Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: बी.ए ३मराठी / पेपर क्रं ७/ साहित्यविचार अलंकार

Thursday, 3 December 2020

बी.ए ३मराठी / पेपर क्रं ७/ साहित्यविचार अलंकार

(E-content created by Patil B. K.)

बी.ए ३मराठी 

                                                        पेपर क्रं ७ साहित्यविचार अलंकार                                                                       

 प्रश्न: अलंकार म्हणजे काय?

अलंकारांचा परिचय

प्रस्तावना -

    अलंकार म्हणजे दागिना.अलंकार म्हणजे आभूषणे एखादी स्ञी किंवा पुरुष यांचे मूळ सौंदर्य आभूषणांनी खुलून दिसते.भाषेलाही असे अलंकार आहेत. लेखक किंवा कवी आपली नेहमीची भाषा न वापरता वेगळी भाषा वापरतात. तोच आशय  वेगळ्या भाषेत सांगतात. आपल्या भाषेला नटवतात,सजवतात,खुलवतात शब्द चमत्कृती साधतात.

      'काव्याचे सौंदर्य वाढवणारे, त्यांची शोभा वाढविणारे जे गुणधर्म असतात त्यांना अलंकार असे म्हणतात.

 उदा. तुझी चाल तुरुतुरु, उडती केस भुरु भुरु,

   डाव्या डोळ्यावर बट ढळली।

    जशी मावळत्या उन्हात, केवड्याच्या बनात,

     नागीण सळसळली ।। 

          असे प्रेयसीचे वर्णन कवी करतो. हे वाचून मनाला समाधान वाटते, ही किमया आहे भाषेची.

      व्याख्या:"कोणतेही गद्य किंवा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा काव्यात्मक साचा म्हणजे अलंकार होय."

   भाषेच्या अलंकारांचे दोन प्रकार:

    १ शब्दालंकार २ अर्थालंकार

१ शब्दालंकार: 'ज्यात शब्दचमत्कृती असते व ज्यामुळे भाषेला शोभा येते त्याला शब्दालंकार म्हणतात. 

शब्दालंकार हे शब्दांच्या विशिष्ट रचनेवर आधारित असतात. त्या शब्दांच्या जागी दुसरे शब्द योजून चालत नाही. शब्दालंकारात शब्दांचे सौंदर्य कानाला गोड वाटते.

  शब्दालंकारांचे ३ प्रकार आहेत

   १)अनुप्रास २)यमक ३)श्लेश

२ अर्थालंकार: अर्थालंकार हे अर्थावर अवलंबून असतात. एखाद्या वाक्यात किंवा ओळीत योजलेल्या शब्दांबद्दल त्याच अर्थाचे दुसरे शब्द योजले तरी त्यामुळे काहीच फरक पडत नाही. त्यास अर्थालंकार म्हणतात. अर्थ हा शब्दाचा आत्मा असतो. म्हणजेच अर्थालंकार हे आत्मा सौंदर्य असते असे म्हणायला हरकत नाही.

   अलंकारात म्हत्वाच्या चार गोष्टी:

१ उपमेय: ज्या गोष्टीचे वर्णन केले आहे ती गोष्ट. म्हणजेच ज्याला उपमा दिली आहे ते उपमेय

उदा.तुझे मुख कमलासारखे सुंदर आहे. या वाक्यात मुखाचे वर्णन केले आहे म्हणून मुख हे उपमेय आहे

२  उपमान: उपमेयाचे साम्य ज्या दुसर्‍या गोष्टीशी कवी दाखवत असतो तिला उपमान असे म्हणतात. म्हणजेच ज्याची उपमा दिली आहे ते उपमान आहे, 

उदा. वरील वाक्यात मुखाचे साम्य कमलाशी दाखवले आहे. म्हणून कमल हे उपमान आहे.

३ साधर्म:  साधर्म म्हणजे समानता, उपमेय आणि उपमान यामधील साम्य किंवा सारखेपणा दाखविणार्‍या गुणधर्माला साधर्म म्हणतात.

  उदा: वरील वाक्यात मुख आणि कमल यात साधर्म दाखविणारा सुंदरता हा गुण आहे.

 ४ साधर्मसूचक शब्द:   उपमेय आणि उपमान यामधील साम्य दाखविणार्‍या शब्दाला साधर्मसूचक शब्द किंवा साम्यसूचक शब्द म्हणतात.

   उदा वरील वाक्यात कमलासारखे मुख यात सारखे हा शब्द साधर्मसूचक शब्द आहे.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...