Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: मराठी कालीन ग्रामीण व्यवस्था..

Sunday, 27 June 2021

मराठी कालीन ग्रामीण व्यवस्था..

VASANT DHERE:

B A I Sem II History Paper II Topic III

मराठी कालीन ग्रामीण व्यवस्था..

खेडे. भौगोलिकदृष्ट्या गाव/खेडे म्हणजे ज्या ठिकाणी शेती जमीन असून त्या शेतीवर राबणारे शेतकरी आणि शेतीवर आधारलेली व्यवसाय करणारे लोक कायमस्वरूपी वस्ती करून राहतात असा भौगोलिक घटक होय. खेड्याची दोन भाग होतात 

१.पांढरी .. म्हणजे पांढरा मातीचा घरे बनण्यास योग्य असलेला भाग व जेथे गावची वस्ती/घरे आहेत.

२. काळी... लागवडीखालील शेतीचा भाग कसदार काळी जमीन असल्याने त्याला काळी आहे असेही म्हणतात.

खेड यालाच ग्राम,देहा,मौजा इत्यादी नावांनी ओळखले जाते. काहीवेळा शेतातच वस्ती केली जाते तेथे छोटी वस्ती तयार होते. त्यामुळे पूर्वीच्या गावाला बुद्रुक तर छोट्या गावाला खुर्द,वाडी,पाडी,वाडा इत्यादी नावाने ओळखले जाते. बाजार भरणाऱ्या गावाला कसबा किंवा पेठा असे म्हटले जाते.

     गाव रचना/ जाती समाजरचना....

ब्राह्मण/कुलकर्णी.

वतनदार/पाटील/देशमुख.

मिराशी/ कुणबी.

बलुतेदार/अलुतेदार.

अस्पृश्य/वहिमी जमाती.    

        मराठीकालीन खेड्यामध्ये बहुसंख्य हिंदू जाती- जमाती दिसतात. इतर धर्मीय अल्पसंख्य दिसतात. यामध्ये मुस्लिम,लिंगायत,जैन काही ठिकाणी ख्रीश्चन इ.

        वतनदार, मिरासदार,बुलतेदार व उपरे असे चार सामाजिक स्तर आपणास दिसतात. गावात पाटील- कुलकर्णी हे गाव वतनदार होते तर परगण्यात देशमुख- देशपांडे हे वतनदार होते,व्यापारी पेठेत शेट्टी-महाजन यांना वतनदार मानले जाई.

        खेड्या वरील नियंत्रक सत्ता..

१). राजसत्ता/दिवाणसत्ता.. दिवाण सत्तेमार्फत राजसत्तेचे नियंत्रण संबंधित खेड्यावर ठेवले जात असे. हवालदार/मजुमदार'कारकून आदी राज्यसत्तेचे ग्रामसेवक/अधिकारी व वतनदार मिरासदार मिळवून दिवाण सत्ता होत असे.

२). देशकसत्ता/गोतसत्ता... पाटील,कुलकर्णी,देशमुख देशपांडे शेटे,महाजन हे वतनदार याशिवाय मिरासदार बलुतेदार यांचा यात समावेश होता.

३). धर्मसत्ता/ज्ञातीसत्ता... वेगवेगळ्या जातीचे पंच व धर्मपीठे यांची एक सत्ता खेड्यावर असे

४). व्यापारी सत्ता... कसबा/पेठ या ठिकाणी शेट्टी महाजन यांची सत्ता चालत असे.    

     गावगड्यातील वतन व्यवस्था ....

