकूण निर्यातीत इंजिनिअरिंग वस्तूच्या निर्यातीचा हिस्सा २१.४ टक्के आहे. हे अतिशय महत्त्वाचे साध्य आहे.
९. काजूगर काजूची निर्यात ही भारताची पारंपरिक निर्यात आहे.
सन १९९०-९१ मध्ये काजूगराची निर्यात ४४७ कोटी रुपयांची होती ती वाढून सन २००९-१० मध्ये २,८२९ कोटी रुपये झाले.
१०. तयार कपडे: अलीकडे या अपारंपरिक वस्तूंच्या निर्यातीला महत्व प्राप्त झाले आहे. सन १९९०-९१ मध्ये तयार कपड्यांची निर्यात ४,०१२ कोटी रुपयांची होती ती वाढून सन २००९-१० मध्ये ५०,७९१ कोटी रुपये झाली. परकीय चलन मिळवून देणाऱ्या या निर्यातीला सध्या महत्त्व प्राप्त झाले आहे. या व्यवसायाने सन २००९-१० मध्ये भारताच्या निर्यात मिळकतीत चौथे स्थान प्राप्त केले आहे.
११. हस्त व्यवसायातील वस्तू
: सध्या भारतीय हस्तकला वस्तूंच्या निर्यातीने महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे. हस्तकलेच्या वस्तूंमध्ये गालिचे, धातूच्या कलाकुसरीच्या वस्तू,
शाली, लाकडाची खेळणी, रत्ने, हिरे,
माणके इत्यादींचा समावेश होतो. या वस्तूंची निर्यात सन १९९० ११६,१६७ कोटी रुपयांची होती ती सन २००९-१० मध्ये १,४२,०७६ कोटी रुपये झाली. यापैकी मोती व रत्नांची निर्यात मोठ्या प्रमाणात होती. सन २००९-१० मध्ये भारताच्या निर्यात मिळकतीत या व्यवसायाचे दुसरे स्थान होते.
१२. मासे व माशांचे पदार्थ : भारतातून मासे व त्यापासून केलेल्या विविध पदार्थांची निर्यात वाढत आहे. सन १९९०-९१ मध्ये पदार्थांची निर्यात ९६० कोटी रुपयांची होती ती वाढून सन २००९-१० मध्ये ९,९०० कोटी रुपये झाली. भारताला लाभलेल्या प्रचंड समुद्रकिनाऱ्याचा हा लाभ आहे. भविष्यात हा व्यवसाय भारताला अधिक परकीय चलन मिळवून देईल.
१३. तांदूळ : तांदळाचा सुधारित वाण विकसित झाल्याने तांदळाची निर्यात वाढत आहे. सन १९९०-९१ मध्ये तांदळाची निर्यात ४६२ कोटी रुपयांची होती ती वाढून सन २००९-१० मध्ये ११,२५५ कोटी रुपये झाली.
निर्यातीची बदलती रचना
१. भारत हा परंपरागत शेतीप्रधान देश आहे. पण अलीकडे शेती कच्चा माल व संलग्न उत्पादनांची निर्यात सातत्याने घटत आहे. विशेषतः अन्न, पेय, तंबाखू यांची निर्यात घटत आहे. कारण वाढत्या लोकसंख्येने या वस्तूंची देशांतर्गत मागणी वाढत आहे.
२. चहासारख्या परंपरागत वस्तूची निर्यात वाढत आहे. पण तिची निर्यात सरकारी अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. या संबंधात या वर्गातील इतर काही उत्पादनांना महत्त्व प्राप्त होत आहे. उदा. मासे व मत्स्य पदार्थ, काजूगर,
कॉफी, तांदूळ, फळे व भाजीपाला इत्यादी.
३. भारताच्या वेगवान औद्योगिक प्रगतीने अलीकडे बिगर-परंपरागत वस्तू म्हणून इंजिनिअरिंग वस्तू निर्यातीला महत्त्व प्राप्त होत आहे. तसे हस्तव्यवसाय ज्यामध्ये मोती, हिरे-माणके इत्यादी दागिने, लोखंड-पोलाद, यंत्रसामग्री, वाहतूक व धातू यंत्रसामग्री, कच्चे लोखंड, रसायने, तयार कपडे इत्यादी. सध्या भारताच्या निर्यातीत या वस्तूंचा हिस्सा ७० टक्के आहे. कारण या वस्तूंची प्रगत देशांच्या बाजारपेठांत आपले स्थान प्रस्थापित केले आहे.
४. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व सॉफ्टवेअर यांची निर्यात वेगाने वाढली. हा विकास स्पृहणीय आहे. तिला बळकटी देणे महत्त्वाचे आहे.
५. विशेषतः कच्च्या लोखंडाची वाढती निर्यात चिंताजनक आहे. कारण या मूलभूत विकास वस्तूंचा वापर करण्यात अर्थव्यवस्था असमर्थ ठरत आहे. कारण देशात लोखंड, पोलादतयार करण्याऐवजी आपण त्यांची अधिक आयात करीत आहोत. देशाच्या पोलाद उत्पादन क्षमतेचा पर्याप्त वापर केला जात नाही. यासाठी भारताच्या निर्यातीत बिगर परंपरागत वस्तूंचा हिस्सा वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
६. भारताच्या परंपरागत वस्तूंची निर्यात वाढत आहे पण ती अधिक वेगाने वाढली पाहिजे.
७. भारताच्या निर्यातीची रचना असे दर्शविते की,
भारतीय अर्थव्यवस्थेचे विविधीकरण होत आहे. बिगर-परंपरागत वस्तूंच्या निर्यातीला महत्त्व प्राप्त होत आहे.
८. औद्योगिक देश व मध्य-अशियाई देश यांच्या वाढत्या मागणीने इंजिनिअरिंग वस्तूंची निर्यात विस्तारत आहे.
रस्ते, बंदरे, रेल्वे बांधणी, टेलिकम्युनिकेशन,
नागरी बांधणी असे प्रकल्प भारत हाती घेत आहे.
९. हस्तोद्योग, इंजिनिअरिंग वस्तू, तयार कपडे, साखर, ज्यूट, सूत इत्यादी वस्तूंची निर्यात प्रचंड संभाव्य आहे. भारताने त्याचा अधिक लाभ घेतला पाहिजे. भारताने या अनुकूल मागणीचा फायदा घेतला पाहिजे. त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात आकर्षक किंमत प्राप्त करण्याची संधी आहे.
१०. नवीन शेती धोरणाने शेतमालाची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढणे अपेक्षित आहे. तांदूळ निर्यातीने तसेच फळे, भाजीपाला, प्रक्रिया अन्न इत्यादी निर्यातीत महत्त्वाचे स्थान प्राप्त करीत आहेत.
११. रसायन व संलग्न उत्पादने : भारतातून या वस्तूंची निर्यात वेगाने वाढत आहे. स १९९०-९१ मध्ये यांची निर्यात ३,५५८ कोटी रुपये होती ती वाढून सन २००९-१० मध्ये १,०८,६८७ कोटी रुपये झाली. या वर्षात निर्यातीत या वस्तूंची निर्यात तिसऱ्या क्रमांकावर होती. सन २०१३-१४ मध्ये भारताच्या निर्यातीत पेट्रोलियम उत्पादने, हिरे आणि ज्वेलरी,
वाहतुकीची साधने,
यंत्रसामग्री, औषधे इत्यादींचा प्रामुख्याने समावेश होता. संबंधित आर्थिक वर्षात २७,१४,१८२ कोटी रुपयांची निर्यात झाली.
भारताच्या परकीय व्यापाराची दिशा (Direction of India's Foreign
Trade )
१. आर्थिक सहकार व विकासासाठी संघटना (Organisation for Economic Co-operation and
Development OECD) यामध्ये युरोपीय संघातील बेल्जियम, फ्रान्स,
जर्मनी,इटली, नेदरलँड व इंग्लंड यांचा समावेश होतो. तसेच उत्तर अमेरिकेतील कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि इतर देशांत ऑस्ट्रेलिया, जपान,
स्वित्झर्लंड यांचा समावेश होतो.
