बी ए भाग २
मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४
सञ ३
विषय प्राध्यापक - बी के पाटील
नारायण सुर्वे- कविता - दोन दिवस
कवी नारायण सुर्वे परिचय :
कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्म मुंबईत १५ आॅक्टोबर,१९२६ रोजी झाला. गंगाराम सुर्वे यांनी नारायण सुर्वेचे संगोपण केले .गंगाराम सुर्वे गिरणीकामगार होते. नारायण सुर्वेंचे बालपण याच परिसरात गेले.
वयाच्या ३६व्या वर्षी १९६२ साली ऐसा गा मी ब्रह्म हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
साहित्यसंपदा :ऐसा गा मी ब्रह्म ,माझे विद्यापीठ, जाहीरनामा इ. पुस्तके नावावर आहेत.
मिळालेली पारितोषिके :
माझे विद्यापीठ हा काव्यसंग्रह १९६६ मध्ये प्रसिध्द झाला याला ११ पारितोषिके मिळाली,
१९७३ सोव्हिएत लॅन्ड नेहरु अॅवार्ड माझे विद्यापीठ' ला.
१९९८पदमश्री पुरस्कार
मराठी कवितेत स्व:ताचे वेगळे स्थान निर्माण करणारे नारायण सुर्वे यांचे१६ आॅगस्ट २०१० रोजी ठाणे येथे निधन झाले.
दोन दिवस
दोन दिवस ही कविता दोन दिवस वाट पाहाण्यात गेले, दोन दु:खात गेले असे सांगत या दिवसांचा ताळेबंद मांडते. आता डोईवर किती उन्हाळे राहीले याचा हिशोब कवी मांडतो आहे, कवी उन्हाळे मोजतो आहे, कारण हे जीवनच तसे आहे.
आकाशात चंद्र, तारे आले. राञी धुंद झाल्या. पण हे निसर्गसौंदर्य कवीने कधी पाहिलेच नाही, हा आनंद घेतलाच नाही कारण....
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली असे कवी म्हणतात. कवीने कधी स्वत:पुरता विचार केलाच नाही. सदैव जगाचा, भोवतालचा विचार केला . म्हणूनच
" दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो" असे कवी म्हणतात.
भट्टीमध्ये पोलाद गरम करुन त्याला आकार दिला जातो. आपल्याही आयुष्याला असाच आकार येत गेला असे मोठ्या अभिमानाने कवी सांगतो. कवी कधीच तक्रार करत नाही.तर हे आयुष्यच बदलून टाकेन असा विश्वास व्यक्त करतो ही आशावादी वृत्तीच कवीच्या कवितेचे वेगळेपण आहे यात शंका नाही.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.