वतन हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ जन्मभूमी असा होतो मुस्लिम राज्यकर्त्यांच्या काळात वतन याचा भारतीय व्यवहारात रूपांतर झाल्याने त्याचा अर्थ सापेक्ष बनला. वतन म्हणजे इनाम जहागीर एखादा प्रदेश ताब्यात देणे असा अर्थ झाला. "सामान्यपणे गाव व देश आदी भू-भागाच्या सामाजिक, राजकीय व्यवस्थापनासाठी बजावलेल्या कर्तव्याबद्दल संबंधित व्यक्तीला निर्वाहासाठी व प्रतिष्ठेसाठी राज्यसंस्थेने तसेच जनतेने दिलेले व वंशपरंपरेने चालणारे उत्पन्न म्हणजे वतन होय".  वतन व्यवस्थेचे दोन भाग केले जातात. अ). सरंजामशाही प्रणित वतने... यामध्ये पाटील, कुलकर्णी, 14 शेट्टी, महाजन, देशमुख, देशपांडे या सरंजाम वतनदार यांचा समावेश होतो. यांना अमर्याद अधिकार,सत्ता,प्रतिष्ठा,जमीन इ. प्राप्त होते.

ब). ग्राम जातीबद्दल वतने..... यामध्ये बलुतेदारांचा समावेश होतो. यांना सीमित अधिकार व मोबदला प्राप्त होतो.

         सरंजामी वतनदारांच्या निर्वाहाची सक्ती संबंधित गावावर करण्यात आली होती या वतनदारांना गावकर या मार्फत दोन प्रकारे मोबदला मिळत असे.

१). रोख रक्कम....  यालाच 'नक्त' असे म्हणतात.

२). वस्तू स्वरुपात... याला 'गला' असे संबोधतात. 

या हक्क अधिकारांचा समावेश वतनदारांच्या सनदेत असल्याने तत्कालीन सामाजिक राजकीय चौकटीत त्याला कायदेशीर मान्यता मिळाली होती वतनदारांच्या या मोबदल्यास 'हक्कलाजिमा'  असे म्हटले जात असे. अमेरिका यातील हक्क म्हणजे त्यांना हक्काने मिळणारी बाब तर लाजिमा म्हणजे ऐच्छिक स्वरूपात मिळणारी बाब. प्रत्येक मतदाराचे हक्कलाजीमे वेगवेगळे असत.

    अ).  पाटील...

                  यालाच गाव मुकादम पाटील, ग्रामगोपक, गावपाटील, ग्रामणी असेही म्हणत. मुकादम म्हणजे मुख्य आदमी/प्रमुख/पुढारी...

       कार्ये..... गाव लागणी, सिंचनी, उगवनी, पडीक/ वाजट जमीन लागवडीखाली आणणे, शेतीची सारा निश्चिती करणे, तो वसूल करणे, गावचे संरक्षण, शांतता,सुव्यवस्था, तंटेबखेडे सोडवणे, गुन्हेगारांचा बंदोबस्त करणे, त्यांना शिक्षा करणे. दुष्काळ/परचक्र वेळी सरकारकडून सारा माफी सवलत मिळवून देणे. गोतसभेत न्याय निवाडा करणे, तरूणांची सैन्यात भरती करणे, राजा व रयतेतील तो मध्यस्थ होता. सर्व मुलकी व दिवाणी अधिकार त्यांच्याकडे होते. बहुतांश वेळा हे पद मराठा जातिकडे  वंशपरंपरागत होते.

               हक्कलाजिमे... मानपान.... गावचीजत्रा, होळी,पोळा,संक्रांत,दिवाळी,दसरा,पाडवा आधी सणा वेळी पाटलाला अग्रमान होता. सणावेळी त्याला भेट वस्तू मिळत असत. खुर्दा अथवा रोकड..... गावच्या निव्वळ सारावसुली/उत्पन्नातील काही हिस्सा हा पाटलाला खुर्द अथवा रोकड म्हणून मिळत असे.