२. पेट्रोल निर्यात देशांची संघटना (Organisation for Petroleum
Exporting Countries OPEC) यामध्ये इराण, इराक, इंडोनेशिया,
कुवेत, सौदी अरेबिया व युएइ यांचा समावेश होतो.
३. पूर्व युरोप यामध्ये रशियाचा समावेश होतो.
४. विकसनशील देश यामध्ये आशियातील चीन, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, मलेशिया,
सिंगापूर व सार्क (South Asian Association for
Regional Co-operation SAARC) यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगला देश, नेपाळ, भूतान, श्रीलंका व मालदीवचा समावेश होतो. तसेच आफ्रिका व लॅटिन अमेरिकाही येतात.
भारताच्या विदेशी व्यापाराची दिशा
१. आर्थिक सहकार व विकास संघटनेकडील निर्यात व आयात : सन १९८७-८८ मध्ये या देशांकडे निर्यात ५८.९% होती ती घसरून सन २००९-१० मध्ये ३६.९% झाली. त्याचप्रमाणे याच कालावधीत या देशांकडील आयातही ५९.८% वरून घसरून ३२.४ टक्क्यांवर आली.
साधारणत: असे आढळून येते की ही घसरण युरोपीय संघ,
उत्तर अमेरिका
(अमेरिकेच्या संयुक्त संस्थानासह) व इतर ऑस्ट्रेलिया, जपान व स्वित्झर्लंड देशांत आढळते. या गटातील फ्रान्स,
, बेल्जियम, जर्मनी, इंग्लंड,
इटली, कॅनडा, अमेरिका
(USA) या सर्व देशांच्या व्यापाराची टक्केवारी सन १९८७-८८ शी तुलना करता सन २००९-१० मध्ये घटलेली आढळते. त्याचप्रमाणे इतर ओइसीडी देश ऑस्ट्रेलिया,
जपान व स्वित्झर्लंड यांच्यापैकी जपान वगळता इतर दोन देशांच्या व्यापारातील टक्केवारी वाढली आहे.
२. पेट्रोल निर्यात देशांच्या संघटनेतील विभाग: या संघटनेतील देशांशी सन १९८७ ८८ मध्ये निर्यात व्यापाराची टक्केवारी ६.१% होती ती वाढून सन २००९-१० मध्ये २१.१% झाली. याच कालावधीतील आयातीतील वाढ मात्र १३.३ टक्क्यांवरून वाढून ३०.९% झाली.
या देशांत यु.ए.ई. सर्वांत महत्त्वाचा देश असून त्या पाठोपाठ इंडोनेशिया व सौदी अरेबिया यांचा क्रम लागतो.
३. पूर्व युरोप : यामधील विशेषत: रशियाने महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे. पण सन २००९-१० मध्ये या देशाची होणारी आयात-निर्यात सातत्याने घटत आहे. कारण रशियाच्या विघटनामुळे व्यापारी संबंधात बदल घडून आलेला आहे. यामधील अनेक संस्थाने सन १९९२-९३ नंतर स्वतंत्र झाली.
४. विकसनशील देशांशी भारताचा व्यापार यातील आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिका यातील वाढता कल दिसून येतो. सन १९८७-८८ मध्ये या विकसनशील देशांकडील निर्यात १४.२% होती ती वाढून सन २००९-१० मध्ये ३९.३% झाली. यातील आशियातील निर्यात याच कालावधीत ११.९टक्क्यांवरून २९.९% एवढी उल्लेखनीय वाढ झाली. यामधील चीन व हाँगकाँग यांचा हिस्सा आपल्या निर्यातीत १०.९% होता.
सार्क विभागातील राष्ट्रांचा हिस्सा ४.७% होता.
त्याचप्रमाणे विकसनशील देशांतील आयात सन १९८७-८८ मध्ये १७.३% होती ती वाढून सन २००९-१० मध्ये ३२.६% झाली. आशिया या एकाच देशात सन् २००५-०६ मध्ये २५.७% आयात होती. अर्थात, आशियात चीन, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, मलेशिया,
सिंगापूर या देशांचा समावेश होतो. मात्र याच वर्षी सार्कमधील आयात फक्त ०.६% होती.
