Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: साहित्याची भाषा

Monday, 21 June 2021

साहित्याची भाषा

राधानगरी महाविद्यालय, राधानगरी.

अभ्यासक्रमपञिका :१२

सञ :६

पाठ्यपुस्तक : साहित्यविचार

विभाग :३ साहित्याची भाषा

१.व्यवहारभाष, शास्ञभाषा व साहित्यभाषा : साम्यभेद.

विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील

🔹परस्तावना :  मानवी जीवनात विविध क्षेञात भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.माञ प्रत्येक क्षेञात वापरली जाणारी भाषा त्या भाषेतील विशिष्ट शब्द हे त्या भाषेतील व्यवहारासाठीच प्रामुख्याने वापरले जातात. भाषेतील विविध क्षेञानुसार कसा वापर केला जातो याचा विचार येथे करायचा आहे

१) व्यवहारभाषा:  पुर्वी ग्रामीण भागात बलुतेदारी पध्दत अमलात होती. पण ही पध्दत काळाच्या ओघात नष्ट झाली. आधुनिक जीवनशैली मुळे समाज व्यवस्था बदलत आहे. पण पूर्वी व्यवसायावर अवलंबून असणारे भाषेतील शब्द प्रयोग समाजामध्ये रुढ झालेले दिसतात. बलुतेदारी पध्दतीत अठरापगड जातीचे लोक राहत होते. त्यांच्या व्यवसायावरुन अनेक शब्दप्रयोग रुढ होते. त्याचा प्रभाव आजही भाषेवर असलेला दिसून येतो.

उदा. चांभाराच्या कातडे कापण्याच्या हत्याराला आरी असे म्हणतात. किंवा चप्पल तुटले टाका घाल, टाका घालणे हा शब्दप्रयोग  भाषेत वापरला जातो. सुताराच्या भाषेत पाचर मारणे हा शब्दप्रयोग वापरला जातो. लोहार लोखंडाच्या हत्याराना धार देण्यासाठी पाणी पाजणे हा शब्दप्रयोग वापरतो. अलीकडच्या काळात विटाचे बांधकाम करणारा गवंडी भिंत बांधताना वळंबा घालणे असा शब्दप्रयोग वापरला जातो.

   अलिकडच्या काळात व्यवसायावरुन स्वतंञ शब्द भाषेत वापरले जातात. ठेकेदार, घाऊक माल,दलाल, यासारखे शब्द मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

२) साहित्याची भाषा:  उत्तम काव्याची भाषा कशी असते/कशी असावी याविषयी प्राचीन संस्कृत परंपरेत पाणिनि भर्तुहरी  यांच्यापासून जगन्नाथपंडितापर्यत अनेक साहित्य मीमांसक  तत्वज्ञ, वैयाकरणी, तर्कशास्ञज्ञ यांनी चर्चा केलेली दिसते. पाश्यात्य विचार परंपरेतही  साहित्याच्या भाषेसंबंधी अॅरिस्टाॅटलपासुन  रिचर्डस , मार्गरेट मॅकडोनाल्ड, वर्डस्वर्थपर्यंत चर्चा झाली आहे. आजही साहित्याची भाषा हा महत्वाचा विषय मानला जातो. बा. सी. मर्ढेकर, गंगाधर गाडगीळ, गो. वि. करंदीकर व भालचंद्र नेमाडे या समीक्षकांनी भाषेसंबंधी विचार मांडला आहे. या सर्व भारतीय व पाश्यात्य समीक्षकांच्या विचारातून  साहित्याच्या भाषेची कांही ठळक वैशिष्ट्ये हाती लागतात.

१) भाषेच्या साहाय्याने लेखक आपला जीवनानुभव  व्यक्त करत असतो. त्यामुळे त्या त्या लेखकाची स्वत:ची अशी भाषा असते.

२)सूचकता:साहित्याची भाषा विविध संवेदनांची सूचक असते. ललित साहित्यातील सौंदर्य  या सूचकतेच्या शक्तीवर अवलंबून असते.

उदा. केशवसुतांच्या 'तुतारी' व 'झपूर्झा' या कविता.