Dhere Sir, [27.06.21 08:29]

गला अथवा ऐनजिन्नस...  प्रत्येक जमीन धारकाकडून त्याला धान्य स्वरूपात काही वस्तू मिळत असतात


 उदाहरणार्थ 'घुगरी' म्हणजे शेतात पिकणाऱ्या धान्याचा काही भाग. 'फसकी' म्हणजे कोणतेही पसाभर धान्य.'पळकी'  म्हणजे पळीभर तूप/ तेल इ. कारागिरांकडून त्याला भेट वस्तू मिळत असत.. चांभारा कडून पायपोशी, कोष्टी कडून पासोडी विनकराकडून चोळखण, व्यापाऱ्याकडून नारळ-सुपारी तूप, मराठी गाणे कडे कडून तेलाची घागर उसाचा रस विना मोबदला मिळत असे.

                वेठबिगार.... महार,वाजंत्री आणि कारागीर यांच्याकडून तो विनामूल्य काम करून घेत असे.एक राबता महार पाटलाच्या तैनातिला असे.

                कर-हिस्सा... सरकारी करा पैकी काहीसा पाटलाला मिळत असे लग्नावर आकारलेला वऱ्हाड टक्का, पाटदाम इ. नंगर ही त्यांची निशाणी होती.

         ब).       कुलकर्णी... पाटला नंतरचा वतनदार. त्याला ग्रामलेखी, ग्रामलेखक असेही म्हणतात. लिहिण्या-वाचण्या चे अधिकार ब्राह्मणांना असल्यामुळे हे पद बहुतांश ब्राह्मणांकडे असे. गावच्या जमिनीच्या नोंदी,शेतसारा,हिशोब या जोडीलाच तो कुलकर्णी पद म्हणजे देवपुजाही करत असे. पाटलांइतकीच लागण,सिंचनाची कामे कुलकर्णीने करावी अशी अपेक्षा होती.

       त्यालाही पाटला पाठोपाठ हक्कलाजिमे होते. सारा वसुलीतील विशिष्ट हिस्सा, मानपान, दप्तर खर्चासाठी सादिलवार पट्टी, काही रोख रक्कम गाव त्याला देत असे. तसेच वस्तू व सेवा यांचा ही पाटलान पाठोपाठ त्याला लाभ होत असे. त्यालाही वेठबिगारीचा हक्क होता.

        क).        चौगला.. पाटलाला गावकीच्या कामात मदतनीस म्हणून चौगला काम करत होता. गावच्या शेतीची कागदपत्रे सांभाळणे, ती वाहून पेठ्यात नेणे, शेतसारा शासनाकडे जमा करणे. हि त्याची कामे होती.त्यालाही कमी प्रमाणात मानपान व हककलाजीमे होते. काठी ही त्यांची निशाणी होती.

        ड).     शेटे महाजन.. हे पेठेचे अधिकारी होते. नवीन पेठ बसविण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पाटील कुलकर्णी गावचा हिशोब ठेवत, तसेच हे पेठेचा हिशोब ठेवीत. या कामासाठी दोघांनाही गावाकडून व सरकारकडून वस्तू व रोकड स्वरूपात हकक मिळत असत.तराजू ही त्यांची निशाणी होती.

        परगण्याचे वतनदार..

        इ).    देशमुख... त्याला देशमुख,देशनायक, देसाई,नाडगौडा इ.नावाने ओळखले जाते.परगण्यातील सर्व पाटलांच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देशमुखाची होती.  वाजट जमीन नवीन कुळांना इस्तावा (काही वर्षे सारा माप व नंतर थोड्या थोड्या प्रमाणात वाढ करून देणे)पद्धतीने देणे. प्रदेशात दौरा काढणे आणि तिच्या अडचणी समजून घेणे ही त्यांची कामे होती.  

        पाटलापेक्षा देशमुखाचे कार्यक्षेत्र मोठे होते. गावकऱ्यांकडून त्याला विनामोबदला चाकरी मिळत असे. भेट वस्तू मिळत असत. पिकवलेल्या धान्याचा काही हिस्सा, गवत, जळण, फळे,कोंबडे, इ. सरकारी जकातीचा २ टक्के उत्पन्न तो घेत असे. परत परिसरातील कारागीर व्यापारी यांच्या विक्रीच्या दैनंदिन उपयोगाच्या वस्तू विनामूल्य मिळत. शासनाकडून वतन जमीन मिळत असे.

