राधानगरी महाविद्यालय, राधानगरी.
बी. ए. भाग ३
अभ्यासक्रमपञिका क्रं १५
सञ : ६
पाठ्यपुस्तक : मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी
विभाग :३ मुद्रितशोधन
विषय प्राध्यापक :प्रा बी के पाटील
मूद्रितशोधनाची पद्धत
हस्तलिखित मुद्रणप्रत तयार झाल्यावर जुळारी(डी.टी.पी. आॅपरेटर) टंकन(टियपिंग) करुन त्याची पहिली प्रत काढतो, ती मुद्रितशोधकाकडे आल्यावर पुढील प्रक्रिया होते.
🔹पहिले वाचन: मुद्रितशोधनाचे पहिले मुद्रित शक्यतो एकट्याने वाचू नये. साहाय्यकाच्या मदतीने मूळ मजकूर मोठ्याने वाचावा आणि पहिले मुद्रित मूळप्रतीप्रमाणे आलेले आहे की नाही हे मुद्रितशोधकाने तपासावे, या वाचनाच्या वेळी मूळ मजकूरातील एखादा शब्द, वाक्यांश, ओळी, परिच्छेद सुटला नाही ना , ते लक्षात घ्यावे. पहिल्या वाचनात खूप शंका, दुरुस्त्या येऊ शकतात. त्यांचे निराकरण व दुरुस्त्या होणे अपेक्षित असते.
🔹 दसरे वाचन : हे मुद्रितशोधकाने एकट्याने एकाग्रतेने व बारकाईने वाचावे. या वाचनात पहिल्या मुद्रितात लक्षात न आलेल्या चुका नजरेस येतात. दुसर्या मुद्रितशोधनाच्यावेळी प्रचरणांची शीर्षके, उपशीर्षके. पृष्ठक्रमांक, लेखनाची मांडणी यांकडे लक्ष पुरवावे.
🔹तिसरे वाचन: दुसर्या मुद्रितातील दुरुस्त्या तपिसणे. मजकूर अंतिम छपाउला जाण्यापूर्वी लेखक व मुद्रितशोधक हे अतिशय काळजीपूर्वक वाचन व दुरुस्ती करतात. कारण छपाई झाल्यावर दुरुस्तीला वाव नसतो.
मुद्रितशोधकाने मजकूर तपासताना मुद्रितातील चुका मुद्रितशोधनाच्या खुणांचा वापर करुन बाजूला आलेल्या मोकळ्या जागेत मांडून प्रत्येक खुणेवर तिरकी रेषा काढावी, मुद्रितात जे दिसेल ते मुळ प्रतीत न शोधता,मूळ प्रतीत जे आहे ते मुद्रितात शोधण्याची सवय असावी,मुद्रितशोधकाने मजकूर तपासताना येणार्या शंकांची नोंद ठेवणे गरजेचे असते.शब्दकोश वा अन्य कोश वाड:मय यांचा जरजेनुसार वापर करण्याची सवय असावी, मुद्रितशोधकाने मूळ प्रतीप्रमाणेच मुद्रितशोधन करावे, शंका असेल तर लेखकाबरोबर चर्चा करावी, मगच बदल करावा, स्वत:च्या मताचा मजकूर परस्पर घालू नये.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.