सन २००९ १० मध्ये आयातीतील चीन व हाँगकाँग यांचा हिस्सा १२.३% होता. अर्थात, चीन व हाँगकाँग याचे सामिलीकरण झाल्याने सन २००९-१० मध्ये भारताचा दुसन्या नंबराचा व्यापारी भागीदार होता.
अर्थात, पहिला नंबर USA चा होता. यामुळे इंग्लंड, बेल्जियमसारखे देश मागे पडले.
५. आफ्रिका : भारताचा आफ्रिकेशी विदेशी व्यापार सन २००९-१० मध्ये निर्यात ५.८% आणि आयात ७.२% होती.
अर्थात, भविष्यात या देशांशी व्यापारात विस्तार होण्याची शक्यता आहे.
६. अमेरिकेची संयुक्त संस्थाने
(USA) : भारताशी, अमेरिकेशी होणारी निर्यात आयात हळूहळू घटत आहे. सन १९८७-८८ मध्ये निर्यात १८.६ टक्क्यांवरून घटून ती सन २००९-१० मध्ये १०.९% झाली.
याच कालावधीत आयात ९% वरून घटून ती ५.९% वर आली. इंग्लंडचे भारताच्या निर्यात-आयात व्यापारातील पूर्वीचे महत्त्व पूर्णपणे घटले आहे. सन २००९-१० मध्ये ३.५% आणि आयात १.५% होती.
७. ऑस्ट्रेलिया, जपान, स्वित्झर्लंड
या देशांनी आपल्या देशांशी आयातीत त्याचे : स्थान सुधारले. ती सन २००९-१० मध्ये १२.६% होती. पण त्यांची निर्यात फक्त ३.१% होती.
जी सन १९८७-८८ मध्ये निर्यात १४.१% होती.
यावरून भारताचा विदेशी व्यापार अधिक पसरत आहे. आर्थिक सहकार व विकास संघटनेवरील त्याचे अवलंबित्व कमी होत आहे. विकसनशील देश विशेषतः आशियाई देशांशी निर्यात - आयात सुधारत आहे. हे भारताच्या विदेशी व्यापाराच्या दिशेचे योग्य चिन्ह आहे.
भारताच्या विदेशी व्यापारातील दिशेत लक्षणीय बदल
सन १९८७-८८ विशेषतः सन १९९१ ते २००९-१० या कालावधीत भारताच्या विदेशी व्यापाराच्या दिशेत लक्षणीय बदल झाले. त्याची चर्चा केली आहे.
१. आर्थिक सहकार व विकास संघटनेकडील निर्यात व आयात (OECD) : सन १९८७-८८ मध्ये या देशाकडे ९% होती ती घसरून १९९०-९१ मध्ये ५३.५% झाली.
ती पुन्हा वेगाने पसरून सन २००९-१० मध्ये ३२.४% झाली.
साधारणत: असे आ येते की ही घसरण युरोपीय खंड,
उत्तर अमेरिका
(अमेरिकेच्या संयुक्त संस्थानासह) व इतर ऑस्ट्रेलिया, जपान, स्वित्झर्लंड देशांतही आढळते.
२. आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील विकसनशील देश: भारताच्या या खंडातील विकसनशील देशांशी व्यापार वाढत असल्याचे दिसून येते. या विकसनशील देशांची निर्यात सन १९८७-८८ मध्ये १४.२% होती ती वाढून सन २००९-१० मध्ये ३९.३% झाली. याच कालावधीत या आशियाई देशांच्या निर्यातीत उल्लेखनीय सुधारणा झाली.
जी १२ टक्क्यांवरून २९.९% झाली तर सन २००९-१० मध्ये चीन ६.५%, हाँगकाँग ४.४%, सार्क ४.७%, अशी निर्यात होती. आयातीचा विचार करता या विकसनशील देशांची आयात सन १९८७-८८ मध्ये १७.३ टक्क्यांवरून वाढून सन २००९-१० मध्ये ३२.६% झाली.
यामधील एकट्या आशियाई देशाची आयात २५.७% होती पण सार्क विभागाची आयात फक्त ०.६% होती.
