शिवकालीन उद्योग
B.A.I. Paper II History
शिवकालीन उद्योग
शिवकाळात खेडी स्वयंपूर्ण होती शेती हा मुख्य व्यवसाय होता. त्यासाठी लागणाऱ्या साधनांची उपयोग व्यवसाय ग्रामीण भागात सुरू होते. शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा हे कसबी कारागीर गावातच पूर्ण करत असत. त्या कारागिरांना मोबदला म्हणून आवश्यक ते धान्य शेतकरी आपल्या उत्पादनातून देत असत. कारू- नारू अर्थातच बलुतेदार आणि आलुतेदार हे गावाच्या बहुतांश गरजा पूर्ण करत होते पण तरीही काही आवश्यक बाबी तत्कालीन समाजाला ज्या होत्या त्या भागविण्यासाठी बाजारपेठा होत्या आणि या बाजारपेठांच्या हेतूने अनेक ठिकाणी उद्योग व्यवसाय सुरू होते हे कुटीरोद्योग तत्कालीन अर्थव्यवस्थेला हातभार लावत होते लोकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करत होते.
शेती बरोबरच खेड्यात अनेक प्रकारचे उद्योगधंदे प्राचीन काळापासून अस्तित्वात होते आर्थिक दृष्ट्या देश स्वयंपूर्ण होता त्यामुळे फारशी आयात करावी लागत नव्हती निर्यात मात्र भरपूर गोष्टींची होत होती शिव कालखंडामध्ये कापड जातो मीठ मत्स्य लाकूड काम अन्नधान्य यांचे निर्यात केली जात होती आणि या बहुतांश गोष्टींची उद्योग अस्तित्वात होते.
कापड उद्योग--
भारतातील कापड उद्योग हा सर्वात जुना अतिप्राचीन असा होता. सुती कापड, रेशमी कापड, लोकरी कापड, ताग-घायपातापासून चे कापड तयार करण्याच्या पद्धती या पारंपरिक स्वरूपाच्या होत्या. शेतातील कापूस वेचून त्यातून कापूस व बिया सुट्ट्या करून चरख्यावर त्या कापसाचे धागे तयार करून हातमागावर विणकाम करून हिरडा व अन्य नैसर्गिक गोष्टींचा वापर करून देणा रंग दिला जाईल आणि हे कापड देशात तसेच परदेशातील पाठवले जाई.
तत्कालीन स्त्री-पुरुषांच्या वेशभूषा मध्ये वैविध्यता होती स्त्रिया सुती रेशमी साड्या विविध प्रकारच्या चित्रांचे कपडे व साड्या वापरत असत. पण इतर जगप्रसिद्ध साडी निर्मितीचे केंद्र होते याशिवाय सासवड, सुपे, टाकळी इत्यादी ठिकाणी धोतराचे उत्पादन होई. नागपूर, माहेश्वर, आष्टी, चांदवड, सोलापूर, नागपूर, सासवड, नांदेड, शहादा जुन्नर, धनबाद, कोल्हापूर ही कापडनिर्मिती चे चांगली केंद्र होती.
धातू उद्योग--
लोखंड, तांबे, पितळ या धातूपासून वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू बनवल्या जात लोखंडापासून शेतीची अवजारे, लष्करी साहित्य, शस्त्रे, कुलपे, तोफा बनवल्या जातात तांबे पासून भांडी बनविणे, देवळांचे कळस, मूर्ती तयार करण्यासाठीही धातूंचा वापर होईल सोने, चांदी, तांबे, यापासून टाकसाळीत तयार केली जात असे सोने, चांदी, हिरे, रत्न पासून दागिने बनवले जात.
मीठ उद्योग--
समुद्र किनाऱ्यावरील मिठागारा मध्ये मीठ तयार करण्यात येत असे. मीठ आणि मच्छीमारी हे कोकण किनाऱ्यावरील दोन मोठे उद्योग होते. रत्नागिरी, ठाणे, कुलाबा, पेण, पनवेल, ठाणे, कल्याण, भिवंडी या ठिकाणी मिठागरे होती. येथे तयार होणाऱ्या मिठास देशावर मोठी मागणी होती. पण या मीठ उद्योगास बारदेश होऊन येणाऱ्या मिठाची स्पर्धा करावी लागे. त्यामुळे कोकणातील मीठ उद्योग धोक्यात आला होता. तो सावरण्यासाठी शिवाजी महाराजांनी परदेशी मिठावर ज्यादा जकात बसवली व स्वराज्यातील मीटर उद्योगाला चालना दिली.
मत्स्योद्योग--
समुद्रकिनारा, नदी, खाडी, तलाव या ठिकाणी मत्स्योद्योग चालत असे. हा उद्योग प्रामुख्याने कोळी लोक करत असत. रोहा, पेण, पनवेल, नागोठणे, कल्याण, भिवंडी येथे उद्योग भरभराटीस आणला होता सुकवलेली व खारवलेली मासळी देशावर विक्रीसाठी निर्यात होत असे.
जहाज बांधणी उद्योग--
शिवरायांची स्वराज्य जेव्हा मोरे ना जिंकले तेव्हा स्वराज्याची हद्द समुद्राला लागली. आणि समुद्रावरील परकीय सत्तांची जाणीव झाली. या सत्तांना शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोकणात जहाज उद्योगाची सुरुवात केली. भारतीय आरमाराची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. कोकणात मोठ्या संख्येने उपलब्ध असलेले सागाचे लाकूड आणि इतर आवश्यक लाकूड सामान जमा करून शिवाजी महाराजांनी गुराब, गलबत, पाल, शिबाड, तारू, तरांडे, मचवा,तिरकाठी इत्यादी प्रकारची जहाजे बांधण्यास सुरुवात केली रोहा, बाणवली,मालवण, देवगड, राजापूर, पनवेल, कल्याण, भिवंडी इत्यादी ठिकाणी जहाजबांधणी व दुरुस्तीचा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु झाला.
या सर्वां बरोबरच प्राथमिक जे गाव पातळीवर जे छोटे लघु उद्योग किंवा गृह होते त्यांचा विचार केला तर बलुतेदार अर्जदार यांच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी चे लघुउद्योग प्रत्येक गावात होते. तसेच प्रत्येक किल्ल्यावर शास्त्र निर्मितीसाठी शस्त्रागार होते.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.