           ई). देशपांडे... यालाच देशकुलकर्णी,देशलेखक असेही म्हणतात. परगण्यातील सर्व कुलकर्णी वर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी याची होती.तो देशमुखांना जबाबदार होता. देशमुखांच्या निम्म्याने देशपांडेना हक्क लाजिमे होते. शासनाकडून वतन जमीन मिळत असे.

           

           छत्रपती शिवरायांचे वतन विषयक धोरण....

प्रचलित व्यवस्थेतील दोष काढून टाकून टाकून ती निर्दोष करण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला. रयतेचे आजार नष्ट करणे म्हणजे रयतेवर जुलूम जबरदस्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांना नष्ट करणे असेच धोरण शिवाजी महाराजांचे होते. पाटलांना वतना ऐवजी वेतन दिले व त्यांचे नामाभिधान गावकामगार पाटील असे शिवाजी महाराजांनी केले. पाटील कुलकर्णी देशमुख देशपांडे यांना वचनामृत येवजी वेतन दिले व शासकीय कार्याची स्वराज्याची जाणीव करून दिली. त्यांच्याकडे असलेले अनिर्बंध हक्क रद्द केले. शासकीय कार्यात त्यांना मर्यादित अधिकार ठेवले. जमीन मोजणी व सारा निश्चिती मुळे आपोआपच त्यांचे अधिकार कमी झाले. त्यांचे हक्कलाजीमे बंद झाले. याबाबत अ.रा. कुलकर्णी म्हणतात " शिवाजी हा एकाच वेळी जनतेचा व वतनदारांचाही राजा होता.वतनदारांना त्यांनी वेळोवेळी त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली होती. मराठा पूर्व काळात वतनदारांचा जो मनमानी कारभार चालला होता त्यास शिवरायांनी पायबंद घातला.मराठा काळात राजा वतनदार रयत यांचे परस्परसंबंध सहकार्याची होते, परस्परांच्या अधिकारकक्षांचा आदर करणारे होते"  वतनदार हे राज्य सत्तेचे व जनतेचे सेवक होते मात्र पूर्वी ते सामंतशाही ने अत्याचारी वर्तन करत होते जनतेची शारीरिक आर्थिक लूट करत होते हे सर्व शिवरायांनी बंद केले. जुन्या वचनांची पैकी बहुतांश होत नाही त्यांनी रद्द केली नवीन वतन दिले नाही.


Dhere Sir, [27.06.21 08:29]

मिरासदार.....  गावच्या लोकसंख्येत प्रामुख्याने भरणा मिरासदार यांचा असे. गावची बहुतांश जमीन या वर्गाच्या मालकीची असे. मिरासदरांना नागरिकत्वाचे सर्व हक्क उपभोगण्याचा


 अधिकार होता. ते स्वतःच्या मालकीची जमीन कसत. आणि नियमाप्रमाणे शेतसारा भरत गोत सभेच्या सर्व सभांना ते हजर राहत त्यांच्या कामकाजात भाग घेत.

   उपरे..... मिरासदाराना त्यांच्या शेतीत अथवा अन्य कामात मदत करण्यासाठी बाहेरील लोक गावात येत त्यांना उपरे असे म्हणतात. काहीवेळा गावातील जमीन भाड्याने अथवा ठराविक रक्कम देऊन कसण्यासाठी हे लोक घेत असत. यांना गावातील नागरिकत्वाचे कोणतीही अधिकार नव्हते.गावची वाजट जमीन सरकारातून मुदतीने कसण्यासाठी घेत कालांतराने त्यांना जमिनीचे मालकी हक्क नाही मिळत. त्यावेळी त्यांना मिरासदार मानले जाई.

