(e-content developed by Dr N A Jarandikar)
Q. 1) Write a short note on the lost culture of the
aboriginal tribes.
The poem ‘Bora Ring' is an elegy
on the loss of the Australian aboriginal culture. This loss of the aboriginal
culture is due to the European settlers. The aboriginal rituals were closely
related to nature. But according to the poet, such culture now remains only in
memories. So, the poet says, the song is gone, the rituals have become useless
and the tribal story is lost in an alien tale. The hunter is gone, the spear is
splintered. The painted bodies of these tribal people have remained only in a
dream. And around the Bora ring, where the tribals used to sing and dance, only
the grass stands up.
Q. 2) Which activities of the
tribal life are described in ‘Bora Ring’?
The following tribal activities
are described in the poem:
i.
Singing and dancing is an important part of
their life.
ii.
Hunting (शिकार करणे) is
their main profession.
iii.
They
paint their bodies.
iv.
They
are wanderers.
v. They respect Nature.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
'बोरा रिंग' ही कविता ज्यूडीथ राईट या कवयित्रीने लिहिलेली
आहे. ज्यूडीथ राईट ही एक ऑस्ट्रेलियन कवयित्रीआहे. ऑस्ट्रेलियातील मूल निवासींच्या (Aboriginals) हक्कासाठी ती कार्यरत
असून तोच तिच्या कवितेचा विषय आहे. 'बोरा रिंग' म्हणजे एक वर्तुळ
असून मूलनिवासींच्या सांस्कृतिक-धार्मिक विधीमध्ये याचे खूप महत्व
आहे. याच वर्तुळामध्ये हे मूलनिवासी आपले नृत्य/गाणे सादर करत असतात.
कवितेमध्ये कवी म्हणतो की
मूलनिवासींचे गाणे आता निघून गेले आहे. नृत्य केवळ
नर्तकांपुरते मर्यादित राहिले आहे. धार्मिक विधी निरर्थक झाले
आहेत, आणि या आदिवासींची कहाणी
एका 'परक्या’ कहाणीमध्ये विरून गेलेली आहे. बोरा रिंग भोवती आता केवळ गवत उरले आहे. हरवलेला ‘कोराबोरा’ नृत्यप्रकार हा केवळ 'अॅपल-गम' झाडांच्या हालण्यातूनच पाहता येऊ शकतो. आता शिकारी निघून गेला आहे, त्याचा भाला
विदीर्ण झाला आहे. रंगवलेली शरीरं आता केवळ एक स्वप्न बनून राहिले आहे. या भटक्या मानवाचे पाय आता थिजले आहेत. या अशा
निर्जिव सावलीकडे पाहून एखादया घोडेस्वाराचे मन थबकते आणि मनामध्ये दडून राहिलेला शब्द हा प्राचीन शाप आणि 'केन' इतकीच पूरातन असणारी भीती यांना रक्तामध्ये
जखडून ठेवतो. (केन ही बायबलमधील एक
व्यक्तिरेखा आहे. पृथ्वीवरील पहिला गुन्हेगार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. पाप
करण्याची परंपरा त्याच्यापासुने सुरु झाल्याचे मानले जाते.)
शेवटच्या कडव्यामध्ये कवी मूलनिवासी समुदायाचे भटकणे हे प्राचीन काळापासून
असल्याचे सूतोवाच करताना दिसतो आणि भटकत राहणे हेच त्यांचे भागदेय
असल्याचे सांगत खंत व्यक्त करताना दिसतो.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आता खाली दिलेली क्विझ सोडवा. सगळी उत्तरे बरोबर येईपर्यंत क्विझ पुनःपुन्हा सोडवत रहा. सर्व उत्तरे बरोबर आल्यानंतर सर्व प्रश्नोत्तरे (वरील प्रश्न आणि क्विझ) आपल्या वहीत न विसरता लिहून काढा.
https://forms.gle/7RuKtcsL1x7gEhwi9
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.