Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: बी. ए. भाग २ / मराठी /अभ्यासक्रमपञिका क्रं४ सञ ३/ पाठ्यपुस्तक :काव्यगंध/ पुतळे : पुतळ्याच्या माध्यमातून विकृत राजकारण.

Friday, 11 December 2020

बी. ए. भाग २ / मराठी /अभ्यासक्रमपञिका क्रं४ सञ ३/ पाठ्यपुस्तक :काव्यगंध/ पुतळे : पुतळ्याच्या माध्यमातून विकृत राजकारण.

बी. ए. भाग २

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं४

सञ ३

पाठ्यपुस्तक :काव्यगंध

विषय प्राध्यापक: प्रा. बी. के. पाटील

 पुतळे :  पुतळ्याच्या माध्यमातून विकृत राजकारण.

           पुतळे कविता एका वेगळ्या विषयावर नेमकेपणाने बोट ठेवते.समाजातील थोर लोकांच्या कार्याची ओळख पुढच्या पिढीला व्हावी, त्यांचे स्मरण राहावे म्हणून पुतळे उभे केले जातात. हे पुतळे त्या-त्या समाजाचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैचारिक प्रतीक असतात.समाजाच्या अस्मितांचे प्रतिबिंब या पुतळ्यात पडलेले असते.

   पण हे झाले आदर्श विचार. आज समाज इतका बदलला आहे, इतका विकृत झाला आहे की जगभर पुतळे तोडफोड करायचे काम बिनधास्तपणे सुरु आहे.

      अफगाणिस्तानातील गौतम बुध्दाचे सहाव्या शतकातील दोन पुतळे तालिबानी लोकांनी डायनामाईट लावून फोडले. पुण्यातील संभाजी उद्यानातील कवी राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही विकृत माणसांनी फोडला. अशा घटनांनी कवीचे संवेदनशील मन अस्वस्थ होते आणि पुतळा सारखी कविता जन्म घेते.

     यापुतळ्यांना स्व:ला काहीच कळत नसतं आणि उन्हापावसात उभं राहायची त्यांना गरजही नसते. पुतळ्यांची गरज असते आपल्याला .आपण पुतळे उभे करतो त्यांना हार वगैरे घालतो. पूजा करतो.पण दुसर्‍या कोणालाही हे पुतळे नको असतात. त्यांची मर्जी फिरली की ते दुसरे पुतळे उभे करतात.

   कवी म्हणतात:

    " एक पुतळा उभारला की तुम्ही

       एक पींजरा तयार करता

       आणि तुम्ही उभारलेल्या पुतळ्यांच गाणं

          जे जात नाही त्यांना त्यात टाकता."

       म्हणजेच आपल्या विचारांना विरोध झालेला कोणालाच चालत नाही. लगेच पिंजरे तुरुंग तयारचअसतात.या पुतळ्याखाली चौथर्‍यातून बंद ओठांची व हात बांधलेली माणसे दडपली जातात.

     आज जगभर पुतळे उभा करुन त्यामागे एक राजकारण खेळणे, सांस्कृतिक संघर्ष करणे हेच सुरु आहे. याकडे ही कविता लक्ष वेधते.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...