राधानगरी महाविद्यालय, राधानगरी
बी. ए. भाग ३
सञ ६ पेपर क्रमांक : १६
पाठ्यपुस्तक : वाड:मय प्रकाराचे अध्ययन :ललित गद्य : व्यक्तिचिञे
व्यक्तिचिञ : निळू मांग.
विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील
निळू मांग :
प्रस्तावना:-
अण्णाभाऊ साठे यांच्या" निळू मांग " या व्यक्तिचिञाचा विचार करण्यापूर्वी या लेखकांची जीवनधारणा आणि लेखनप्रेरणा या विषयी .....
अण्णाभाऊ साठे यांनी ज्या दलित आणि शोषित समाजाचे दु:ख ,वेदना आणि संघर्श यांचे चिञण केले त्यातून ते स्वत: गेले आहेत. अर्थातच अनुभूतीची धार या लेखनाला लाभली होती. १९४९ मध्ये ' मशाल' या साप्ताहिकात त्यांची 'दिवाळी 'ही कथा प्रसिध्द झाली. तेथून ते लिहितच राहिले. संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव होता. अस्पृश्य ही काय चीज असते ही त्यांनी स्वत: अनुभवलेली होती. प्रतिकूल परिस्थितीत त्यांना औपचारिक शिक्षण घेता आले नाही.प्रखर जीवनानुभूती ही त्यांची शाळा ठरली. तीच त्यांची प्रयोग शाळाही ठरली. अत्यंत प्रतिकुलतेच्या परिस्थितीच्या मुशीतून त्यांची साहित्यसंपदा निर्माण झाली. पस्तीस कादंबर्या आणि तेरा कथासंग्रह लिहिले. तमाशा आणि नाटके लिहिली." माझा रशियाचा प्रवास" हे प्रवासवर्णन लिहिले
आपल्या लेखनप्रेरणाविषयी अण्णाभाऊ साठे म्हणतात, "मी जे जीवन जगतो , पाहतो, अनुभवतो तेच मी लिहितो. मला कल्पनेची भरारी मारुन लिहिता येत नाही...... माझी सारी पाञे या ना त्या नात्याने माझ्या आयुष्यात येऊन गेली आहेत माझी माणसं वास्तवातली आहेत, जिवंत आहेत. मुंबईत ओझेवाला , हमाल , नाका कामगार, मिल कामगार असे जीवन जगावे लागले. त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या पाञचिञणात पडलेले दिसून येते.
"निळू मांग " ही व्यक्तिरेखा अण्णाभाउ साठे यांनी सोप्या भाषेत साकार केली आहे. छोट्या वाक्यातुन त्यांचे निवेदन पुढे सरकते त्या व्यक्तिरेखांचे कंगोरे त्यांच्या चिञणातून साकारतात.
अनुभवाला भिडणारे निवेदन पहा .......
" तोफ तयार झाली . गोळा भरला होता. बत्तीवाला बत्ती घेऊन पुढे आला आणि तै साजुरचा निळू मांग काळी टोपी घेऊन तोफेकडे चालू लागला त्याचा प्रत्येक पाऊल मजबूत पडत होतं. तो निर्भय होता. त्याला कसलीच भीती नव्हती. तो सरळ तोफेशु जाऊन उभा राहिला. "
वरिष्ठ अधिकारी कनवाळू स्वरात निळूला उद्देशून म्हणतो, " आता तू प्रभूकडे जाणार, जर तुला बोलायचे असेल तर बोलून घे आता तू मरणार. जगातून जाणार. तुझा शब्द आता उमटणार नाही. बोल, काही इच्छा असेल तर सांग. "
आपल्याला तोफेच्या तोंडाशी देणारी ही माणसे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घडीला अशी सहानुभूतीच्या स्वरात बोलतात याचे निळू मांगाला आश्चर्य वाटते.
अण्णाभाऊ साठे यांनी मोजक्या शब्दात निळू मांगाचे शब्दचिञ उभे केले आहे.
" साजूर गावात निळू मांग एक सज्जन , गरीब माणूस म्हणून ओळखला जात होता. प्रत्येक माणूस निळूला मान देत होता. निळु कोणाची थुंकी ओलांडत नव्हता. भरपूर उंची, अंगात भरपूर बळ रंगानं सावळा नि चेहर्यानं तो गावात उजवा होता. त्याच्या वयाला नुकतच बाविसावं लागलं होतं पण तो शांत होता. त्याला फक्त आई होती. आईनच त्याला जगवून वाढवलं होतं लहानापासून वृद्धापर्यत सर्वच लोक निळूला चांगला माणूस म्हणत होते. अब्रुदार म्हणून त्याची गावात ख्याती होती. "
व्यकटेश माडगुळकरांच्या 'रामा मैलकुली' या व्यक्तिचिञातील वर्णनशैलीशी येथे कांहीसे साधर्म्य दिसते. निवेदन आणि पाञसंवाद यांच्या संयोगातून वातावरण निर्मिती करणे लेखकाला चांगल्या प्रकारे साधलेले आहे. ग्रामीण परिसरातील दलित वस्तीचे हे चिञ आहे
भिमा पाटलाच्या मक्याचे राखण करण्याचे काम निळू मांगाकडे येते. तो ते इमानइतबारे करतो. त्याचे अनेक तपशील या व्यक्तिचिञणात येतात.
याव्यक्तिचिञणाला कथात्मक वळण मिळते. संघर्षाची धार कथानक प्रवाहाला प्राप्त झाली आहे.
सरकारी खजिना लूटुन राजद्रोह करणारा निळु मांग हा भयंकर गुन्हेगार मानला जात होता. त्याला क्षमा नव्हती.
या पुढे या व्यक्तिचिञणाला वेगळी कलाटणी मिळते तो न्यायमूर्तीना सांगतो, "सरकार, मायबाप मी निळ्या मांग. मी साजूरात तंबाखु मागून खाणारा तुम्ही माझी किंमत तोफेच्या गोळ्याच्या किंमतीची ठरवल्याबद्दल मी तुमच्या पायावर डोकं ठवतो. "
तोफेपुढे उभे राहून निळू मांग गतायुष्याचे अवलोकन करत उद्दगारतो, "सायब मी काय बोलू ? आता मी मरणार . बोलण्यासारख माझ्याकडं काईच न्हाय. तुमी मला लवकर वाटेला लावा. संपू द्या. एकदाची ही कटकट. "
निळू मांगाची शिक्षा रद्द होते. त्याच्या ध्येयामुळे आणि मृत्युला कवटाळण्याच्या बेगुमान वृत्तीमुळे न्यायमूर्ती चक्रावतात.
सारांश :-
सामान्य माणसाला असामान्यत्व प्राप्त करुन देण्याची किमया लेखकाच्या लेखणीत असते. "निळू मांग " या व्यक्तिचिञातून ते अधोरखित झाले आहे.वास्तव जीवनदर्शनाचा उत्कृष्ट नमुना म्हणून या व्यक्तिचिञाकडे पाहता येईल.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.