३) चिञदर्शित्व :  आपण  पाहिले की  ललित साहित्य  विविध रुपात अवतरते. ते कधी कविता रूप घेते  तर कधी कथारुप.  या रुपामधून  ललित लेखकाचे विविधरंगी अनुभव  समूर्त होतात,गोचर होतात.  शब्दांच्या साहाय्याने तो या अनुभवांचे चिञण करीत असतो. एका रंगछटेशेजारी दुसरी रंगछटा व तिच्या शेजारी आणखी तिसरी येऊन  ज्याप्रमाणे  चिञ सिद्ध होत असते त्याप्रमाणे साहित्य अनुभव -चिञ सिध्द होते. चिञातील रंगछटेचे कार्य चिञ गोचर करणे हे आहे त्याप्रमाणे ललित साहित्यातील  शब्दांचे कार्य  अनुभवांचे विश्व  साकार करते. 

उदा. बालकवींची 'औदुंबर' ही कविता व्यंकटेश माडगुळकरांची शैली.

४) लय आणि ताल : साहित्यकृतीतून जो अनुभव साकारत असतो त्याला स्वत:ची अशी लय असते.  ताल असतो .तो भाषेद्बारे प्रकटत असतो. या लयीनुसार  शब्दांचा अनुक्रम ठरतो ललित साहित्याची भाषा जणू त्या साहित्यातून प्रकट  होणार्‍या भावानुभवाच्या पदन्यासाची चाहूल घेत असते. जो अनुभव प्रकट असतो त्याची लय राखली जाते की नाही,  त्याचा ताल सांभाळला जातो की नाही याची काळजी ही भाषा घेत असते. 

उदा. बालकवींच्या 'फुलराणी' या  कवितेची लय  त्यांच्या 'आनंदी आनंद गडे'  या कवितेहून भिन्न आहे.

५) सौंदर्यनिर्मितीची क्षमता :  साहित्याची भाषा ही  सौंदर्यसर्जक असते.  व्यवहाराच्या भाषेची अभिव्यक्ती अशी होईलच असे नाही. साहित्यभाषेत त्यामूळेच  कलात्मक आनंद देण्याचे सामर्थ असते. 

उदा. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात  ही सौंदर्यानुभूती  केवळसाहित्याची भाषाच देते.व्यवहारात असे म्हणणे हास्यास्पद तरी ठरते वा कृञिम तरी ठरते.

३) विज्ञानभाषा :  विज्ञानाची भाषा हि वस्तुनिष्ठ भाषा असते.यामध्ये नेमकेपणा,चिञमयता,अचूकपणा दर्शवण्यासाठी योग्य त्या आकृत्या,चिञ, आलेख याचा उपयोग केला जातो. वाच्यार्थ, एकच अर्थ, सर्वसामान्य विज्ञान भाषेत असतो.श्रोत्यावर भाषिक परिणाम करणे,त्यांनाभारुन टाकणे हे विज्ञान भाषेचे स्वरुप नाही. विज्ञान भाषा ही श्रोते,वाचक निरपेक्ष असते. त्यामुळे अशी 'पुनरक्ती' ची सुसंगती विज्ञान भाषत नसते. शास्ञातील भाषा तार्किक असते व ती तार्कीक सुसंगती देते. ही भाषा आवश्यक  ते सर्व सांगते पण अनावश्यक ते काहीही सांगत नाही. ही भाषा आवश्यक  ते सर्व सांगते पण अनावश्यक ते काहीही सांगत नाही.विज्ञान भाषेत वाचकांचा या मध्ये विचार नसतो. या मध्ये संकल्पनांच्या भाषा संज्ञा  म्हणून आवश्यक ते संदर्भ दिले जातात विज्ञान भाषा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाचीभाषा असते या मध्ये नेमकेपणा आणि अचूकता यांना अधिक महत्व असते.


स्वाध्याय: सरावासाठी सोबत दिलेली प्रश्नपत्रिका सोडवावी. त्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करावी.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSezkDBWBeXgb6wVloY7yWI5G63ZIXtyJ5BL8Fz5-scEaKRVzA/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&usp=mail_form_link

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...