कुशाण राजवट
बी ए भाग तीन - - 3 - इतिहास पेपर नंबर - 12
कुशाण राजवट - - प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये कुशाणांच्या राजवटीला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे , भारतामध्ये कुशाणांच्या सत्तेची स्थापना कुजुल कॕङफिशेस यांनी केली. आपल्या लष्करी सामर्थ्याच्या जोरावर त्याने ग्रीक आणि शकांचा पराभव केला. भारतातून त्यांची सत्ता नष्ट केली गांधार, पेशावर , मथुरा , या प्रदेशावर त्याने आपली सत्ता स्थापन केली. कल्ह नच्या राजतरंगिणी मध्ये याचा उल्लेख आढळतो, वयाच्या ऐंशीव्या वर्षी मृत्यू पावल्यानंतर त्याचा मुलगा विम कॕङफिशेस हा हा सत्तेवर आला. त्याने देखील मोठ्या प्रमाणात साम्राज्यविस्तार केला त्याने आपल्या नाण्यावर “ महाराज धीराज सर्व लोक ईश्वर ” अशी पदवी लावून घेतली होती. सांस्कृतिक कारण देखील त्याने महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. जिंकलेल्या साम्राज्याचे त्याने अनेक विभागात विभागण्यात केल्या, त्याने स्वतःला “ माहेश्वर ” अशी देखील लावून घेतली होती . तो शैव पथांचा असला तरी इतर धर्मीयांचा त्याने आदर केलेला होता.
कनिष्क - - - प्राचीन भारताच्या इतिहासात आणि कुशाण राजवटीच्या इतिहासात पराक्रमी विद्वान् विद्वानांचा आश्रयदाता बौद्ध धर्माच्या उपासक म्हणून कनिष्काला महत्त्व दिले जाते. साम्राज्य विस्ताराबरोबर सांस्कृतिक जीवनात मोलाची भर घालण्याचे श्रेय कनिष्का ला दिले जाते. त्याने मोठ्या साम्राज्याची निर्मिती केली. त्याचा राज्यकारभार करण्यासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणा निर्माण केली . कनिष्क हा कुषाण वंशीय होता. तसे त्याने आपल्या नाण्यावर संबोधले आहे. कनिष्काने श "देवशाही शहानशा मुरुड" ही पदवी लावून घेतली होती. रावळपिंडी पेशावर अशा अनेक ठिकाणचे प्रदेशात त्याने जिंकले, काश्मीर मध्ये त्याने "गणेशपूर"शहर वसवले .तेथे त्याने बौद्ध धर्माची चौथी परिषद भरवली. कनिष्काने भारतातील प्रदेशावर सत्ता स्थापित केल्यानंतर.आपल्या कार्यक्षम सैन्या सह त्याने चीनवर स्वारी केली . या वेळा चीन सेनापती पॅन याॕग चा पराभव केला.या पराभवामुळे त्याला बराच प्रदेश चीनचा मिळाला कनिष्काने अशोका नंतर मोठा प्रदेश मिळवलेला होता. बनारस खोरासान , अफगाणिस्तान , काश्गर, पंजाब, सिंध , काश्मीर, इत्यादी प्रदेश त्याने आपल्या ताब्यामध्ये ठेवले होते. या विस्तारित राज्याचा राज्य कारभार करण्यासाठी योग्य अशी प्रशासन यंत्रणा निर्माण केली होती. आपल्या साम्राज्याचे त्याने वेगवेगळे भाग केले होते. त्या प्रांताच्या प्रमुखाला महा क्षत्रप असे म्हटले जात होते. त्याने आपल्या सत्तेचा वापर प्रजेच्या हितासाठी केल्याचे दिसून येते. त्याची प्रशासन व्यवस्था आहे सैनिकी स्वरूपाची होती. कनिष्काच्या धार्मिक धोरणाचा विचार करता तो बुद्ध धर्माचा उपास होता. अश्वघोष याची भेट झाल्यानंतर त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. असे असले तरी त्याने इतर धर्मीयांना सन्मानाची वागणूक दिली. कनिष्काच्या काळातच बौद्ध धर्मात अनेक संप्रदाय व पंथ निर्माण होण्यास सुरुवात झाली. बौद्ध धर्मात निर्माण झालेल्या सांप्रदायिक गैरसमजुती मतभेद नष्ट व्हावे यासाठी कुंडल वन येते चौथी परिषद भरवली . कनिष्क हा कर्तबगार सम्राट होता. तसा तो साहित्य , कला, यांना आश्रय देणारा राज्यकर्ता होता. अनेक विद्वानांना त्याने राजाश्रय दिला होता . सोन्य करंद ग्रंथाचा लेखक अश्वघोष. शून्य वादाचा जनक नागार्जुन, तसेच आयुर्वेद शास्त्राचा अभ्यासक चरक. या विद्वान माणसांना त्याने राजाश्रय दिला होता. तक्षशिला जवळ सिरमक तर काश्मीर जवळ कनिष्कपूर ही शहरे वसवली. मात्र तेविस वर्षे राज्य करणाऱ्या कनिष्ठ ला.
त्याच्या शेवटपर्यंत युद्ध करीत राहण्याचा धोरणाला .त्याची सैनिकी यंत्रणा कंटाळली होती परिणामी त्याचे मंत्री आणि सैनिकांनी कट करून कनिष्क ला ठार मारले आणि अशा रीतीने कुशाण राजवटीतील कर्तबगार राजाचा शेवट झाला.
कुशाण सत्तेचे भारतावरील परिणामाचा विचार करता भारतामध्ये एक आंतरराष्ट्रीय साम्राज्य निर्माण केले. त्यांना विरोध करणारा कोणताही सत्ताधीश त्यावेळेला अस्तित्वात नव्हता. त्यामुळे व्यापाराच्या क्षेत्रात, देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रगती केली धार्मिक जीवनामध्ये , शांतता निर्माण झाली होती. प्रशासनामध्ये प्रामाणिक भावना निर्माण झाली होती. कर्तबगार राज्यांच्या राजवटीमुळे कुशाण राजवट यशस्वी राजवट म्हणावे लागते . भाषा, साहित्य, कला, ज्योतिष शास्त्र , नानक शास्त्र , या क्षेत्रामध्ये भारताचे वेगळेपण त्यांनी निर्माण केले होते, असे म्हणावे लागते.
स्वाध्याय: सरावासाठी सोबत दिलेली प्रश्नपत्रिका सोडवा. त्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा.
https://forms.gle/JS4cm7e1s68zLsea6
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.