राधानगरी महाविद्यालय मराठी (आवश्यक) बी.ए.भाग-1
सत्र-2
विषय शिक्षक- प्रा.डॉ.विश्वास पाटील
बालकवी इ. स. (18 90- इ. स. 19 18)
त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांचा जन्म खानदेशातील धरणगाव येथे झाला. वडिलांची नोकरी फिरतीची असल्यामुळे एरंडोल, यावल, जामनेर बेटावर या ठिकाणी तिसरीपर्यंत शिक्षण. अहमदनगरच्या मिशन स्कूलमध्ये व महाबळेश्वरच्या ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत काही काळ शिक्षक 1907 साली जळगाव येथे भरलेल्या मराठी कवी संमेलनात डॉक्टर कीर्तिकर यांच्याकडून बालकवी '' ही उपाधी मिळाली. भादली स्टेशन जवळ रूळ ओलांडताना आगगाडी खाली अपघाती निधन. बालकवींची समग्र कविता पुस्तक रूपाने प्रसिद्ध. कल्पकता वेधकता आणि उत्प्रेक्षा ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. निसर्ग प्रेम आणि बालसुलभ भाव अशा विविध रंगांनी त्यांची कविता नटलेली आहे. निसर्ग वर्णन पर सौंदर्यवादी कवितांचे लेखन करून त्यांनी मराठी काव्य विश्वात मौलिक भर टाकली आहे.
फुलराणी ही बालकवींची कविता खूप लोकप्रिय झाली. या कवितेचा विषय अगदी साधा आहे. हिरव्या हिरव्या गवतात उगवलेल्या बारीकशा कळीचे गोजिरवाण्या रविकिरनासी लग्न ठरते. सगळेजण तिची चेष्टा मस्करी करतात. तिला रात्री प्रीतीची स्वप्ने पडतात आणि सकाळी तिचे रवीकिरण अशी लग्न होते. विषय काय तेवढाच परंतु आपल्या तरुण प्रतिभेने बाल कवीने या कवितेत एक नितांत सुंदर प्रेम कथा गुपली आहे. निसर्गातील विविध घटकांवर मानवी भावभावनांचे आरोपण केल्यामुळे ही कविता मन मोहून टाकते. फुलराणीच्या विवाहाचे वर्णन करताना तेजोमय नव मंडप, दिव्य वराडी, लाल सुवर्णी झगे, गुलाबी फेटा, मंगल पाठ, सनई या शब्दांनी मांगल्य आणि पवित्रता वाढविण्यास मदत केली आहे.
अप्सरांचे गाणे या कवितेमधून सौंदर्यासाठी तळमळणार्या बालकवींच्या संवेदनशील मनाचे प्रगटीकरण होते. परी किंवा अप्सरा या रात्रीच्या वेळी आनंदाची उधळण करत मौज मजा करत पृथ्वीवर भ्रमंती करतात. अशी एक कल्पना आहे. या स्वर्गीय अप्सरा स्नानासाठी पृथ्वीवर सुंदर जागेचा शोध घेत फिरतात. त्यांचे मोहक वर्णन बालकवींनी केले आहे. या अप्सरा फुलांच्या गर्भात लपलेल्या गंगेत स्नान करू इच्छितात तिथे उतरत असताना शुभ पुकेसरणा धक्का लागू नये म्हणून खबरदारी घेतात. तेथील वातावरणाचे निसर्गातील विविध घटकांचे वर्णन करताना बालकवींच्या प्रतिभेला बहर आला आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.