सन २००९-१० मध्ये चीन व हाँगकाँगचा हिस्सा १२.३% होता.
त, चीनमध्ये हाँगकाँगचे सामिलीकरण झाल्याने तो भारताचा मोठा व्यापारी भागीदार ठरला.
३. तेल उत्पादक देश:
आपला तेल उत्पादक देशांशी (विभागाशी)
व्यापार लक्षणीय सुधारला आहे. सन १९८७-८८ मध्ये निर्यात ६.१ टक्क्यांवरून वाढून सन २००९-१० मध्ये २१.१% झाली.
तर याच कालावधीत आयात १३.३ टक्क्यांवरून ३०.९% एवढी वाढली. यामध्ये यु.
ए. इ. (संयुक्त अरब अमराती) हा महत्त्वाचा देश असून त्यानंतर इंडोनेशिया व सौदी अरेबिया यांचा क्रम लागतो.
४. आफ्रिकेशी व्यापार: भारताचा आफ्रिकेशी व्यापार सुरू झाला. सन २००९-१० मध्ये आफ्रिकेचा हिस्सा निर्यातीत ५.८% आणि आयातीत ७.२% होता. अर्थात,
भविष्यात प्रचंड संभाव्यता (साधनसंपत्ती)
असणाऱ्या आफ्रिकेशी सध्या व्यापारात छोटी भागीदारी आहे.
५. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाशी
(USA) व्यापार व्यक्तिगत देशांचा विचार करता युएसएने पहिला क्रमांक पटकावला आहे. सन २००९-१० मध्ये भारताच्या निर्यातीत अमेरिकेचा हिस्सा १०.९% होता. तर आयातीत ५.९% होता.
दुसऱ्या क्रमाकांचा मोठा देश होता. मात्र काही वर्षे भारताच्या परकीय व्यापारात इंग्लंडचे जे महत्त्व होते ते खूपच कमी झाले आहे. कारण सन २००९-१० मध्ये इंग्लंडचा निर्यातीत ३.५% व आयातीत १.५% एवढा कमी हिस्सा होता.
६. पूर्व युरोपशी व्यापार
: पूर्व युरोप विशेषतः रशिया जो १९७० च्या दशकात आपल्या विदेशी व्यापारात महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. ते स्थान सन २००९-१० मध्ये गमावले गेले. कारण या वर्षात केवळ निर्यात ०.५% आणि आयात १.२% होती. कारण १९९२-९३ मध्ये रशियाचे विघटन होऊन अनेक राज्ये स्वतंत्र झाली.
७. ऑस्ट्रेलिया, जपान, स्वित्झर्लंडशी व्यापार या तिन्ही देशांचा सन २००९-१० मध्ये एकत्रित हिस्सा निर्यातीत ३.१% आणि आयातीत १२.४% होता.
तथापि, सन १९८७-८८ मध्ये हा हिस्सा निर्यातीत १४.१% आणि आयातीत १६.२% होता. या देशांचे विदेशी व्यापारातील महत्त्व कमी होत आहे.
८. लॅटिन अमेरिकेशी व्यापार
: लॅटिन अमेरिकेशी सन १९८७-८८ मध्ये आपला निर्यात व्यापार केवळ ०.३% होता. तो वाढून सन २००९-१० मध्ये ३.६% झाला. याच कालावधीत आयात व्यापार २.३% वरून वाढून ३.६% झाला.
लॅटिन अमेरिकेशी व्यापार विस्तारण्याची चांगली संधी आहे.
९. सहा देशांशी वाढता व्यापार युएसए, हाँगकाँग, चीन,
यु.ए.इ.,
जर्मनी, इंग्लंड व .जपान या सहा देशांची एकत्रित निर्यात सन २००९-१० मध्ये ४२.३% आणि एकत्रित आयात ३२.४% होती.
यावरून या सहा देशांचे भारतीय विदेशी व्यापारातील वाढते महत्त्व लक्षात येते.
अशा रीतीने भारताच्या विदेशी व्यापारात अधिक विविधता येत आहे आणि आर्थिक सहकार व विकास संघटनेतील (OECD) राष्ट्रांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण घटले आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.