Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: विंदा करंदीकर

Wednesday, 2 June 2021

विंदा करंदीकर

 *राधानगरी महाविद्यालय 

 मराठी (आवश्यक) 

 बी.ए. भाग-1 

विषय शिक्षक: प्रा.डॉ.विश्वास पाटील

 विंदा करंदीकर इ.स. 19 18- इ.स.2010* 

     विंदा करंदीकर हे मराठी वागणमयाची विविध दालने समृद्ध करणारे प्रयोगशील कवी. कविता, गीते, समीक्षा, बाल कविता, लघुनिबंध, अनुवाद असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले आहे. स्वेदगंगा, मृदगंध, धृपद, जातक, विरुपिका इत्यादी काव्यसंग्रह. राणीची बाग, एकदा काय झाले, सशाचे कान, एटू लोकांचा देश, परी ग परी, अजबखाना, सर्कस वाला, पिशी मावशी आणि तिची भुतावळ, आडम तडम हे बालकवितासंग्रह. स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ हे लघुनिबंध संग्रह. अरिस्टॉटलचे काव्य-शास्त्र, पाऊस भाग 1, राजा लिअर हे अनुवादित ग्रंथ. परंपरा आणि नवता हा समिक्षा लेख संग्रह. सावंतवाडी येथे 1996 मध्ये झालेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान.

     माझ्या मना बन दगड ही एक वेगळी सामाजिक जाणीव व्यक्त करणारी कविता. समाजामधील ज्या लोकांना नीटपणे प्राथमिक गरजाही मिळालेले नाहीत त्यांचा आक्रोश ऐकून आपणाला काहीही करता येत नाही. म्हणून स्वतःच्या मनाला कवी म्हणतो माझ्या मना बन दगड इथल्या शोषित, वंचितांना कोरडी सहानुभूती दाखवून काहीही उपयोग नाही. मात्र हेच लोक एक दिवस क्रांतीचे दूत बनून येतील असा आशावादही व्यक्त केला आहे. कुडकुडणारे हे जीव पाहू नको! डोळे शिव! माणूस मिथ्या, सोने सत्य! यासारख्या अवतरणा मधून त्यांच्या कवितेची सामर्थ्य केंद्रे स्पष्ट होतात.

     झपताल या कवितेमध्ये संसारिक स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाच्या बहुविध अशा पैलूंचे चित्रण येते. बाळाला दुध पाजणारी, स्वयंपाक करणारी, कपडे धुणारी, अशी ती अनेक रूपात नाना कामे करीत सबंध घरभर भिरभिरत असते. स्वागत करताना ती सुहासिनी असते, वाढताना यक्षणी असते,  मुलाना भरवताना पक्षिनी असते, तर बचत करुन साठवताना सहिता असते. हा सगळा संसाराचा गाडा ती दहा फूट खोलीमध्ये दिवसाच्या चोवीस मात्रा कशी बसवते याचे कवीला आश्चर्य वाटते. प्रेम जाणिवेच्या विविध छटा या कवितेमधून विंदा करंदीकर प्रकट करताना दिसतात.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...