   बलुतेदार अथवा ग्रामसेवक.....  गाव कामगार, वतनदार आणि मिरासदार यानंतरचे गावचे मानकरी म्हणजे बलुतेदार होत. गावची काही जमीन त्यांच्याकडे असे बहुदा त्यावरील सारा माफ असे. गावच्या वाढीसाठी स्थैर्यासाठी बलुतेदार फार महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. खऱ्या अर्थाने ते ग्रामसेवक होते. गावकऱ्यांकडून त्यांना कामाचा मोबदला म्हणून पिकाचा काही हिस्सा मिळत असे. वर्षभराच्या मेहनतीची मजुरी त्यांना सुगीच्या हंगामात गावकऱ्यांकडून मिळत असे. त्याला "बलुते "असे म्हणत. गोतसभेत यांना महत्त्वाचे स्थान होते. गोत सभेच्या मजहर पत्रावर यांची निशाणी  असते. त्यांची संख्या सामान्यपणे १२  होती.

कारागीर आणि व्यवसायिक. सुतार, लोहार, न्हावी,      चांभार कुंभार धोबी.

सेवक वर्ग. महार, तराळ, मांग, रामोशी

धार्मिक सेवकवर्ग. जोशी, गुरव, ठाकूर, जंगम मुल्लाणा.

   १- सुतार, लोहार, चांभार, महार.

   २-मांग, कुंभार, न्हावी, परीट.

   ३- गुरव, जोशी, भाट, मुलाणी.

   अलुतेदार.......शेती व इतर कार्यासाठी वरील बलुतेदारांची शेतकऱ्यांना/गावकऱ्यांना जशी गरज होती तसे इतर सेवा देणाऱ्यांची गरज होती. इतर सेवा देणाऱ्यांना आलुतेदार असे म्हटले जात असे. त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याला "अलुते "असे म्हटले जाई. यांची संख्या १८ असावी.

   तेली, तांबोळी,माळी, सनगर,शिंपी, साळी,गोंधळी डवरी, भाट, ठकार,गोसावी,जंगम, मुलाणा,वाजंत्री घडशी,कलावंत,तराळ,भोई, इ.

       थोडक्यात वतनदार, मिरासदार, बलुतेदार, अलुतेदार आणि उपरे  या सर्वांचा मिळून गावगाडा बनत असे.

       बलुतेदारी पद्धतीची वैशिष्ट्ये.....

१).ही पद्धति जातीबद्दल होती जन्मा नुसारच त्या कुटुंबाचा व्यवसाय ठरत असे. व्यवसाय बदलल्यास जाती बहिष्कृत करण्यात येत असे.            

२). सेवा देणे कर्तव्याचा भाग होता त्यात कमी जास्त किंमत करता येत नसे वतनदारांना विनामूल्य सेवा द्यावी लागे.

३). सेवेचा मोबदला जीवन जगता येईल इतकाच असे. त्यामुळे आर्थिक हलाकितून पळ काढू नये म्हणून त्यांना मर्यादित मोबदला देण्यात येत होता.

४). येथेही जातीय उतरंड होती अस्पृश्य जातींना गावकुसाबाहेर राहण्याची सक्ती करण्यात येई.

५). बौद्धिक श्रम आणि शारीरिक श्रम यांची फारकत केल्याने बलुतेदार करून आरोप हे पारंपारिक चौकटीतच राहिले त्यांच्यावर शरीरश्रमाची सक्ती झाली. ते ज्ञान-विज्ञान पर्यंत पोहोचू शकले नाहीत.

६). अस्पृश्य जाती ना जाती परंपरेने निर्धारित केलेली कामे नाकारण्याचा अधिकार नव्हता.

७). निम्न जातींना संपत्ती बाळगण्याचा अधिकार नव्हता.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...